Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kantara : A Legend Chapter 1 चित्रपटाने बॉलिवूडलाही टाकलं मागे!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आठवणीतला विकेंड: रविवार म्हणजे सहकुटुंब थिएटरमध्ये पाहिलेला चित्रपट ….

 आठवणीतला विकेंड: रविवार म्हणजे सहकुटुंब थिएटरमध्ये पाहिलेला चित्रपट ….
टॉकीजची गोष्ट

आठवणीतला विकेंड: रविवार म्हणजे सहकुटुंब थिएटरमध्ये पाहिलेला चित्रपट ….

by दिलीप ठाकूर 19/08/2022

फार पूर्वी रविवार म्हटलं की, दोन गोष्टी हमखास असत. एक म्हणजे, मावशी/मामा/काका यांच्याकडे आपण सहकुटुंब जाणार अथवा ते आपल्याकडे येणार आणि तेही सकाळपासूनच असणार, दुपारी खास जेवणाचा बेत (अनेकदा तरी भाकरी मटण अथवा कोंबडी वडे) आणि तात्कालिक नाटक/चित्रपट/राजकारण/क्रिकेट/साहित्य यावर आलटूनपालटून गप्पा. अजित वाडेकर, सुनील गावस्करपासून देव आनंद, राजेश खन्ना, धर्मेंद्र, मनोजकुमारला त्यात सल्ले, सूचना वगैरे वगैरे दिले जात. विशेष म्हणजे, त्या काळात घरोघरी टेलिफोन नसूनही बेत पक्के असत आणि घरी फोन नसणे ही काॅमन गोष्ट होती. त्यावाचून अडत नव्हते. (Weekend Movie Memories)

असे जाणे येणे नसेल तर, ‘रविवारचा हुकूमी एक्का’ म्हणजे, सहकुटुंब थिएटरमध्ये जाऊन सामाजिक कौटुंबिक (उपकार, हाथी मेरे साथी, मै सुंदर हू, बहारो के सपने, औलाद वगैरे) अथवा पौराणिक (बलराम श्रीकृष्ण, हर हर महादेव, जय संतोषी मा, श्रीकृष्ण लीला, कृष्ण सुदामा वगैरे) चित्रपट एन्जाॅय करणे. फरक इतकाच की, काॅलेजमध्ये गेल्यावर मित्रांसोबत शनिवार अथवा  रविवारचा मॅटीनी शो पाहणे. आता घरी फक्त कल्पना द्यायची की, मित्रांसोबत तिसरी मंझिल, ज्वेल थीफ, गुमनाम, वो कौन थी, परदे के पीछे, ऐलान असा थोडा अगोदरचा, पण आता मॅटीनीला आलेला एखादा चित्रपट पाहायला जातोय. मध्यमवर्गीय कुटुंबात तशीच पध्दत होती आणि ती मी अनुभवलीय. एकत्र कुटुंब पध्दतीचे ते दिवस होते. 

तो काळच तसा होता. ते दिवसच तसे होते. प्रत्येक शनिवार -रविवारी अगदी प्रत्येक थिएटरमध्ये प्रत्येक खेळ हाऊसफुल्ल असायचाच. मग तो चित्रपट हिट/सुपरहिट/सेमीहिट असो किंवा मराठी/हिंदी/इंग्लिश/ गुजराती/तमिळ/कन्नड असा कोणत्याही भाषेतील असो. तो नवा असो, जुना असो. सकाळी अकरा वाजता मॅटीनी शोचा असो किंवा दिवसा तीन खेळ असो. अगदी ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’लाच मार खाणारा असला तरी शनिवार-रविवारी मात्र हमखास हाऊसफुल्ल. याचे कारण म्हणजे, हिट चित्रपटाचे तिकीट मिळत नसले म्हणून काय झालं, शनिवार-रविवारी चित्रपट पाहायचा, तर मग ज्याचे तिकीट मिळतेय तो तरी पाहूया असा चित्रपटप्रेमी सकारात्मक विचार करीत आणि दुसऱ्या थिएटरला जायचं तर, ते किती अंतरावर आहे याची कल्पना असल्याने ज्याचं तिकीट मिळतंय तो पाहणं सोईस्कर ठरत असे. (Weekend Movie Memories)

एखाद्याच रविवारी एखाद्या चित्रपटाच्या दुर्दैवाने हाऊसफुल्लचा फलक नसे. मला आठवतंय, मेट्रो थिएटरमध्ये विनोद पांडे दिग्दर्शित ‘स्टार’ (१९८२) ला रविवार असूनही करंट बुकिंगची खिडकी उघडी होती आणि बुकिंग क्लर्क पब्लिकची वाट पहात होता. राजेंद्रकुमारला आपला पुत्र कुमार गौरव याला स्टार करण्याची नको तितकी घाई झाली होती. त्यातला हा पडद्यावर आला तोच पडला (तरी आवाज आला नाही) असा चित्रपट. रति अग्निहोत्री यात कुमार गौरवची नायिका होती. 

