Indeevar : संगीतकार आनंदजी यांनी इंदीवर यांना सुचवले होते हुक

‘शोले’ तील ‘महबूबा महबूबा’ हे गाणे किशोर कुमार गाणार होता?
भारतातील सर्वात ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झालेला शोले आज पन्नासाव्या वर्षात देखील रसिकांमध्ये आपली लोकप्रियता टिकवून आहे. हा चित्रपट तसा ॲक्शन सिनेमा होता यात संगीताला तशी फारशी जागा नव्हती. तरी यातील ‘मेहबूबा मेहबूबा’ या गाण्याने अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली. आज इंटरनेटच्या जमान्यात देखील या गाण्याला प्रचंड मागणी आहे. या गाण्याच्या मेकिंगची गोष्ट खूप भन्नाट आहे.

मूळात हे गाणं राहुल देव बर्मन तथा पंचम गाणारच नव्हते! मग हे गाणं त्यांच्याकडे आलं कसं? आणि मग हे गाणं कोण गाणार होते? खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे. शोले चित्रपटाच्या निर्मितीचा काळ १९७३ सालापासून सुरू होता. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत आर डी बर्मन यांचे होते. आता येवूयात मूळ किस्स्याकडे. ‘मेहबूबा मेहबूबा’ हे गाणं खरंतर किशोर कुमार (Kishore Kumar ) गाणार होते. त्यांना नजरेसमोर ठेवूनच आर डी बर्मन यांनी याची ट्यून तयार केली होती. या गाण्याचे एक स्क्रॅच व्हर्जन आर डी बर्मन यांनी गायले होते.
हे स्क्रॅच घेवून आपल्या घरी गेले तेव्हा त्यांनी बघितले की त्यांचे मामा कलकत्त्याहून त्यांना भेटण्यासाठी आले होते. पंचमचे मामा चांगले संगीत रसिक होते. औपचारिक गप्पा मारल्यानंतर मामांनी विचारलं, ”पंचम, सध्या काय करतोस?” त्यावेळेला त्यांनी शोले या चित्रपटाची माहिती दिली आणि एक मल्टीस्टार सिनेमाचे मी संगीत करत आहे असे सांगितले आणि दुपारीच केलेले स्क्रॅच व्हर्जन डायनिंग टेबलवरच ठेका घेवून गाऊन दाखवले. मामाला ते व्हर्जन खूप आवडले ते म्हणाले, ”हे गाणे कोण गाणार आहे?” पंचमने सांगितलं, ”किशोर कुमार!”(Kishore Kumar) तेव्हा मामा म्हणाले, ”अरे पंचम, हे गाणे तुझ्या आवाजात जास्त योग्य आहे!” त्यावर पंचम म्हणाला, ”नाही मामा, हे गाणे मी किशोर कुमारसाठी तयार केलेले आहे. तुम्ही बघा तो त्याच्या आवाजात काय जादू दाखवतो ते.” पण तरी मामाने सांगितले ,”खरं तर हे गाणे तुझ्या आवाजात जास्त योग्य आहे!” पंचम हि गोष्ट विसरून गेला.

नंतर जेव्हा फायनल रेकॉर्डिंगची वेळ आली त्या दिवशी सर्व म्युझिशिन्स, स्वतः दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि संगीत दिग्दर्शक पंचम किशोर कुमारची (Kishore Kumar) वाट पाहत रेकॉर्डिंग रूममध्ये बसले होते. पण त्या दिवशी नेमका किशोर मुंबईच्या बाहेर होता आणि मुंबईला येणारी त्याची फ्लाईट लेट झाली होती त्यामुळे तो वेळेवर येऊ शकत नव्हता. परंतु पंचमने स्वतः रिहर्सल करायला सुरुवात केली. याचे कारण किशोर (Kishore Kumar) आला की लगेच रेकोर्डिंग होवून जाईल. पण किशोरला उशीर होत होता. पंचम आता स्वत: गात रिहर्सल करू लागला.
हा सर्व प्रकार दुरून रमेश सिप्पी पाहत होते. ते तिथे आले आणि ते म्हणाले, ”किशोर कुमार (Kishore Kumar) येईल असं मला वाटत नाही हे गाणं तुमच्या आवाजात रेकॉर्ड करूया.” कारण रेकोर्डिंग रूमचा खर्च मोठा होता. पंचमने थोडा विरोध केला पण रमेश सिप्पी म्हणाले,” तुझी मागची दोन गाणी जबरदस्त लोकप्रिय झालेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे एकतर हे गाणं चित्रपटात नायकावर चित्रित नाही. जलाल लागा यांचा या चित्रपटात एक छोटासा कॅमीओ रोल आहे. त्यांच्यावर हे गाणे चित्रित आहे. त्यामुळे तुझ्या आवाजात रेकॉर्ड करायला हरकत नाही.

‘कांरवा’ या चित्रपटातील ‘पिया तू अब तो आजा…’ या गाण्यातील तुझी एकमेव लाईन ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ यामुळे हे गाणं सुपरहिट झालं. तसेच ‘अपना देश’ या चित्रपटातील ‘दुनिया मे लोगों को धोका कभी हो जाता है’ हे गाणं देखील तुझ्या आवाजात प्रचंड लोकप्रिय झाले. तर त्याचप्रमाणे हे गाणं देखील लोकप्रिय होईल.” पंचमने हो नाही करत नंतर हे गाणे स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केले. सर्व जण खूष झाले. (Kishore Kumar)
==========
हे देखील वाचा : किशोर कुमार यांनी संगीतकारासोबत भांडून अनुपमा देशपांडे सोबत गाणे गायले!
==========
रमेश सिप्पी यांनी सांगितले, ”पंचम लिहून ठेव. जर ‘शोले’ चित्रपट हिट झाला तर हे गाणं सुपरहिट होईल. पुढचे अनेक दशक हे गाणं प्रचंड लोकप्रिय राहील. ही गॅरंटी मी तुला आज देतो!” अशा पद्धतीने त्या दिवशी गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. काही दिवसानंतर जेव्हा पंचमने हे गाणे किशोर कुमारला ऐकवले तेव्हा किशोर कुमारने (Kishore Kumar)त्याला मिठीच मारली आणि म्हणाले,” पंचम यार तुने तो कमाल कर दिया!!” हा किस्सा शोलेच्या मेकिंगवरील अनुपमा चोप्रा यांच्या पुस्तकात सांगितला आहे.