आर.के.च्या ‘हीना’ सिनेमाचे संगीत रवींद्र जैन यांना कसे मिळाले?
अमिताभ बच्चन ने गायलेल्या पहिल्या गाण्याची कथा…
हिंदी सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन साठच्या दशकात दशकाच्या उत्तरार्धात १९६९ साली ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर चमकले. पहिल्या काही फ्लॉप चित्रपटानंतर प्रकाश मेहरा यांच्या ‘जंजीर’ या चित्रपटापासून तो लोकप्रिय होत गेले पुढे काही वर्षातच तो सुपरस्टार बनले आणि मग सुरू झाला अमिताभ बच्चन या नावाचा झंजावात! पुढची तब्बल दहा-पंधरा वर्ष अमिताभ बच्चन या सात अक्षरांनी हिंदी सिनेमा अक्षरशः भारावून टाकला होता. हिंदी सिनेमाच्या यशाची सर्व गणिते अमिताभ बच्चन यांनी बदलून टाकली. याच काळात १९७९ साली राकेश कुमार यांनी दिग्दर्शित केलेला एक चित्रपट आला होता. त्यात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रमुख भूमिका चित्रपट होता. चित्रपट होता ‘मिस्टर नटवरलाल’. हा एक कॉमेडी एक्शन सिनेमा होता.
अमिताभ बच्चनला समोर ठेवून हा सिनेमा लिहिला होता. त्या काळात भारतामध्ये नटवरलाल नावाचा एक ठग होता या बदमाश व्यक्तिरेखे वरूनच चित्रपटाचे नाव ठरले होते. आज हा चित्रपट आठवला जातो तो अमिताभ बच्चन यांनी गायलेल्या पहिल्या गाण्यामुळे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. खरंतर अमिताभ बच्चन आवाजाचा बादशहा. आपल्या बुलंद गोळीबंद आवाजाने प्रेक्षकांना भारावून टाकणारा. परंतु पहिल्या दहा वर्षात कधीच कुणाला त्याच्या आवाजात गाणे गाऊन का घ्यावेसे वाटले नाही हा प्रश्नच आहे. यश चोप्रा यांच्या १९७६ साली आलेल्या ‘कभी कभी’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एक कविता वाचली होती. ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है, की जिंदगी तेरी जुल्फ की नर्म साये मे गुजरने पाती तो शादाब हो भी सकती थी…’ ही अमिताभच्या स्वरात साहीर यांची रचना प्रचंड आवडली होती. कदाचित इथूनच अमिताभ चांगले गाऊ शकतो याची कल्पना संगीतकारांना आली असावी. त्यामुळेच ‘मिस्टर नटवरलाल’ या चित्रपटात संगीतकार राजेश रोशन यांनी अमिताभ बच्चन यांच्या स्वरात एक गाणे गाऊन घ्यायचे ठरवले.
वस्तुतः हे गाणे म्हणजे एक लहान मुलांना सांगितलेली गोष्ट होती. यात काही भाग हा गोष्टी रूपाने सांगायचा होता तर काही भाग गाऊन दाखवायचा होता. यातील गोष्टी रूपाने सांगायचा भाग अमिताभ बच्चन यांच्या स्वरात आणि गेय स्वरूपातील गोष्ट दुसऱ्या गायकाच्या स्वरूपात असं सुरुवातीला ठरलं होतं. परंतु राजेश रोशन यांनी त्याला विरोध केला आणि संपूर्ण गाणे अमिताभ बच्चन यांच्यात स्वरात रेकॉर्ड करायचे ठरवले. दिग्दर्शक राकेश कुमार यांना थोडी शंका होती. अमिताभ बच्चन हे स्वतः देखील तेवढे कॉन्फिडंट नव्हते. आपल्याला गाता येईल का ही त्यांच्या मनात शंका होतीच. परंतु राजेश रोशन मात्र त्यांच्या भूमिका ठाम होते. आनंद बक्षी यांनी हे गाणे लिहिले होते. अमिताभने भरपूर रिहर्सल केल्या आणि मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये या गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले. पहिल्याच टेक मध्ये अमिताभने अतिशय सुंदर रीतीने हे गाणे सादर केले. गाण्याचे बोल होते ‘मेरे पास आओ मेरे दोस्तो एक किस्सा सुनो…’ त्यावेळी तिथे रेकॉरडीस्ट असलेले घोषबाबू यांनी अमिताभला सांगितले,” तुमचा आवाज खूप चांगला आहे तुम्ही यापुढे देखील कायम गात राहिले पाहिजे.” घोषबाबूंच्या या प्रोत्साहनाने अमिताभ बच्चन खूष झाले अशाप्रकारे अमिताभ बच्चन यांचा पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश झाला. या रेकॉर्डिंग च्या वेळेला कोरस लहान मुलांमध्ये राजेश रोशन यांचा पुतण्या लहानगा ऋतिक रोशन देखील उपस्थित होता. अमिताभ बच्चन यांच्या गाण्यातील भाव आणि लहान मुलांना उद्देशून सांगितलेली गोष्ट ऋतिकच्या उपस्थितीने सहज सुलभ आणि नैसर्गिक बनली!
======
हे देखील वाचा : जेव्हा गीतरामायणाचे पहिलेच गीत हरवते तेव्हा…
======
मध्यंतरी अमिताभ बच्चन यांनी त्या दिवशीच्या रेकॉर्डिंगचा एक फोटो त्यांच्या ब्लॉग वरून शेअर केला होता. यात लहानगा ऋतिक कौतुकाने अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहत असताना दिसतो. गाणे रेकॉर्ड झाले. सर्वत्र त्याचे कौतुक झाले. चित्रपट देखील हिट झाला आणि या गाण्यासाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट गायकाचे फिल्मफेअर नॉमिनेशन देखील मिळाले.(अवार्ड मात्र किशोरकुमार ला गोलमाल च्या ‘आनेवाला पल’ या गाण्याला मिळाले!) यानंतर अमिताभ बच्चन सातत्याने अनेक चित्रपटातून गात राहिले. ‘सिलसिला’ या चित्रपटात तर त्यांनी दोन गाणी गायली होती. ‘नीला आसमान सो गया’ आणि ‘रंग बरसे भीगे चुनरिया’ . ‘लावारीस’ या चित्रपटातील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है?’ या गाण्याने तर कहर लोकप्रियता हासिल केली होती. त्यावर्षी तिथे बिनाका टॉपचे ते गाणे ठरले होते. अमिताभ बच्चन नंतर चरित्र भूमिका करू लागले त्या काळात देखील त्यांनी अनेक चित्रपटातून पार्श्वगायन केले.