अशा एखाद्याच चित्रपटाच्या नशीबी रविवार हाऊसफुल्ल नसे. अन्यथा तनुजा राजेश खन्ना, मौशमी चटर्जी यांच्या ‘हमशकल’ला फ्लाॅप म्हटले गेले तरी तीन चार आठवड्यानंतरही अप्सरा थिएटरमध्ये रविवारचे सगळेच शो हाऊसफुल्ल होते. आर. डी. बर्मनचे म्युझिक भारी होते. गाणी हिट होती. राकेश रोशन आणि राखीची भुमिका असलेला ‘आखो आखो मे’ खास चित्रपट नाही, असे म्हटले तरी रविवारी स्वस्तिकला हाऊसफुल्ल. जोगिंदरच्या ‘बिंदीया और बंदूक’ असो वा ‘दो चट्टाने’ असो. रविवारी हमखास हाऊसफुल्ल. 

रिपिट रनचे चित्रपटही सत्तरच्या दशकात रविवारी हाऊसफुल्ल असत. इव्हिनिंग इन पॅरीस, तीन देविया,  तुमसा नही देखा, असे साठच्या दशकातील चित्रपट नंतर एका आठवड्यासाठी रिपिट रनला आले की, रविवारी हमखास हाऊसफुल्ल. या रविवार संस्कृतीचे आणखीन एक विशेष म्हणजे, चित्रपट कोणताही असो, ब्लॅक मार्केटमधील दर चढे असत. ते आम्हा मध्यमवर्गीयांना परवडत नसत. ती तिकीटे घेणे हे आपले काम नाही असे त्या काळात लहानपणापासूनच जणू संस्कार केले जात. हा माझा अनुभव. त्या काळात सकाळी दहा ते पाच अशी नोकरीची वेळ आणि रविवारी सुट्टी असे. “रोज संध्याकाळी सातच्या आत घरात” ही शालेय वयातील अट होती.  (Weekend Movie Memories)

आणखीन एक विशेष गोष्ट सांगतो. मला आठवतंय, ग्रॅन्ट रोडच्या ड्रीमलॅन्ड थिएटरला प्रत्येक रविवारी सकाळीच साडेआठ नऊ वाजता एखाद्या दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील अर्थात कन्नड अथवा तमिळ, तेलगू चित्रपटाचा शो असे आणि तो हमखास हाऊसफुल्ल असे माझ्या लक्षात आले. इतक्या सकाळीच पब्लिक आपल्या भाषेतील चित्रपट पाहायला येताहेत याचे मला विशेष कौतुक होते. म्हणून मी अधिक शोध घेतला असता मला समजले की, एक म्हणजे मुंबईतील विविध भागातून हे साऊथ इंडियन चित्रपट रसिक ड्रीमलॅन्डला येतात आणि या चित्रपटांच्या निमित्ताने आपल्याच काही कुटुंबियांशी/मित्रांची अथवा गावच्या ओळखीशांशी त्यांची भेट होते. (आपल्याकडचा पिक्चर अशा अनेक लहान मोठ्या गोष्टी घडवत असतो, असे मी कायमच म्हणतोय, याचे कारण म्हणजे हे मी स्वत: अनुभवलय. म्हणून मी कधीच असे चित्रपट काढावेत, तसे चित्रपट पहावेत असे म्हणत नाही. आपली चित्रपट पब्लिक संस्कृती वेगळीच आहे.)

बरं रविवारी कितीचाही शो पाहिला तरी घरी आल्यावर घरचेच जेवण जेवायची पध्दत होती. मराठी चित्रपट पाहायला जाताना एखाद्या छोट्याश्या डब्यात थालीपीठ, बटाटा पोहे अथवा भजी आणि जोडीला पाण्याची बाटली नेणारे आमच्या गिरगावात अनेक मध्यमवर्गीय होते. आपण चित्रपटाला जातो, यावरचा त्या काळातील फोकस इतका स्पष्ट असे की, घरुन निघाल्यापासूनच डोळ्यासमोर त्याचे थिएटर आणि पडद्यावरचा चित्रपट दिसायला लागे. 

