‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         The Family Man Season 3 : श्रीकांत तिवारी ‘या’ तारखेला येणार भेटीला!
मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी अजरामर भूमिका प्रेक्षकांना दिल्या आहेत… पण त्यांचा श्रीकांत तिवारी चाहत्यांना विशेष भावला… पुन्हा श्रीकांत तिवारी कधी येणार असा प्रेक्षक प्रश्न विचारत असताना आता फायनली त्याचं उत्तर मिळालं आहे… The Family Man या सीरीजचा तिसरा भाग लवकरच रिलीज होणार असून प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज करण्यात आला आहे…(Web Series)

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने ‘द फॅमिली मॅन सीझन ३’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून अखेर ४ वर्षांनी श्रीकांत तिवारी आपल्याला भेटायला येणार आहे… प्राइम व्हिडीओने एक व्हिडीओ शेअर केला असून यात ‘श्रीकांत तिवारी’च्या स्टाईलमध्ये रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २१ नोव्हेंबर २०२५ रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्पाय आणि कॉमेडीचं संमिश्रण असणाऱ्या या सीरीजच्या तिसऱ्या भागात कोणतं मिश असणार हे पाहायला सगळेच उत्सुक आहेत… (The Family Man Season 3 release date)
‘द फॅमिली मॅन सीझन ३’ मध्ये परत राज अँड डीके’ (Raj & DK) यांच्या दिग्दर्शनाची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे ‘द फॅमिली मॅन ३’मध्ये ‘पाताल लोक’ फेम अभिनेता जयदीप अहलावत याची एन्ट्री होणार आहे आणि त्याच्यासोबत निम्रत कौर देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मनोज बाजपेयी सोबत आणखी २ तगडे कलाकार जोडले जाणार असल्यामुळे तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे…
================================
हे देखील वाचा : जेव्हा साक्षात मृत्यूच मनोज वाजपेयीचा पाठलाग करत होता!
================================
या सीरीजच्या सीझनबद्दल बोलायचं झालं तर, ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजचा पहिला सीझन हा २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये मनोज बाजपेयींसोबत प्रियामणी हिने मनोज यांच्या पत्नीची (सुचित्रा तिवारी) भूमिका साकारली आहे… तसेच, शारीब हाश्मी (Sharib Hashmi) याचीही उल्लेखनीय भूमिका या सीरीजमध्ये आहे…त्यानंतर द फॅमिली मॅनचा दुसरा सीझन २०२१ मध्ये प्रदर्शित झाला… यात समांथा रुथ प्रभू हिने ‘राजी’ या निगेटिव्ह भूमिका साकारली होती… आणि तिसऱ्या सीझनमध्ये जुन्या कलाकारांसोबत नव्या कलाकारांची हातमिळवणी काही औरच असणार यात शंकाच नाही… त्यामुळे ‘द फॅमिली मॅन ३’च्या चाहत्यांना हा थरार प्राईम व्हिडिओवर २१ नोव्हेंबर २०२५ पासून अनु रोजी ही सीरिज पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
