Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bahubali To KGF; साऊथच्या हिट चित्रपटांना ‘या’ मराठी कलाकांनी दिला

Inspector Zende :  मराठमोळ्या पोलिसाचं कर्तृत्व मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाचा

Akshay Kumar तब्बल १७ वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्यासोबत चित्रपटात एकत्र झळकणार!

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत

Aranya Movie Teaser: हार्दिक जोशीच्या ‘अरण्य’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज प्रदर्शित

Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर

Dastak : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मदनमोहन यांचा चित्रपट

Dada Kondke : “मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन…”

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Vaama-Ladhai Sanmanachi Teaser: ‘ती’च्या आत्मसन्मानाची कथा सांगणाऱ्या ‘वामा – लढाई सन्मानाची’ चा टिझर प्रदर्शित

 Vaama-Ladhai Sanmanachi Teaser: ‘ती’च्या आत्मसन्मानाची कथा सांगणाऱ्या ‘वामा – लढाई सन्मानाची’ चा टिझर प्रदर्शित
Vaama-Ladhai Sanmanachi Teaser
मिक्स मसाला

Vaama-Ladhai Sanmanachi Teaser: ‘ती’च्या आत्मसन्मानाची कथा सांगणाऱ्या ‘वामा – लढाई सन्मानाची’ चा टिझर प्रदर्शित

by Team KalakrutiMedia 05/05/2025

Vaama-Ladhai Sanmanachi: स्त्रीशक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाने सजलेला हा टीझर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठी संघर्ष मांडतो. एका विवाहित स्त्रीचा तिच्या पतीच्या अत्याचाराविरोधातील लढा, तिच्या स्वाभिमानाची लढाई आणि त्या संघर्षातून निर्माण झालेला तिचा आत्मविश्वास हे सारं या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात स्त्रीच्या सन्मानाची, अस्तित्वाची व स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळेल. चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे.( Vaama-Ladhai Sanmanachi Teaser)

Vaama-Ladhai Sanmanachi Teaser
Vaama-Ladhai Sanmanachi Teaser

ओंकारेश्वरा प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के. निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून येत्या २३ मे रोजी ‘वामा- लढाई सन्मानाची’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी त्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

=============================

हे देखील वाचा: Atali Batmi Fhutali: अभिनेते विजय निकम झाले ‘टायगर भाई’!

============================= 

दिग्दर्शक अशोक आर. कोंडके म्हणतात,” ‘ही कथा केवळ महिलांची व्यथा सांगणारी नसून तिच्या आत्मविश्वासाने पुन्हा उभे राहाण्याच्या ताकदीची आहे. यातून आम्ही एक सामाजिक संदेश, सामाजिक जबाबदारी आणि विचारक्रांतीचा आरंभ करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटात हिंसाचारासोबतच भावनिक प्रवासावरही लक्ष केंद्रित केले आहे. एक सामान्य स्त्री जेव्हा अन्यायाविरोधात आवाज उठवते तेव्हा समाजात परिवर्तन घडवण्याचे बळही तिच्यात आपसूकच येते. हेच या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.”(Vaama-Ladhai Sanmanachi Teaser)

Vaama-Ladhai Sanmanachi Teaser
Vaama-Ladhai Sanmanachi Teaser

चित्रपटाचे निर्माते सुब्रमण्यम के. म्हणतात,” ‘महिला सशक्तीकरणावर आधारित या चित्रपटात मनोरजंन तर आहेच याशिवाय समाज परिवर्तनाचा संदेशही यातून देण्यात आला आहे. मला असे वाटते ‘वामा- लढाई सन्मानाची’ या चित्रपटामुळे प्रेक्षकांची मानसिकता बदलण्यास नक्कीच मदत होईल. जेव्हा प्रेक्षक सशक्त स्त्रीची भूमिका पडद्यावर पाहातात, तेव्हा त्यांच्या मनात महिलांविषयी आदर आणि समतेची भावना निर्माण होते आणि म्हणूनच आम्ही हा चित्रपट खास प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. हा चित्रपट केवळ महिलांसाठी नसून संपूर्ण समाजाला स्त्री-पुरुष समानतेचे महत्व पटवून देणारा आहे.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Directed Amol Appa Dorugade Entertainment Ganessh Divekar Jui Belkhande Kashmira Kulkarni Kunal Kumar Bantalloo Mahesh Kumar Wanve Marathi Movie Tirthanand Rao
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.