रविवारी चित्रपट पाहायचा तर, त्याची अगोदरच्या सोमवारपासून आगाऊ तिकीट विक्री सुरु व्हायची. त्याच शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या मोठ्या नवीन चित्रपटाची रविवारची सर्वच्या सर्व तिकीटे खिडकी उघडताच तासाभरातच हाऊसफुल्ल होत. असा एखादा ‘आराधना’, ‘दो रास्ते’, ‘कटी पतंग ‘, ‘अपना देश’, ‘सच्चा झूठा’, ‘दुश्मन’, ‘आप की कसम’ असा राजेश खन्नाचा भारी हिट चित्रपट रविवारीच सहकुटुंब पाहायचा तर काही आठवडे थांबायलाच हवे, याची जणू सवय झाली होती. (Weekend Movie Memories)

तेव्हाच्या समाजात अनेक गोष्टींबाबत फार फार पेशन्स होते, संयम होता. बरं सुपरहिट चित्रपटाची हवा एवढी आणि अशी असे की, तो आपणही पाहायलाच हवा अशी साथ पसरे आणि तोच चित्रपट सतत जवळपास रोजच हाऊसफुल्ल असल्याने थोडी कळ सोसूया. काही आठवड्यानंतर आगाऊ तिकीट विक्रीची रांग कमी होत गेली की, रविवारची तिकीटे काढूया अशीच समजदारीची भावना असे. त्या काळात चित्रपट पाहायचा तर फक्त आणि फक्त थिएटरच होते. 

दूरदर्शन १९७२ साली मुंबईत आले तरी त्यात प्रत्येक शनिवारी संध्याकाळी जुना मराठी चित्रपट आणि रविवारी जुना हिंदी चित्रपट प्रक्षेपित होई आणि संपूर्ण चाळीत फक्त एकाच कुटुंबाकडे दूरचित्रवाणी संच असे. त्यात दाटीवाटीने बसून चित्रपट पाहिला जाई. आपल्या देशात चित्रपट जगण्याचा एक मार्ग हादेखील ठरला. 

आपल्या देशात १९८२ साली रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ कॅसेट यांचे आगमन होईपर्यंत थिएटरला पर्यायच नव्हता आणि त्यानंतरही बराच काळ ‘रविवारी थिएटरमध्येच पिक्चर पाहण्याची संस्कृती’ कायम राहिली. मल्टीप्लेक्स युगातही ती होती तरी आता नवश्रीमंत आणि उच्चभ्रू वर्ग रविवारी आपल्या गाडीतून मुव्हीज (आजची डिजिटल पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणतेय) एन्जाॅय करायला जाते आणि जाण्यापूर्वीच आज कोणत्या रेस्टॉरंटमध्ये (मागच्या रविवारचे नको हा त्यातला हुकमी फंडा) जायचे ते ठरवते.  (Weekend Movie Memories)

मुव्हीज संपताच आज इटालियन फूड खायचे की, काॅन्टीनेंटल असे ते ठरवतात आणि माॅकटेल अथवा काॅकटेल (बिअर अथवा वाईन वगैरे) रिचवताना फूडवर बोलतात. त्यांना रविवारी मुव्हीज पाहायचा नसेल, तर एक तर हाॅटेलींग (थोडे शहराबाहेर जात धाबा जास्त पसंत केला जातो). अथवा दोन दिवसांची इगतपुरी/ अलिबाग/ मुरुड/ कर्जत/ लोणावळा अशी आपल्याच गाडीने झक्कास पिकनिक. आजच्या युगाचा शनिवार रविवार हा असा असतो. 

पूर्वी रविवारी चित्रपट पाहून आलेल्या कुटुंबात घरच्या जेवणात वेळी (तेही खाली बैठक मारुन जेवण) आजच्या चित्रपटाने काय दिले, यावर चर्चा होई. एकादा राजेश खन्नाचा चाहता घास तोंडात असतानाच त्याने कसा भारी अभिनय केला, गाणी कशी हिट आहेत यावर बोलले जाई. मग चाळीत, मुले शाळेत, पालक ऑफिसात याच चित्रपटावर भरभरुन बोलत आणि त्यात जर तोच चित्रपट पाहणारा असेल, तर गप्पा रंगल्याच समजा. हे सगळेच पुढचा चित्रपट पाहीपर्यंत पुरे आणि तो रविवार आणखी तीन चार आठवडयांनी येई आणि मग पुन्हा एकदा तशाच आनंदाची जणू रिमेक.  (Weekend Movie Memories)

========

हे देखील वाचा – इंग्रजी चित्रपटांच्या विचित्र हिंदी नावांचे अलेक्झांड्रा थिएटर

========

पूर्वीचे रविवार वेगळे असत. हक्काची सुट्टी असे. कुटुंबासह आपले नातेवाईक अथवा आसपास फिरावयास अथवा एखादा चित्रपट पाहण्याची सवय होती. आठवड्यातील सोमवार ते शनिवार या काळातही चित्रपट पाहता येत होता, पाहिलाही जाई. पण रविवारी चित्रपट पाहण्याचा मूड काही वेगळाच अनुभव असे. आज वयाची पन्नाशी ओलांडलेल्याना आवर्जून या अशा संस्कृतीबद्दल विचारा. त्यांना असे अनेक रविवार आठवतील. आता मात्र अनेक मुव्हीज रविवारीही हाऊसफुल्ल होत नाहीत, अशी आणि इतकी या ‘रविवारचा पिक्चर संस्कृती’ला उतरती कळा लागलीय…. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood bollywood update Celebrity Entertainment Weekend Movie Memories
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.