‘संगीत देवबाभळी’ फेम Shubhangi Sadavarte पुन्हा अडकणार लग्नबंधनात; 3 महिन्यांआधीच झाला

Talat Mahmood : है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सूर में गाते है….
संगीतकार शंकर जयकिशन यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तलत महमूद यांनी केवळ १९ गाणी गायली होती. इतर गायकांच्या तुलनेत ही संख्या कमी जरी वाटत असली तरी यातील हरेक गीत आजही रसिकांच्या मनात ताजे आहे. मला वाटतं ही किमया एस जे यांच्या सुरांच्या सोबतच तलत मेहमूद यांच्या स्वराची देखील आहे. तलत च्या हिंदी चित्रपटातील गाण्याची संख्या मुळातच कमी असल्यामुळे सहाजिकच शंकर जयकिशन यांच्याकडे देखील त्यांनी गाणी कमी गायली. आपण ज्यावेळेला तलत आणि शंकर जयकिशन हे कॉम्बिनेशन बघू लागतो त्यावेळेला असं लक्षात येतं की देवआनंद करीता तलत मेहमूद हा प्रकार त्यांनी बऱ्याचदा हाताळलेला दिसतो. देवच्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत ज्या ज्या वेळी दिल त्या त्या वेळी तलतच्या स्वराची त्यांना आठवण झाली. तसेच दिलीपकुमार करीता तलत हे कॉम्बिनेशन वापरले.

आपण ज्या वेळेला एस जे आणि तलत यांच्या कारकीर्दीचा विचार करू लागतो त्या वेळी पहिल्यांदा आपल्या नजरेसमोर येतो १९५२ साली प्रदर्शित झालेला अमिया चक्रवर्ती यांचा ‘दाग’ हा चित्रपट. दिलीपकुमार या चित्रपटाचा नायक होता. या चित्रपटांमध्ये तलत यांचा स्वर पहिल्यांदा एस जे यांच्या कडे ऐकायला मिळाला. यातील ‘ऐ मेरे दिल कही और चल गम की दुनिया से दिल भर गया…’ या अप्रतिम गीताला खरं तर आधी मुकेश गाणार होता पण दिलीपने तलतच्या नावाचा आग्रह केला. यात अकॉर्डियन या वाद्याचा अप्रतिम वापर केला होता. व्ही. बलसारा यांनी ते वाजवले होते. याच चित्रपटात तलत ला आणखी दोन गाणी होती. ‘हम दर्द के मारो का इतना ही जमाना है‘ आणि ‘कोई नही मेरा इस दुनिया में आशिया बरबाद है’ या दोन्ही रचना स्वरबध्द करताना मेंडोलीन, सितार, अकॉर्डियन, वॉयलीन आणि सारंगी या वाद्यांचा अतिशय सुरेख वापर एस जे यांनी केला होता.
यानंतर आला ‘पतिता’ (१९५३) हा चित्रपट. या चित्रपटाचा नायक देव आनंद असला तरी यातली तलत ने गायलेली दोन गाणी अभिनेता आगा यांच्यावर चित्रित झाली होती. ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते जाये तो जाये कहा…’ त्याच प्रमाणे ‘तुझे अपने पास बुलाती है तेरी दुनिया’ पण मला वाटतं या चित्रपटातील सर्वात सुंदर जे गाणं होतं ते म्हणजे ‘है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सूर में गाते है…’ चित्रपटात हे गाणं देव आनंद वर चित्रित झालं होतं.( शैलेन्द्रच्या या गीतावर आंग्ल कवी शेले च्या Our sweetest songs are those that tell of saddest thought. या कवितेची गडद च्या दिसते!) या तलत च्या गीतांनी रसिकांच्या दिलात अजरामर असं स्थान मिळविले आहे. या गाण्यात एस जे यांनी ऑर्केस्ट्रेशन मध्ये अकॉर्डियन आणि मेंडोलीन चा फार सुरेल वापर केला आहे.

यानंतर १९५४ साली आलेल्या ‘बूट पॉलिश’ या चित्रपटात आशा भोसले यांच्यासोबत तलत यांनी गायलेल्या ‘चली कौन से देस गुजरिया तू सज धजके’ या गीतात मेंडोलीन चा फार सुंदर वापर केल्याने गीताची गोडी आणखी वाढली. लता मंगेशकर सोबत १९५२ साली आलेल्या ‘परबत’ या चित्रपटातील ‘होटो पे तराने आ गये जी हम तो दिल की तमन्ना पा गये’ हे गीत आज विस्मृतीत गेलं असलं तरी अतिशय मधुर आहे. तलत महमूद काही एस जे यांचा लाडका गायक नव्हता त्यामुळे त्याला फार कमी संधी यांच्या संगीत नियोजनात मिळाली.
‘शिकस्त’ हा चित्रपट तसा व्यावसायिक दृष्ट्या फारसा सफल झाला नाही पण याचे संगीत अतिशय मेलडीयस होते.तलत ने गायलेल्या ‘सपनों की दुनिया को आंखो में बसाना मुश्कील है’ या गीतात सितार,तबला आणि हार्मोनियम या वाद्यांचा सुरेल समन्वय साधला गेला. दिलीप कुमार आणि नलिनी जयवंत यांच्यावर चित्रित या चित्रपटात एक अतिशय मधुर युगल गीत होते तलत आणि लताच्या स्वरात. ‘जब जब फुल खिले तुझे याद किया हमने’ गीतकार शैलेंद्र यांचं अतिशय आवडतं हे गाणं होतं. शैलेंद्र यांच्या एका काव्यसंग्रहाचे शीर्षकच होते ‘जब जब फूल खिले’.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
================================
या जोडीचा ‘रुप की रानी चोरों का राजा’ हा चित्रपट १९६२ साली प्रदर्शित झाला . देव-वहिदा हि हिट जोडी आणि अप्रतिम गाणी असून देखील या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. पण या चित्रपटात तलत मेहमूद यांना शंकर जयकिशन यांच्याकडे गायची पुन्हा संधी मिळाली. यातील ‘तुम तो दिल के तार छेड कर हो गये बेखबर चांद की तरह लेंगे हम रात भर’ हे Tandom Song खूप गाजलं होतं. या चित्रपटात ‘तू रूप की रानी चोरों का राजा’ हे लता सोबत तलत चे युगल गीत मस्त जमले होते. या दोन्ही गीतात गिटार चा सुंदर वापर केला होता. तलत एस जे यांच्या कडे संख्येने कमी जरी गायला असला तरी या गाण्याची लोकप्रियता प्रचंड होती.