Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bollywood Movies 2025 : जुलै महिना चित्रपटांचा महाउत्सव; एकाच दिवशी

Ashutosh Rana : “भाषा हा संवादाचा विषय, वादाचा नाही”; मराठी-हिंदी

Siddharth Malhotra-Kiara Advani यांना झालं कन्यारत्न; सिद्धार्थने पोस्ट करत दिली

Bollywood and South Sequels : ‘आरआरआर’ ते ‘जवान’; हे गाजलेले

Bollywood Actor : ‘बायको’ खंबीरपणे पाठीशी होती, म्हणून ‘हे’ अभिनेते

Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘Family Man 3’;

‘दिवसाला ४० चपात्या आणि १.५ लीटर दूध’ Actor Jaideep Ahlawaचा

Aatali Batmi Phutali Teaser : खुनाच्या सुपारीभोवती फिरणारी भन्नाट कथा; १९

‘या’ कारणामुळे Mrunal Dusanis ने कलविश्वातल्या मुलाशी लग्न नाही केलं;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

गौरवा पासून वंचित राहिलेला असा हा ‘कुमार गौरव’

 गौरवा पासून वंचित राहिलेला असा हा ‘कुमार गौरव’
कलाकृती तडका बात पुरानी बडी सुहानी

गौरवा पासून वंचित राहिलेला असा हा ‘कुमार गौरव’

by धनंजय कुलकर्णी 04/12/2020

ही मायानगरी मोठी अजब आहे. फूटपाथवरच्या पोराला स्टार बनवते तर तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या ‘स्टारसन’ ला यशापासून कोसो दूर ठेवते. ऐंशीच्या दशकात प्रस्थापित कलाकारांच्या मुलांचे रूपेरी पडद्यावर आगमन वाढले. यात एक होता ज्युबिलीकुमार म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या राजेंद्रकुमारचा मुलगा ‘कुमार गौरव’. मुलगा एकवीस वर्षाचा झाला की पित्याने त्याच्यासाठी सिनेमची तयारी सुरू केली. तो प्रेमकथांचा संगीतमय सिनेमांचा दौर असल्याने तशीच कहाणी निवडली. सुलक्षणा पंडीतची धाकटी बहिण विजेता पंडीतला त्याची नायिका म्हणून निवडलं. संगीत आर. डी. बर्मन तर त्याच्या साठी पार्श्वगायक म्हणून अमितकुमार!

कश्मिरच्या नयनरम्य लोकेशन्सवर ही प्रेमकहाणी फुलविण्यासाठी दिग्दर्शक राहुल रवैल यांना पाचारण केले. ‘याद आरही है तेरी याद आरही है’, ‘देखो मैने देखा है एक सपना’, ‘कैसा तेरा प्यार कैसा गुस्सा है तेरा’ ही गाणी सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच लोकप्रिय ठरली. २० फेब्रुवारी १९८१ रोजी मेट्रोच्या अलिशान पडड्यावर ‘लव्ह स्टोरी’ झळकला आणि सुपर हिट ठरला. गंमत म्हणजे दिग्दर्शकाशी मतभेद झाल्याने राजेंद्रकुमारने श्रेय नामावलीत कुणाचेच नाव टाकले नव्हते. ‘अ न्यू सुपरस्टार इज बॉर्न’ अशी आवई पिटली गेली. आणि कुमार गौरवच्या सिनेमांची रांग लागली. तेरी कसम, स्टार, रोमान्स, लव्हर्स, हम है लाजवाब, ऑल राऊंडर… ओळीने सर्व फ्लॉप होत गेले.

हे ही वाचा: १४८ वर्षांचे अभिजात नाटक : संगीत सौभद्र

दणकट नायकांचा तो जमाना होता त्यात या बच्चूचा निभाव लागणार कसा? त्यात अभिनयाच्या नावाने बोंबाबोंब मग केवळ सुंदर सुंदर नायिका आणि गोड गोड गाणी किती दिवस तारणार? १९८५ साली भारतात दूरदर्शन स्थिरस्थावर झाल्यावर देशातील पहिली टेलीफिल्म महेश भट ने बनवली ‘जनम’ त्याचा नायक होता कुमार गौरव. पित्याने पुन्हा एकदा मुलासाठी प्रयत्न करायचे ठरवले. १९८६ साली ‘नाम’ हा सिनेमा बनवला. दिग्दर्शक म्हणून भट साहेब आले. सिनेमा सुपर हिट ठरला पण त्याचा फायदा संजय दत्तला झाला!

अपयश त्याची पाठ सोडायला तयार नव्हते. ज्यांचे सिनेमे चालतात अशा नायिंका सोबत त्याची जोडी बनवून पाहिली. जूही चावला (गूंज), हाय मेरी जान (आयेशा जुल्का), इंद्रजित (नीलम) अगदी अखेरचा प्रयत्न म्हणजे भरमसाठ मानधन देवून माधुरी दिक्षितला त्याची नायिका बनवले ‘फूल’ (१९९४) मध्ये. परंतू परिणाम शून्य. राजेंद्रकुमार गेल्यावर त्याने सिनेमाचा नाद सोडून दिला व कंस्ट्रक्शन लाईन मध्ये घुसला. पुढे बर्‍याच वर्षांनी तो मजहर खान यांच्या ‘गॅंग’ आणि संजय गुप्ता यांच्या ‘कॉंटे’ मध्ये दिसला.

त्याच्या रूपेरी इमेजहून वेगळ्या लूक मध्ये तो होता. २००४ साली ’गयाना १८३८ द अरायव्हल’ या अमेरीकन सिनेमात तो चमकला. त्यातील अभिनय सराहनीय होता. पण पुढे काहीच नाही. आज त्याची आठवण झालीच तर सुनील दत्तचा जावई किंवा संजय दत्तचा मेव्हणा एवढीच राहीली आहे. मध्यंतरी त्याच्या मुलीने कमल अमरोहीच्या नातवासोबत लग्न केल्याची बातमी आली आणि पुन्हा एकदा त्याची आठवण झाली!    

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood movie Bollywood Topics Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.