Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकरची कसदार अदाकारी

 Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकरची कसदार अदाकारी
कलाकृती विशेष

Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकरची कसदार अदाकारी

by दिलीप ठाकूर 17/01/2025

उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ने कायमच अष्टपैलुत्व व विविधता जपली. ‘रंगीला‘ (१९९५) गर्ल म्हणून घवघवीत यश मिळाल्यावर त्याच पठडीतील अनेक भूमिकांत ती वावरु शकली असती, पण तिने सतत एकेक आव्हान स्वीकारत आपले अभिनय अष्टपैलुत्व अधोरेखित केले. आपला एक चाहतावर्ग निर्माण केला.

Ram Gopal Varma निर्मित व श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘एक हसिना थी‘मधील उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ही अशीच वेगळी. १६ जानेवारी २००४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. म्हणजेच या चित्रपटाला एकवीस वर्ष पूर्ण झालीदेखील…

शेखर कपूर (Shekhar Kapur) दिग्दर्शित “मासूम” (१९८३) मधील बालकलाकार म्हणून उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) चा चढता आलेख पाहताना काही फसलेले चित्रपट (मस्त, श्रीमान आशिक हे चित्रपट) आणि म्हणूनच दुर्दैवाने गोंधळलेल्या भूमिकादेखील आहेत पण जमेची बाजू असलेल्या व्यक्तीरेखा जास्त आहेत. (बालकलाकार म्हणून झाकोळ इत्यादी चित्रपटांतूनही तिने भूमिका साकारत आपल्या अभिनय कौशल्याचा प्रत्यय दिला.)

एन. चंद्रा दिग्दर्शित ‘नरसिंह‘ (१९९१) पासून नायिका म्हणून उर्मिला मातोंडकरने नायिका म्हणून वाटचाल सुरु केली तेव्हा काही मराठी वृत्तपत्रांनी “हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखीन एक लक्षवेधक मराठी चेहरा” असे कौतुकाने म्हटले हे योग्यच पण लगोलग माधुरी दीक्षितशी तुलना करण्याची काही आवश्यकता होती का? उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, एक स्वतंत्र अभिनय शैली, सामर्थ्य व सातत्य कायम राहिलेय.

मला आठवतय, जुहूच्या सुमित प्रिव्ह्यू मिनी थिएटरमध्ये ‘रंगिला‘च्या गाण्यातील उर्मिला मातोंडकरचे ग्लॅमरस रुपडे पाहताना तिने कात टाकल्याचे स्पष्ट होतेच पण हा चित्रपट ‘रंगिली’ म्हणूनही ओळखला जाईल व ती “स्टार” होईल हे सांगायला ज्योतिषाची गरजच नव्हती. अनेक क्षेत्रातील काही गुणवंताची कर्तबगारी त्यांच्या कुंडलीत असते की नाही हे माहित नाही. त्यांच्या मेहनती वृत्तीत, सकारात्मक दृष्टिकोनात, योग्य निर्णय क्षमतेत आणि आपल्या काम व क्षेत्राशी असलेल्या बांधिलकीत नक्कीच यश असते. उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) त्यात एक उत्तम उदाहरण.

तिचा नवीन चित्रपट पहिला रे पाहिला (रंगीला, सत्या, दौड, मस्त, कौन) तिला मुलाखतीसाठी मी भेटलोय आणि चित्रपट व तिचा अभिनय पाहिला असल्यानेच बरेच काही विचारता येई, बोलणे अधिकच मोकळेपणाने होई. (अलिकडे चित्रपट न पाहताच मुलाखती घेणे कसं काय जमतं काहीच कळत नाही) उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) चं अष्टपैलुत्व पिंजर, जुदाई, प्यार तुने क्या किया, खुबसुरत, भूत, दीवानगी अशी विविधांगी आहे.

एक हसिना थी या नावातच नायिकाप्रधान चित्रपट. उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ला एक वेगळी भूमिका साकारण्याची उत्तम संधी आणि त्यात तिने विविध छटा दाखवत अभिनय रंग भरला. सारीका वर्तक हे तिच्या व्यक्तीरेखेचे नाव. करणसिंह राठोड (Saif Ali Khan) तिचा कसा विश्वासघात करतो आणि ती कशा पध्दतीने एका दुष्टचक्रात अडकते आणि त्यातून बाहेर पडण्याची तिची धडपड, तिचा संघर्ष म्हणजेच हा ॲक्शन थ्रीलर. अशा चित्रपटांची गोष्ट सांगायची नसते. असे चित्रपट अनुभवायचे असतात. हा चित्रपट सिडनी शेल्डनच्या If Tomorrow Comes या रहस्यरंजक साहित्यावर आधारित आहे. त्यावरुन श्रीराम राघवन व पूजा सुरती यांनी पटकथालेखन केलेय. त्यांनी टर्न व ट्विस्टचा वापर करीत रंगत आणलीय. दिग्दर्शक श्रीराम राघवनचा हा पहिला चित्रपट. पहिल्याच चित्रपटात त्याने आपल्याला दृश्य माध्यमाची उत्तम जाण असल्याचे दाखवले.

===============

हे देखील वाचा : Aishwarya Rai : गुणवत्ता सरस तरी गाॅसिप्सने रंगत

===============

चित्रपटात सीमा विश्वास, आदित्य श्रीवास्तव, कविता कौशल्य, Zakir Hussain, मुरली शर्मा, रवि काळे, रसिका जोशी, Sheeba Chaddha यांच्याही भूमिका आहेत. लहान मोठ्या भूमिकेतही या कलाकारांचा प्रभाव दिसला. रामगोपाल वर्मा याबाबत नेहमीच आग्रही. रामूदेखील त्या काळात चित्रपटाचा चोवीस तास विचार करणारा फिल्मवाला. हा चित्रपट के सेरा सेरा प्राॅडक्सन्स व आर. आर. मुव्ही मेकर्स यांची निर्मिती. सी. के. मुरलीधरनचे छायाचित्रण व अमर मोहिलेचे संगीत यांचा उल्लेख हवाच. खलनायकी छटा असल्यानेच सैफ अली खान हा चित्रपट स्वीकारण्यास बराच साशंक होता. शिवाय नाव नायिकेला झुकते माप देणारे. अखेर एकदाचा हो म्हणाला.

Ek Hasina Thiचे पोस्टर डिझाईन लक्षवेधक व उत्सुकता वाढवणारे. त्यात कल्पकता आहे. चित्रपटात काय बरे असेल असा प्रश्न निर्माण होतो आणि आपण हा चित्रपट पाहतोच. उर्मिला मातोंडकरच्या अष्टपैलुत्व अभिनय वाटचालीत हा एक महत्वाचा चित्रपट. थीम वेगळी असेल, व्यक्तीरेखा लेखन खोलवर असेल आणि दिग्दर्शकाकडे व्हीजन असेल तर उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हमखास दाद मिळवणारच.

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News ek hasina thi Entertainment Featured rangeela
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.