Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Jitendra–श्रीदेवी–जयाप्रदाचा ‘तोहफा’ आठवतो कां?
८०च्या दशकामध्ये बॉलीवूडची अवस्था मोठी विचित्र झाली होती. एकतर घरोघरी रंगीत टीव्हीचे आगमन झाल्यामुळे प्रेक्षक सिनेमापासून काहीसा दुरावला होता. त्याचवेळी देशभर व्हिडिओ पार्लर्स पेव फुटल्यामुळे प्रेक्षकांना स्वस्तात आणि ताबडतोब चित्रपट पाहायला मिळू लागल्यामुळे थिएटर येण्याचा त्यांचा कल कमी झाला. अमिताभ बच्चन यांचं आजारपण आणि त्यानंतर राजकारणात त्यांनी केलेला प्रवेश त्यामुळे अमिताभचा बॉक्स ऑफिस करिष्मा काहीसा कमी झाला होता. अशावेळी अभिनेता जितेंद्र यांनी साउथकडील चित्रपटात काम करून प्रचंड लोकप्रियता हासील केली.

ऐंशीच्या दशकातील सर्वाधिक हिट सिनेमा देण्यामध्ये मिथुन चक्रवर्ती आणि जितेंद्र यांचा मोठा वाटा होता. खरंतर जितेंद्र यांचा दिदार ए यार हा महत्त्वाकांक्षी चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. आणि ते भरून काढण्यासाठी तो साऊथकडच्या सिनेमात काम करत होते. या दशकामध्ये जितेंद्र यांनी अक्षरशः शेकडो सिनेमे केले. या सिनेमांचा फॉर्मुला ठरलेला असायचा. साऊथचा बटबटीतपणा असायचा पण संपूर्ण भारतभर हे चित्रपट प्रचंड गाजले. त्यातला पहिला चित्रपट होता हिम्मतवाला यानंतर ३ फेब्रुवारी १९८४ ‘तोहफा’ हा सिनेमा संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट झाला. जितेंद्र श्रीदेवी आणि जयाप्रदा यांचा ‘तोहफा’ हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वाधिक बॉक्स ऑफिस वर कलेक्शन करणारा चित्रपट होता. या चित्रपटाने अमिताभच्या ‘शराबी’ला देखील मागे टाकले होते.

‘तोहफा’ सिनेमाची कथा बऱ्यापैकी राज कपूरच्या ‘नजराना’ (१९६१) या चित्रपटाच्या कथेशी साधर्म्य सगणारी होती. १९८२ साली डी रामा नायडू यांनी तेलगू मध्ये ‘देवता’ हा एक चित्रपट बनवला होता तो सुपरहिट ठरल्यानंतर त्याचा रिमेक त्यांनी हिंदीत करायचे ठरवले आणि तोच हा ‘तोहफा’ चित्रपट होता. हा सिनेमा के राघवेंद्रराव यांनी दिग्दर्शित केला होता. बप्पी लाहिरी यांचे या चित्रपटाला संगीत होते . चित्रपट टिपिकल फॅमिली मेलोड्रामा होता. दोन सख्ख्या बहिणी त्यांचे एकाच व्यक्तीवर असलेलं प्रेम नंतर एकीनं त्याग करणं असा टिपिकल साउथ इंडियन ड्रामा होता. पण त्याला तडका मारला होता इंदीवर यांच्या गीतांनी आणि बप्पी लहरी यांच्या संगीताने.
================================
हे देखील वाचा: Reema Lagoo : बॉलिवूडच्या ‘कूल आई’ला पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती!
=================================
या चित्रपटातील हर एक गाणं प्रचंड गाजलं. साउथ कडील त्या काळातील गाण्याच्या चित्रिकरण करण्याची एक टिपिकल पद्धत होती. भांडी, साड्या, मडकी यांचा मुबलक वापर करून गाणी पिक्चराईज केली जायची. ‘तोहफा तोहफा तोहफा’ या गाण्यात साड्यांच प्रचंड कलेक्शन दाखवलं होतं. भारतीय स्त्रियांचा साड्यांवरील प्रेम जगजाहीर आहे. त्यामुळे हे गाणं लोकप्रिय झालं नाही तरच नवल! या सिनेमात एक आंख मारू तो… हे गाणं देखील खूप गाजलं. हि दोन्ही गाणी आशा-किशोर यांनी गायली होती. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील ‘अलबेला मौसम कहता है स्वागतम..’ हे गाणे बप्पी लहरीने अगदी तब्येतीने बनवलं होतं. एस पी बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या आवाजातील ‘मिलन जन्मो से जन्मो
का’ या गाण्याला देखील एक वेगळीच खुमारी होती.

या सिनेमातील शक्ती कपूर यांचे कॅरेक्टर प्रचंड गाजले. त्यातील ‘आऊ ललिता…’ हा त्यांचा डायलॉग आयकॉनिक ठरला. हा डायलॉग इतका लोकप्रिय झाला की शक्ती कपूर जिथे जिथे जायचे तिथे त्यांना हा डायलॉग म्हणून दाखवावा लागायचा. हीच लोकप्रियता कॅश करण्यासाठी शक्ती कपूर यांनी २०१७ साली डेहराडूनला स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘आऊ ललिता…’ या सिनेमातील जितेंद्र आणि श्रीदेवीच्या डान्स स्टेप मध्ये खजुराहो शिल्पशैलीचा आभास होत असल्यामुळे काही संस्कृती प्रिय लोक कोर्टात देखील गेले होते.(गोरी तेरे अंग अंग में रूप रंग के भरे हुये है कलसे..) पण याचा उलटाच इफेक्ट झाला कधीकधी सिनेमाला बॅड पब्लिसिटी देखील सुपरहिट बनवून टाकते त्या पद्धतीने हा सिनेमाची लोकप्रियता आणखी वाढली त्यावर्षी या सिनेमाने तब्बल नऊ कोटी रुपये कमावले आणि नंतर देखील रिपीटमध्ये या सिनेमाला प्रचंड लोकाश्रय लाभला. व्हिडिओ कॅसेट आणि सॅटॅलाइट राइट्स यातून या सिनेमाने प्रचंड कमाई केली.
================================
हे देखील वाचा: अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवीला चक्क ट्रक भरून फुले पाठवली!
=================================
जितेंद्रला एस्टॅब्लिश करण्यामध्ये या सिनेमाचा मोठा वाटा होता. ओरिजनल तेलगू सिनेमा ‘देवता’ (१९८२) मध्ये जयाप्रदा आणि श्रीदेवी यांच्याच भूमिका होत्या पण तोहफा मध्ये त्यांनी भूमिकांची अदलाबदल केली होती! या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी निर्मात्याने कलावंतांचे मोठमोठे कट आउट करून थिएटरच्या बाहेर लावले होते हा पब्लिसिटी चा त्या काळात एक नवा फंडा होता. त्यामुळे सिनेमाची लोकप्रियता झटपट वाढत गेली त्यानंतर अशा पब्लिसिटीचे पेवच फुटले.