Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prarthana  Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Mahesh Manjrekar पहिल्यांदाच दिसणार साधूच्या भूमिकेत; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लूक

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

लांबलचक चित्रपट “पैसा वसूल” की ‘टाईम फूकट’ची खात्री?

 लांबलचक चित्रपट “पैसा वसूल” की ‘टाईम फूकट’ची खात्री?
कलाकृती विशेष

लांबलचक चित्रपट “पैसा वसूल” की ‘टाईम फूकट’ची खात्री?

by दिलीप ठाकूर 19/12/2024

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, सत्तर ऐंशीच्या दशकात मुकद्दर का सिकंदर, लावारीस, कुली अशा चित्रपटांच्या सेन्सॉर प्रमाणपत्रावर ‘रिळ अठरा’ असे वाचले रे वाचले की हाऊसफुल्ल पब्लिकमधून हमखास काही टाळ्या शिट्ट्या येत. नेहमीच्याच तिकीटावर नेहमीपेक्षा जास्त “पिक्चर” पहायला मिळणार अशीच त्या टाळ्या शिट्ट्यांमागे उत्फूर्त भावना असे. (सेन्सॉर प्रमाणपत्रावर वाचण्यासारखे काय असते ते सच्चे फिल्म दीवाने जाणोत) त्या काळात चौदा वा सोळा रिळांचा चित्रपट ही रुळलेली वाट. (Movie)

आज काय ? “Pushpa 2” तीन तास, पंचवीस मिनिटे तरी Allu Arjun चे निस्सीम भक्त चित्रपटाच्या शेवटी Pushpa 3 ची घोषणा वाचताच उत्फूर्तपणे टाळ्या वाजवतात आणि मगच जागेवरुन उठतात. इतक्या मोठ्या लांबीच्या चित्रपटात आशयाची खोली ती कुठे आहे हो? पहिल्याच फ्रेमपासूनच हाणामारी, मारझोड ती अगदी शेवटपर्यंत, त्यासाठी अडीच तासाचे फुटेजही पुरेसे होते अशाही सोशल मिडियात काॅमेन्टस आल्या तरी बहुमत आणि पसंती त्याच्या लांबीलाच.

चित्रपटाच्या लांबीचे सांगायचे तर, ‘Animal‘ तीन तास एकवीस मिनिटे म्हणजेच एकशे एक्याण्णव मिनिटे. त्यातही यथेच्छ हिंसाचार. काहींना तो असह्य झाल्याने ते मध्यंतरलाच मल्टीप्लेक्सबाहेर पडून आपल्या गाडीतून एखाद्या छानश्या रेस्टॉरंटमध्ये गेले देखील. सिनेमाला जाण्यापूर्वीच आज कुठे बिर्याणी एन्जाॅय करायची याचे प्लॅन होण्याचे आजचे युग. त्यांना फार पूर्वी तहान भूक विसरुन पडद्यावरच्या जगात हरखून गेलेल्यांचे भावविश्व काय सांगायचे? “चित्रपटाच्या मनोरंजनाची भूक असलेल्यांनी” आपल्या देशात चित्रपट रुजवला, वाढवला.

लांबलचक चित्रपटांची अलिकडची काही उदाहरणे अशी,

डंकी…१६२ मिनिटे. या चित्रपटाच्या पटकथेवर अधिक मेहनत घेतली असती आणि कथेचे महत्वाचे वळण आणखीन अगोदर असते तर हा चित्रपट रंगतदार ठरला असता.

सालार…१७५ मिनिटे. दक्षिणेकडील चित्रपटात ओतप्रोत ढिश्यूम ढिश्यूम म्हटल्यावर लांबीचे काय हो? साऊथच्या चित्रपटाच्या हीरोचा सिंगल स्क्रीन थिएटर्सवरील कटआऊटची उंची (ते आता मल्टीप्लेक्सवरही दिसतेय) आणि त्या चित्रपटांची लांबी यात कंजुषी ती अजिबात नाही. ते प्रेक्षकांपर्यंत चित्रपट (Movie) पोहचवण्यास उत्सुक असतात.

चित्रपट (Movie) लांबीच्या काही उदाहरणात जायचे तर,

‘शोले‘ (१९७५)ची लांबी तीन तास चोवीस मिनिटे. त्या काळात सेन्सॉर सर्टिफिकेटवर रिळे देत… एक रिळ सरासरी दहा मिनिटे रनिंग टाईम ‘शोले २० रिळ’. आज ‘शोले’ पन्नासाव्या वर्षातही लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच रिगल चित्रपटगृहात मी “पुन्हा एकदा” (म्हणजे कितव्यांदा विचारुच नका) शोलेच्या खास खेळाचा भन्नाट अनुभव घेतला. पडद्यावर सेन्सॉर प्रमाणपत्र दिसताच टाळ्या शिट्ट्या आणि मग प्रत्येक डायलॉगवर, गाण्यावर पब्लिकने थिएटर अक्षरश: डोक्यावर घेतले. शोलेची लांबी आणखीन असती तरी पब्लिकने ते एन्जाॅय केले असते अशी या पिक्चरची भारी क्रेझ.

‘जोधा अकबर‘ ची लांबी दोनशे चौदा मिनिटे. काही समिक्षकांना ती खटकली. त्याच सुमारास एका इव्हेन्टमध्ये दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर भेटला असता मला म्हणाला, एकादी गोष्ट सविस्तरच सांगायचे असते आणि त्यात चित्रपटाची लांबी वाढणारच. त्यावरुन चर्चा ती किती करायची? मला त्याचे हे म्हणणे आजही लक्षात आहे.

