‘या’ सिनेमासाठी प्रियांका चोप्राला कसे काय मिळाले सहापट अधिक पैसे?
निर्माता-दिग्दर्शक विपुल शहा त्यावेळी म्हणजे २००३ साली त्यांच्या आगामी ‘वक्त : द रेस अगेंस्ट टाईम’ या चित्रपटाची स्टार कास्ट फायनल करत होते. अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ), अक्षय कुमार ( Akshay Kumar ), बोम्मन इराणी ( Boman Irani ), राजपाल यादव , शेफाली शेट्टी शाहसारखे मोठे कलाकार यात होते. विपुल शहा यांनी त्यांच्याच २००१ सालच्या ‘आंखे’ या सस्पेन्सथ्रिलर सिनेमा मधील अमिताभ – अक्षय या सुपरहिट जोडीला पुन्हा री कास्ट केले होते. हा सिनेमा देखील मल्टीस्टारर होता. या सिनेमाची नायिका म्हणून प्रियांका चोप्राला विपुल शहा यांनी साईन केले. त्यासाठी त्यांनी तिला पाच लाख रुपये सायनिंग अमाऊंट देखील दिले. त्यापूर्वी प्रियंका चोप्रा(Story of Priyanka Chopra) ‘द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत चमकली होती. नायिका म्हणून तिला पहिल्यांदाच इतकी मोठी भूमिका मिळत होती.
इथपर्यंत सर्व ठीक होतं; पण ज्यावेळी ‘वक्त’ या सिनेमाचे को प्रोड्युसर, अँड लॅब चे प्रवीण निश्चल यांना ही गोष्ट कळाली त्यावेळी त्यांनी विपुल शहांना सांगितले…”आपल्या एवढ्या मोठ्या बॅनर साठी प्रियंका चोप्रा (Story of Priyanka Chopra) सारखी नवोदित अभिनेत्री नको. तिला ही भूमिका झेपणार नाही. आपल्या ड्रीम प्रोजेक्टला अपयश येईल. कुणीतरी प्रस्थापित नायिका घेवू. आपण तिला सिनेमातून काढून टाकू या. तुम्ही तिच्याकडून सायनिंग अमाऊंट परत घ्या आणि तिला सिनेमातून काढून टाका!” विपुल शहा यांना ते बरोबर वाटले नाही पण त्यांचा नाईलाज झाला. कारण अँड लॅब सिनेमाचे फायनान्सर होते, सहनिर्माते होते. त्यामुळे त्यांची सुचना ऐकणे त्यांच्यासाठी बंधनकारक ठरले. तरी विपुल शहा प्रवीण निश्चल यांना म्हणाले,” तुम्ही प्रियांका चोप्राला समजता तितकी ती नवोदित नाही. तिच्यात हिरोईनचे चांगले मटेरियल आहे. ती आपल्या चित्रपटात चांगली भूमिका करेल. आपण तिला काढायला नको.” पण प्रवीण निश्चल त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. शहा यांचा नाईलाज झाला. अशा पद्धतीने त्यांनी एक दिवस प्रियांकाला बोलावून तिला परिस्थिती सांगितली. आणि या प्रोजेक्ट मधून आम्ही तुला काढून टाकत आहोत असे सांगितले. (Story of Priyanka Chopra)
प्रियांका चोप्रा अर्थातच खूप नाराज झाली, तिने सायनिंग अमाउंटचे पाच लाख रुपये परत करून टाकले. हाती आलेला चांगला प्रोजेक्ट निघून गेला. पण म्हणतात ना ‘दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम..!’ काही दिवसानंतर एक अशी घटना घडली की ज्याने सर्व चित्र पूर्णपणे पालटले. त्यावर्षीचे फिल्म फेयर अवार्ड जाहीर झाले आणि ‘अंदाज’ या चित्रपटासाठी बेस्ट फीमेल डेब्यू एक्ट्रेस म्हणून प्रियांका चोप्राला (Story of Priyanka Chopra) पारितोषिक मिळाले. तसेच या सिनेमाची सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून देखील तिला पारितोषिक मिळाले. मार्केटमध्ये जिकडे तिकडे प्रियंकाच्या नावाची चर्चा सुरू झाली. तिचे मार्केटमध्ये नाव मोठे झाले. त्यामुळे अर्थातच तिला चित्रपटात साईन करण्यासाठी निर्मात्यांची चढाओढ सुरू झाली. इकडे प्रवीण निश्चल यांना देखील आपल्याकडून चूक झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी विपुल शहा यांना तसे बोलून दाखवले. विपुल शहा फक्त हसले. त्यांनी पुढच्या आठवड्यात प्रियांकाला पुन्हा बोलावले आणि तिला चित्रपटात काम करण्याची विनंती केली. परंतु आता ती पूर्वीची प्रियांका राहिली नव्हती. तिची सायनिंग अमाऊंट जी पूर्वी पाच लाख होती आता त्याच्या सहापट तीस लाख रुपये तिला द्यावे लागले!! अशा पद्धतीने जी गोष्ट पाच लाखात होणार होती त्या गोष्टीसाठी सहा पट जास्त पैसे मोजावे लागले.(Story of Priyanka Chopra)
======
हे देखील वाचा : ‘लंच ब्रेक’च्या तासाभरात देव आनंदने कल्पना कार्तिक सोबत उरकले झटपट लग्न!
======
जाता जाता ओळख… ‘वक्त – द रेस अगेंस्ट टाइम’ हा चित्रपट अतिश कपाडिया लिखित एका गुजराती नाटकावर बेतला होता. बाप आणि मुलगा यांच्यातील नातेसंबंधा वरील हे नाटक गुजरातमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. अमिताभ बच्चन यांना हे नाटक खूप आवडले होते. त्यांनीच या चित्रपटात भूमिका करण्यामध्ये रस दाखवला होता. हा चित्रपट देखील अतिशय उत्तम बनला होता आणि चित्रपटाला यश देखील चांगले मिळाले.