
फक्त २४ तासांत पूर्ण चित्रपट शूट, Guinness World Record आणि ५० कोटींचा गल्ला!
फक्त २४ तासांत त्यांनी एक चित्रपट शूट करून एडिटी सुद्धा केला होता. शॉक लागला ना? पण हो हे खरं आहे. हा चित्रपट एकाच दिवसांत १४ दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केला होता आणि १९ सिनेमॅटोग्राफर्सने तो शूट केला होता. बरं इतकंच नाही तर ३० पेक्षा जास्त तमिळ इंडस्ट्रीच्या टॉप स्टार्संनी या चित्रपटामध्ये काम केलं होतं. हा एक गिनीजबूक वर्ल्ड रेकॉर्ड होता. कोणता होता तो चित्रपट आणि तो बनण्यामागची स्टोरी काय आहे? चला तर जाणून घेऊयात… (Entertainment News)
तर, निर्माते गिरिधारीलाल नागपाल यांच्या डोक्यात एक अशी कल्पना आली जी ऐकून कोणताही निर्माता म्हणाला असता की, काय बोलतायत हे? कारण त्यांच्या डोक्यात होती एक रेकॉर्ड ब्रेकिंग प्रोजेक्टची कल्पना ती म्हणजे एक दिवसात पूर्ण चित्रपट शूट करायचा आणि जमलंस तर एडिटपण. आणि मग ठरलं आणि त्यांनी हा चित्रपट लिहायचं आणि निर्मितीसुद्धा करायचं ठरवलं. तो चित्रपट म्हणजे ‘स्वयंवरम’ (Suyamvaram).

या चित्रपटाला एका दिवसात शूट करण्यासाठी त्यांनी तमिळ इंडस्ट्रीमधील टॉपचे १४ दिग्दर्शक एकत्र आणले आणि १९ सिनेमॅटोग्राफर्स. या चित्रपटासाठी त्यांनी ३० पेक्षा जास्त कलाकारांना एकत्र आणलं होतं. ज्यात प्रभुदेवापासून, प्रभू, अर्जुन सारजा असे सगळेच बेस्ट स्टार्स होते. जवळ जवळ हा चित्रपट बनवण्यासाठी तमिळ इंडस्ट्री एकत्र आली होती आणि या चित्रपटाचं बजेट होतं २५ कोटी रुपये. (Tamil Movie)
सगळं ठरलं वेगवेगळे दिग्दर्शक एकाच चित्रपटाचे वेगवेगळे सीन, वेगवेगळ्या लोकेशनवर शुट शूट करणार होते. आणि मग ५ एप्रिल १९९९ रोजी सकाळी ७ वाजता ‘स्वयंवरम’ चित्रपटाचं ऐतिहासिक शूटिंग सुरू झालं. चेन्नईमध्ये अनेक स्टुडिओजमध्ये एकाच वेळी शूटिंग सुरू होतं आणि ऑन-स्पॉट एडिटिंग सुद्धा. या चित्रपटासाठी असिस्टंट्सची फौज होती. ९ असोसिएट डायरेक्टर्स, ४५ असिस्टंट्स, स्टेडी कॅम ऑपरेटर्स… सगळं परफेक्ट सुरु होतं.
चित्रपटाची कथा अशी लिहिली होती की, जास्त सीन स्वतंत्र शूट होऊ शकतात याची खास काळजी घेण्यात आली होती. शिवाय, शूटिंगच्या सेटवर गिनीज बूकचे रेप्रेझेंटेटिव्ह्सुद्धा होते. फिल्म किती वेळात शूट होते हे बघण्यासाठी. पण फक्त रेकॉर्ड करायचा, हवा करायची म्हणून हा चित्रपट केला गेला नव्हता. तर चित्रपटाची कथासुद्धा मजेदार इमोशनल कॉमेडी ड्रामाने भरलेली होती. कुशेलन आणि सुशीला हे एका मोठ्या जॉइंट फॅमिलीचे कुटुंबप्रमुख असतात, त्यांना तीन मुलं आणि सहा मुली असतात. कुशेलनला ६०व्या वाढदिवशी हार्ट अटॅक येतो, डॉक्टर सांगतात की कुशेलनकडे वेळ कमी आहे. कुलशेनची शेवटची इच्छा असते की त्याच्या नऊ मुला मुलींचं लग्न त्याच्या समोर व्हावं. ते एक जाहिरात काढतात – कुशेलनच्या मुलांशी मुलींशी लग्न करा आणि प्रॉपर्टी आणि १ कोटी रुपये मिळवा. आणि मग सुरू होतो गोंधळ कॉमेडी आणि ड्रामा असणारा असा हा १५५ मिनिटांचा चित्रपट आहे. ( Suyamvaram Movie Wold Record)
================================
हे देखील वाचा : ४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!
================================
तर, ५ एप्रिल १९९९ रोजी सकाळी सातला या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं आणि ६ एप्रिल १९९९ सकाळी ६:५८ ला म्हणजे अगदी २३ तास ५८ मिनिटांत ते पूर्ण झालं आणि या चित्रपटाने गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला. चार महिन्यांनी १६ जुलै १९९९ रोजी चित्रपट रिलीज झाला आणि ‘स्वयंवरम’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. २५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई केली होती. ‘स्वयंवरम’चा हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आजपर्यंत कोणालाच ब्रेक करता आलेला नाही.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi