
Tom Cruise ला यंदाचा मानद ऑस्कर पुरस्कार प्रदान
हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रुझ याला १६व्या गवर्नर्स पुरस्कार सोहळ्यात मानद ऑस्कर पुरस्कार देत त्याचा गौरव करण्यात आला… चित्रपटसृष्टीतील अमुल्य योगदानासाठी कलाकारांना हा मानद ऑस्कर पुरस्कार दिला जातो… टॉमसोबत डॉली पार्टन, कोरियोग्राफर डेबी एलन और प्रोडक्शन डिजाइनर व्यान थॉमस यांनाही हा पुरस्कार देण्यात आला… (Tom Cruise)
टॉम क्रुझ याने पुरस्कार स्वीकारल्यानंतर सगळ्यांचे आभार मानत आपलं मनोगत व्यक्त केलं… टॉम म्हणाला की, चित्रपट मला जगभरातीय प्रेक्षकांपर्यंत घेऊन जातो… चित्रपटगृहात येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांचं निव्वळ मनोरंजन करणं हाच आम्हा मेकर्सचा उद्देश असतो आणि माझ्यासाठी ही बाब फार महत्वाची आहे… दरम्यान, या आधी टॉम क्रुइझला ४ ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाले आहेत… (Hollywood)

अभिमानाची बाब म्हणजे आपल्या भारतातील द ग्रेट डिरेक्टर सत्यजित रे (Satyajeet Ray) यांना हा मानद ऑस्कर पुरस्कार देत त्यांचा सन्मान करण्यात आला होता… हॉलिवूडलाही आपल्या डिरेक्शनची भूरळ पाडणाऱ्या सत्यजित रे यांनी पाथेर पांचाली, देवी, अपारीजितो असे बरेच अजरामर चित्रपट दिले आहेत… तर, टॉम क्रुइझच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, मिशन इम्पोसिबल, अमेरिकन मेड, ममी, व्हॅनिला स्काय, टॉप गन, द आऊटसाईडर्स अशा बऱ्याच चित्रपटात त्याने कामं केली आहेत…
================================
हे देखील वाचा : टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात कमाई किती?
================================
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मिशन Mission: Impossible – The Final Reckoning च्या रिलीजवेळी भारतात आलेल्या टॉम क्रुइझने भारताबद्दल त्याच्या मनात असलेल्या प्रेमाची कबूली दिली होती…. तो म्हणाला होता की, मला भारतीय चित्रपट, संस्कृती आवडत असल्यामुळे मला एक तरी भारतात चित्रपट करायचा आहे”… त्यामुळे येत्या काळात टॉम क्रुझ याने बॉलिवूड चित्रपट करावा ही चाहत्याांची इच्छा पुर्ण होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… (Tom Cruise received honorary oscar award)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi