Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

किस्सा एका एकांकिकेचा…

 किस्सा एका एकांकिकेचा…
आठवणींच्या पानावर

किस्सा एका एकांकिकेचा…

by रश्मी वारंग 25/04/2021

रूईया महाविद्यालयासाठी शं.ना.नवरे यांची ‘जनावर’ ही एकांकिका बसवली जात होती. एक बेकार आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडणारा तरुण आणि प्रतिष्ठित मध्यमवर्गीय गृहस्थ यांच्यातला तो संघर्ष होता. दिलीपजींचा (Dilip Prabhavalkar) तो पहिला वहिला अनुभव. त्याआधी सोसायटीच्या गणेशोत्सवात नाटक केलं होतं. पण आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचा माहोलच भन्नाट असतो. प्रेक्षकांतून होणारी हुर्यो, दुसऱ्या गटाचं नाटक पाडण्यासाठी होणारी थट्टा असा सगळा अटीतटीचा मामला. तर एकांकिकेला सुरूवात झाली. दिलीपजींचा पहिला संवाद होता, “नमस्कार! मी राणीच्या बागेतून आलोय.” प्रेक्षकांतून कुणीतरी ओरडलं, “तिथलाच वाटतोय.” ते ऐकून दिलीपजी मनात थोडे घाबरले. पण एवीतेवी भंकसच होणार तर मन‌ लावून तरी काम करू म्हणून त्यांनी मनापासून काम केलं.

आणि आश्चर्य म्हणजे फक्त विनोदी एकांकिकांत रमणारा विद्यार्थी वर्ग बघता बघता गप्प झाला. नाटकाच्या शेवटी दिलीपजी ज्या तरुणाची भूमिका करत होते त्याचा खून होतो आणि वेदनेने तो खाली कोसळतो. नायकाने तडफडत म्हटलेल्या वाक्यांनी एकांकिका संपली. पण प्रथमच एकांकिकेत काम करणाऱ्या दिलीपजींना पडदा पडला का नाही याची खात्री नसल्याने ते तसेच पडून राहिले. दिलीपजींच्या नाटकाची प्रॉपर्टी हलवून पुढच्या एकांकीकेची प्रॉपर्टी लावण्याचं काम वेगानं झालं. आणि मग कुणाच्या तरी लक्षात आलं. आधीच्या एकांकिकेतला ॲक्टर स्टेजवर तसाच पडून आहे. मग दिलीपजींना हळूच थोपटून उठवण्यात आलं.

Dilip Prabhavalkar
Dilip Prabhavalkar

दोन दिवसांनी रिझल्ट आला. एकांकिकेला आणि दिलीपजींना दोघांनाही बक्षीस मिळालं होतं. नोटीस बोर्डवर निकाल लावण्यात आला. तेव्हा या नव्या यशाची इतकी अपूर्वाई असायची की दिलीपजी दोन तीन दिवस वेगवेगळ्या मित्रांबरोबर अगदी सहजच आल्यासारखे त्या नोटीस बोर्डच्या  आसपास फिरत. नोटिसबोर्डकडे थबकून, “अरे वाह निकाल लागला वाटतं” असं म्हणून नोटीस वाचत. मग आजुबाजुच्या मंडळींकडून अभिनंदन होई. नवं असताना ही दादही तितकीच महत्त्वाची.

कॉलेज दिवसांत हा सगळा वेडेपणा माफ असतो. पण हे कधीही न मावळणारे कॉलेजचे दिवस कलाकार म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात नाटकाचे जे वेड पेरतात, त्यातूनच एखादा अभिनयाचा वटवृक्ष बहरतो हे दिलीप प्रभावळकर यांच्या कडे पाहिल्यावर नक्की पटतं.

=====

हे वाचलंत का: दिलीप प्रभावळकर यांच्या हसवाफसवीला जेव्हा मिळाली नटसम्राटाची दाद

=====

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Drama Entertainment Marathi Natak Natak Theatre
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.