Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bollywood Actor : ‘बायको’ खंबीरपणे पाठीशी होती, म्हणून ‘हे’ अभिनेते

Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘Family Man 3’;

‘दिवसाला ४० चपात्या आणि १.५ लीटर दूध’ Actor Jaideep Ahlawaचा

Aatali Batmi Phutali Teaser : खुनाच्या सुपारीभोवती फिरणारी भन्नाट कथा; १९

‘या’ कारणामुळे Mrunal Dusanis ने कलविश्वातल्या मुलाशी लग्न नाही केलं;

Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !

Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”

सिनेमाचा हिरो Rajesh Khanna पण किशोर कुमार यांचे गाणे दुसऱ्याच

Maalik : राजकुमार रावच्या मालिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर

 परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर
मिक्स मसाला

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर

by Team KalakrutiMedia 17/08/2024

दरवर्षी विविध भाषिक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. नुकतीच ७०व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा’चा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मयसभा करमणूक मंडळी, झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे, शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. २०२३ सालीचा दिग्दर्शित व झी स्टुडिओज ह्याच्या प्रोडक्शन बॅनरखाली मधुगंधा कुलकर्णी निर्मित भारतीय मराठी भाषेतील डार्क कॉमेडी रहस्यपट चित्रपट आहे. १३ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये आणि २४ फेब्रुवारी २०२३ रोजी झी फाईव्ह वर डिजिटल स्वरूपात प्रदर्शित झाला आहे. (National Film Award 2024 Best Marathi Movie Vaalvi)

‘वाळवी‘ हा शब्द तसा नकारार्थी! तरीही अशा नावाचा आपल्याला हसवणारा आणि अंतर्मुख करणारा भन्नाट चित्रपट फक्त मराठीच नाही तर इतर भाषांमधल्या चित्रपटांमध्ये आपल्या वेगळ्या विषयामुळे आणि मांडणीमुळे नेहमीच चर्चेत राहिला. समीक्षकांसोबतच प्रेक्षकांच्या सुद्धा पसंतीला उतरला. परेश मोकाशी नेहमीच काहीतरी नावीन्यपूर्ण, हटके कलीकृती घेऊन येतात, त्यातील वाळवी एक. मराठीतील पहिला थ्रिलकॅाम असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला.

झी स्टुडिओजचे सीबीओ उमेश कृष्ण (कुमार) बन्सल म्हणतात की,”झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी चौकटीबाहेरचे घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील असते. परेश मोकाशी अत्यंत अभ्यासू आणि संवेदनशील दिग्दर्शक आहेत, जे प्रेक्षकांच्या आवडी उत्तमरित्या जाणतात. आज ‘वाळवी’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ही सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे. ‘वाळवी’मध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी हा एक सन्मान आहे.(National Film Award 2024 Best Marathi Movie Vaalvi)

================================

हे देखील वाचा: अभिनेत्री अमृता खानविलकर करणार ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’मधून भव्य नाट्यपदार्पण

================================

“दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणतात की, ” खूप आनंद आहे, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तो आमच्या संपूर्ण टीमचा आहे. मी प्रेक्षकांचाही तितकाच ऋणी आहे.” हा सिनेमा तुम्हा अजुनही पाहीला नसेल तर झी फाईव्ह वर डिजिटलवर पाहू शकता.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 70th National Film Award 2024 anita daate Best Marathi Movie Vaalvi directror paresh mokashi Entertainment marathi movie 2023 National Film Award 2024 vaalavi marathi movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.