यश चोप्रा यांनी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना केले दिग्दर्शित !
![टायगरच्या ‘गणपत’ मध्ये ही अभिनेत्री बनणार हिरोईन..](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2023/03/Tiger-Shroff-850x560.jpg)
टायगरच्या ‘गणपत’ मध्ये ही अभिनेत्री बनणार हिरोईन..
“आपनका लव्हस्टोरी इधरसे शुरु हुआँ” असं म्हणत बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आगामी ‘गणपत’ (Ganpat) चित्रपटाचा आणखी एक टिझर रिलीज करून ‘गणपत’ची हिरोईन कोण असेल? या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. २०२२मध्ये रिलीज होणाऱ्या गणपतचं दिग्दर्शन विकास बहल करत आहेत. टायगरने त्याच्या अकाऊंटवरून एक टिझर रिलीज केला होता, ज्यामुळे ‘गणपत’मध्ये कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागेल या चर्चेला तोंड फुटले होते.
काल अपलोड केलेल्या टिझरमध्ये एका स्पोर्ट्सबाईकवर पाठमोऱ्या बसलेल्या युवतीला दर्शविण्यात आलं होतं. त्या युवतीने हेल्मेट घातलेलं असल्याने तिचा चेहरा दिसणं शक्य नव्हतं. त्या टिझरमध्ये ऍक्शन सिक्वेन्सला साजेश्या पार्श्वसंगीतात “आपनभी वेट कर रहा है की कल मूडेगी” हा टायगरचा आवाज घुमला आणि ती युवती कोण असावी याबाबत नेटकऱ्यांच्या चर्चेला उधाण आलं. दिशा पटानी, नोरा फतेही, श्रद्धा कपूर, तारा सुतारिया अशी अनेक नावं या चर्चेत आली पण त्यांना मागे सारून दुसऱ्याच अभिनेत्रीने टायगरची हिरोईन होण्याचा मान मिळवला आहे.
आज सकाळी टायगरने (Tiger Shroff) पुन्हा एक टिझर रिलीज करत चाहत्यांच्या उत्सुकतेला पूर्णविराम दिलेला आहे. ह्या टिझरमध्ये जळत्या शहराच्या पार्श्वभूमीवर एक स्पोर्ट्सबाईक आडवी थांबलेली दिसते, जिचं मागचं चाक हवेत गरागरा फिरत असून यावेळी बाईक चालवणाऱ्या युवतीचा चेहरा प्रेक्षकांना पुसटसा दिसून येत आहे. जसजसा मागे सूर्य आभाळात येतो, तसतसा त्या रायडरच्या चेहऱ्यावरील रेषा आणखीनच स्पष्ट होत जातात.
हे देखील वाचा: … म्हणून “धूम ४” मध्ये दीपिकाची वर्णी लागली
“आपनका लव्हस्टोरी इधरसे शुरु हुआँ।”
हा टायगरचा डायलॉग संपताच कॅमेरा त्या रायडरचा चेहरा स्पष्ट करत स्थिरावतो आणि आपली कातील नजर दूरवर रोखून बाईकवर बसलेली अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) प्रेक्षकांना दिसते. होय, ‘हिरोपंती’ या चित्रपटातून पदार्पण करणारी ही जबरीया जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. या ट्रेलरमधील टायगरच्या डायलॉगने चाहत्यांना पुन्हा एकदा हिरोपंती आठवायला भाग पाडलं असून, क्रिती सॅननच्या हॉट आणि डॅशिंग लूकचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. क्रिती सॅनननेही हाच टिझर तिच्या अकाऊंटवरून शेअर करत तिच्या भूमिकेचं नाव जस्सी असल्याचं जाहीर केलं आहे.
![Image result for heropanti movie tiger and kriti](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2023/03/74440637.jpg)
‘गणपत’ ही पूर्णतः ऍक्शन फिल्म असून टायगर यात अत्यंत वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी तो दिवसरात्र मेहनत घेत असल्याचं त्याच्या रेग्युलर जिम रुटीनमधून कळून येत आहे. चित्रपटात दोन हिरोईन्स असतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत असून, क्रितीसोबत दुसरी कोणती तारका झळकणार आहे याची उत्सुकता चाहत्यांना लागून आहे.