दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
द चॅलेंज : अंतराळातील शुटींगचा थरार…
रशियन भाषेत असणा-या ‘द चॅलेंज’ (The Challenge) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. एका चित्रपटाचा ट्रेलर आल्यावर त्यात खास काय आहे, हा प्रश्न पडतो. पण हा ट्रेलर आणि चित्रपट नक्कीच खास असणार आहे, कारण द चॅलेंज या चित्रपटाचे शुटींग कुठल्याही स्टुडिओ किंवा अन्य ठिकाणी झालेले नाही. द चॅलेंज (The Challenge) या चित्रपटाचे शुटींग अंतराळात झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये काही दिवस या चित्रपटाचे शुटींग झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर शुटींग झालेला हा जगातील पहिलाच चित्रपट ठरला आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत बरीच उत्सुकता आहे. या स्पेस स्टेशनवर हॉलिवूडच्याही चित्रपटांचे शुटींग होणार आहे. टॉम क्रूझही आपल्या स्टंटसाठी या आंतराळ स्थानकात शुटींग करणार आहे. पण त्याआधी रशियानं बाजी मारली आहे. त्यामुळे आता चित्रपट सृष्टीतही अमेरिका आणि रशिया हे शितयुद्ध सुरु झाल्याची चर्चा आहे. अंतराळात शुटींग करणारा द चॅलेंज(The Challenge) हा पहिलाच चित्रपट आहे. आतापर्यंत चित्रपटांची शुटींग ही मोठ्या स्टुडीओमध्ये झाली आहे. अगदी अवतार द वे ऑफ वॉटर, या जेम्स कॅमेरून दिग्दर्शित चित्रपटाचं अर्धअधिक शुट पाण्याखाली झालं आहे. कॅमेरुन यांनी पाण्याखाली शुट करण्यासाठी त्यांच्या क्रूला विशिष्ट असं ट्रेनिंग दिलं होतं. काही तास पाण्याखाली राहून ॲक्शन सिन देणं हे कसंब होतं. पण नियमित सरावांनी ही जादू केली आणि जेम्स कॅमेरुन आणि अवतारच्या सर्व टीमनं घेतलेल्या या परिश्रमाचं काय चीज झालं आहे, ते बॉक्स ऑफीसवरील अवतारच्या यशावरुन सिद्ध झालं आहे.
आता द चॅलेजबाबतही (The Challenge) असेच आराखडे लावले जात आहेत. तब्बल 12 दिवस आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर शुटींग या चित्रपटातील क्रूने केले आहे. याशिवाय या चित्रपटात आंतराष्ट्रीय स्पेस स्टशनवरील रशियाच्या एका आंतरळावीरांनही छोटीशी भूमिका केली आहे. 5 ऑक्टोबरला हे युनिट स्पेश स्टेशनवर पोहचले. या क्रूलाही या आंतराळ स्टेशनवर जातांना आणि ते स्टेशन सोडतांना मोठा फटका बसला. काही वेळा सर्व युनिटच संकटात सापडल्यासारखे झाले होते. पण या सर्वांवर मात करत द चॅलेंजचे (The Challenge) कलाकार पृथ्वीवर आले आणि आता याच सर्व शुटींगचा समावेश असलेला द चॅलेंज लवकरच मोठ्या पडद्यावर येत आहे. अवतार या हॉलिवूड पटानंतर आता द चॅलेंज या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. 12 जानेवारी रोजी हा रशियन चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन क्लिम शिपेन्को यांनी केले आहे. हा चित्रपट रशियन स्पेस एजन्सी Roscosmos आणि चॅनल वन यांचा संयुक्त प्रकल्प आहे. ‘द चॅलेंज'(The Challenge) चित्रपटाच्या शूटिंगसाठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला कठोर प्रशिक्षण देण्यात आले होते. चित्रपटाच्या टीमने 12 दिवस अंतराळात स्थानकात 35-40 मिनिटांचे दीर्घ सीन शूट केले आहेत. हे सर्व करतांनाचा अनुभव थरारक असल्याचे चित्रपटातील अभिनेत्यांनी सांगितले आहे. दिग्दर्शक क्लिम शिपेन्को यांच्या या साहसामुळे अवकाशात चित्रपटाचे शूटिंग करून इतिहास रचला आहे. रशियाने हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता टॉम क्रूझलाही मागे टाकले आहे. खरं तर, 2020 मध्ये टॉमने नासा आणि एलोन मस्कची कंपनी स्पेस एक्स यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळात एका चित्रपटाच्या शूटिंगची घोषणा केली होती.
======
हे देखील वाचा : झेप अभी बाकी है मेरे दोस्त!
======
यात युलिया पेरेसिल्ड, मिलोस बिकोविच आणि व्लादिमीर माश्कोव्ह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. द चॅलेंज या चित्रपटाची कथा ही काल्पनिक असल्याचे सांगण्यात येते. यात एका महिला डॉक्टरची कथा आहे. चित्रपटाची कथा म्हणजे, अंतराळयान उड्डाण करत असताना कॉस्मोनॉट इव्हानोव्ह चेतना गमावतो. शून्य गुरुत्वाकर्षणात हृदयाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात येतो. त्यासाठी हृदयविकार शल्यचिकित्सक झेन्या बेल्याएवा, हिची निवड करण्यात येते. झेन्या ही ऐका तीन वर्षाच्या मुलीची आई आहे, त्या मुलीला सोडून तिला आंतराळस्थानकात पाठवण्यात येते आणि तिथे जाऊन तिच्यावर एका आंतराळविरावर ह्दयाची शस्त्रक्रीया करण्याची जबाबदारी टाकण्यात येते.
या चित्रपटासाठी सर्व क्रू सदस्यांनी मे महिन्यापासून रशियाच्या युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतले. चित्रपटाच्या कलाकारांना त्यांच्या वजनावरही नियंत्रण ठेवावे लागले. कठोर परिश्रमानंतरच द चॅलेंजचा क्रू आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर रवाना झाला. तेथील बारा दिवसांचे शुटींग हे त्या क्रूसाठी सर्वात मोलाचे ठरले आहे. आता हा चित्रपट 12 रोजी मोठ्या पडद्यावर आल्यावर द चॅलेंज बॉक्सऑफीसवर अवतारचा रेकॉर्ड मोडतो का याकडे लक्ष आहे.
सई बने