दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
ट्रकच्या मागे लिहिलेल्या एका ओळीवरून सुचलं हे गाणं
नव्वदच्या दशकातील म्युझिकल हिट जमान्याची सुरुवात ज्या चित्रपटांपासून झाली त्यापैकी एक होता राजश्री प्रॉडक्शनचा(Rajshri Production) ‘मैने प्यार किया’. २९ डिसेंबर १९८९ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतीय चित्रपट संगीताचा कम्प्लीट मेक ओव्हर केला. चित्रपट संगीतातील हरवलेली मेलडी परत आली. चित्रपट संगीताचं सुवर्णयोग जणू पुन्हा या चित्रपटापासून सुरू झाले. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात तब्बल अकरा गाणी होती आणि ही गाणी देव कोहली आणि असद भोपाली यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली होती.
या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा हा पहिलाच चित्रपट होता. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांचा देखील हा पहिला चित्रपट होता. त्यामुळे सिनेमाला एक फ्रेशनेस आला होता. मध्यंतरी उपग्रह वाहिनीवरील एका कार्यक्रमात या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी या चित्रपटातील एका गाण्याची धमाल स्टोरी सांगितली होती. या सिनेमातील जवळपास सर्व गाणी रेकॉर्ड झाली होती. चित्रपट देखील बऱ्यापैकी शूट झाला होता.
अशावेळी चित्रपटाचे गीतकार देव कोहली यांनी सूरज बडजात्या यांना फोन करून सांगितले की “आपण या चित्रपटात एक गाणं वाढवूया!” त्यावर सूरज बडजात्या म्हणाले, ”आता चित्रपटात कुठेही जागा नाही जिथे आपल्याला गाणं इन्सर्ट करता येईल!” त्यावर देव कोहली म्हणाले की, ”हा रोमँटिक चित्रपट आहे आणि तिथे छेडछाड, रुसवे फुगवे असलेले गाणं हवं !” त्यावर सूरज बडजात्या म्हणाले “पण तुम्हाला आत्ताच हे कसं काय सुचलं?” त्यावर ते म्हणाले, ”मी आत्ता एका प्रवासात असताना ट्रकच्या मागे एक ओळ पाहिली आणि त्यावरून मला गाणं सुचलं. ती ओळ होती ‘तू चल मै आई’ ही ओळ सूरज यांना देखील ती आवडली. त्यांनी ‘गो अहेड’ असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी देव कोहली गाणे घेऊन आले. त्या गाण्यावर मग चर्चा झाली. राजश्री प्रोडक्शन चित्रपट भारतीय समाजातील संस्कारी चित्रपट. कुटुंब व्यवस्था, नातेसंबंध, मोठ्यांविषयी असलेला आदर याच संपूर्ण प्रतिबिंब त्यांच्या चित्रपटातून पडत असायचे . या गाण्यात देव कोहली यांनी लिहिलं होतं ‘आजा रात होने आई, मौसम ने ली अंगडाई, तो किस बात की है लडाई, तू चल मै आई….’ त्यावर सुरज बडजात्या यांचे वडील राजकुमार बडजात्या म्हणाले की “यातील ‘रात’ हा शब्द काढून टाका आणि तिथे ‘शाम’ हा शब्द टाका. रात या शब्दाने संपूर्ण गाण्याचा अर्थ आणि वातावरण बिघडून जाते. शाम हा शब्द योग्य आहे.”
अशा पद्धतीने त्या गाण्यात तो शब्द टाकला आणि गाणे बनले ‘आजा शाम होने आई…’ लता मंगेशकर आणि एस पी बाल सुब्रामण्यम यांच्या स्वरात हे गाणं रेकॉर्ड झालं. चित्रपटात देखील खूप चांगल्या पद्धतीने हे गाणं घेण्यात आलं. खरंतर संपूर्ण चित्रपट बनल्यानंतर हे गाणं तयार झालं आणि सिनेमात इन्सर्ट करण्यात आला. एका ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओळीवरून सुचलेल्या गाण्यातून एक अजरामर गीत बनलं!
=======
हे देखील वाचा : एस पी बालसुब्रमण्यम : पुरस्कारांचा बादशहा!
=======
‘मैने प्यार किया’ हा चित्रपट इंग्लिश मध्ये ‘व्हेन लव कॉल्स’ या नावाने डब करण्यात आला. चित्रपटाची ही इंग्रजी आवृत्ती वेस्टइंडीज मध्ये खूपच लोकप्रिय ठरली. हा चित्रपट तेलगू भाषेत ‘प्रेमा पाउरा’ या नावाने डब केला. विशाखापट्टणममध्ये तब्बल २५ आठवडे चालला. तमिळ, मल्याळम आणि चक्क स्पॅनिश भाषेमध्ये देखिल डब करून सिनेमाने यशाचे शिखर गाठले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने प्रचंड मोठे यश मिळवले तब्बल 20 कोटी रुपयांचा व्यवसाय या चित्रपटाने केला व राजश्री चित्र संस्थेला(Rajshri Production) संपूर्ण कर्जमुक्त करण्यात आले.
मनमोहन देसाई यांनी तर या चित्रपटाच्या यशाची तुलना ‘शोले’ पेक्षाही अधिक अशी केली होती. या चित्रपटातील गाणी देव कोहली आणि असद भोपाली यांनी लिहिली होती तर संगीत राम-लक्ष्मण यांचे होते. या चित्रपटातील काही गाणी मात्र पाश्चात्य संगीतावरून सरळ सरळ उचललेली होती. उदाहरणार्थ ‘मेरे रंग में रंगने वाली’ हे गाणे ‘फायनल अकाउंट’ या स्वीडिश बेडवरून घेतले होते यातील ‘आते जाते हसते गाते हे’ गाणे स्टेवी वंडर यांच्या ‘आय जस्ट कॉल टू से‘ वरून तर ‘आया मौसम दोस्ती का‘ हे गाणे बाल्टीमोराच्या टारझन बॉयच्या धून वरून उचलले होते! काहीही असो ‘मैने प्यार किया’ वर ‘प्यार’ करणारे लाखो चाहते आजही आहेत!(Rajshri Production)