“लगान” ची लांबी दोनशे चोवीस मिनिटे. ती त्यातील क्रिकेट सामन्यामुळे वाढल्याचा निष्कर्ष काढला गेला.. महत्वाचे आहे ते, अशी लांबी असूनही चित्रपट शेवटपर्यंत पकड कायम ठेवून आहे.

‘व्हाॅटस युवर राशी‘ दोनशे अकरा मिनिट. यात मात्र थीममुळे थोडी पुनरावृत्ती झाली. आशुतोष गोवारीकरचा हा चित्रपट फारसा रंगला नाही.

‘स्वदेश‘ची लांबी दोनशेदहा मिनिट. भारतातील ग्रामीण भागातील एका दूरवरच्या खेड्यातील एक भयाण सामाजिक वास्तव यात दिसले. जातीयभेद, अस्पृश्यता, वीज टंचाई, श्रध्दा, अंधश्रद्धा. असे अनेक गोष्टींसह हा चित्रपट (Movie) आपल्याला अस्वस्थ करतो.. आशुतोष गोवारीकर कधीच “लांबीचे मोजमाप करुन चित्रपट पडद्यावर आणत नाही” त्यापेक्षा तो आपल्या विषयालाच न्याय देतो. त्यात लांबीचे काय हो? ती मोजायला आपण जातो का?

आपल्या देशातील पहिला दोन मध्यंतरचा चित्रपट (Movie) ‘संगम‘. दोनशे अडतीस मिनिट. आर. के. फिल्मचा हा पहिला रंगीत चित्रपट. निर्माता, दिग्दर्शक, नायक व संकलक राज कपूर. त्याने कधीच ‘चौकटीत चित्रपट बसवला’ नाही. या चित्रपटाच्या शोची वेळ मेन थिएटर अप्सरा.. अकरा, साडेतीन आणि रात्री आठ अशी होती. लांबी जास्त म्हणून दिवसा चारऐवजी तीन शो अशी आखणी.

राज कपूरच्याच महत्वाकांक्षी

“मेरा नाम जोकर” ची पहिल्या ट्रायलला लांबी ४ तास आणि ४३ मिनिटे (दोन मध्यंतर) चित्रपट (Movie) प्रदर्शित करताना तो ४ तास १५ मिनिटे अर्थात दोनशे पंचावन्न मिनिटे (दोन मध्यंतर) अशा अवधीने पडद्यावर आला. पण फस्ट डे फर्स्ट शोपासूनच तो पडला पडला, बोअर है अशी जोरदार आवई उठली आणि मग त्याची लांबी कमी करुन ती १७८ मिनिटे (एक मध्यंतर) अशी करण्यात आली.

राज कपूर जन्मशताब्दीनिमित्त आयोजित चित्रपट महोत्सवात संगम आणि जोकर हे चित्रपट मूळ लांबीचे अर्थात दोन मध्यंतरसह होते आणि त्यांना प्रतिसादही उत्तम मिळाला. चित्रपट (Movie) क्लासिक असेल तर लांबीची तक्रार कोण कशाला करेल? सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित “हम आपके है कौन” दोनशे सहा मिनिटे. आम्हा चित्रपट समीक्षकांना लिबर्टी चित्रपटगृहातील तिकीटे देवून रसिकांसोबत चित्रपट एन्जाॅय करण्याची छान संधी दिली.. चित्रपट (Movie) सुरु होताच, गीत संगीत व नृत्याने त्यात रंगत आली आणि सव्वातासात पडद्यावर आले, पहिले मध्यंतर. लगेचच लक्षात आले हा दोन मध्यंतरचा चित्रपट आहे. तसेच झाले. ही लांबी जास्त वाटल्याने एका गाण्यासह काही दृश्ये कमी करुन तो एका मध्यंतरचा केला. हम आपके… म्हणजे जणू उच्चभ्रू नवश्रीमंतांच्या महाकुटुंबातील मेगा इव्हेंट. म्हणून तर चित्रपटाची लांबी सुसह्य झाली.

============

हे देखील वाचा : ‘स्वदेस’ची वीस वर्ष…

============

सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर‘ ही तब्बल दोनशे तेरा मिनिटे. जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘एलओसी कारगिल‘ची लांबी तब्बल दोनशे पंचावन्न मिनिटे (मध्यंतरपर्यंत पाहिलेला युध्दपट त्यानंतरही पाहतोय की काय असे उगाच वाटत होते. चित्रपट उगाच फ्लाॅप झाला नाही.) आणि.. आणि.. आणि…

‘बाहुबली‘ आणि ‘दुसरा बाहुबली‘ मिळून तब्बल तीनशे सतरा मिनिटे ‘आर आर आर‘ ची लांबी एकशे एकोणनव्वद मिनिटे. साऊथचा पिक्चर लांबीने जास्त नसेल तर ती बातमी होईलही कदाचित.

एवढ्या मोठ्या लांबीचे चित्रपट पाहणे म्हणजे, वेळ वाया घालवणे असे कसे म्हणणार? आणि वेळ सार्थकी लागला असे तरी कसे म्हणणार? आपल्या चित्रपट वेडा देशातील रसिकांना पडद्यावरच्या जगात हरवून जायला आवडते, त्यांना चित्रपट आवडला की तो कितीही लांबलचक असला तरी “चालतो”. (Movie)

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat bollywood movies Celebrity Entertainment Featured Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.