‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

जेव्हा Amitabh Bachchan आणि धर्मेंद्रचे सिनेमे एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले!
आपल्याकडे सिनेमाच्या रिलीज डेटला खूप महत्त्व असतं. सिनेमाचे बॉक्स ऑफिस त्या तारखेवर निर्भर असते. जनरली सण जसे दिवाळी, ईद,नाताळ, गणपती किंवा लॉंग वीकेंड सुट्ट्या चित्रपटाच्या रिलीज साठी निवडल्या जातात. अलीकडच्या मल्टिप्लेक्स च्या काळामध्ये सिनेमाचा रौप्य महोत्सव होणं खूप अवघड गोष्ट झाली आहे पण जेव्हा सिंगल स्क्रीन थिएटर्स होते त्यावेळेला मात्र या सिनेमाच्या रिलीज ला खूप महत्त्व दिले जायचे. या काळात बऱ्याचदा एकाच दिवशी किंवा लागोपाठच्या आठवड्यात सिनेमे रिलीज व्हायचे आणि त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्यात टक्कर व्हायची. कारण प्रेक्षक वर्ग सरळ सरळ विभागला जायचा.

आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’ आणि अनिल शर्मा यांचा ‘गदर: एक प्रेम कथा’ एकाच दिवशी १५ जून २००१ या दिवशी प्रदर्शित झाले होते. पण दोन्ही सिनेमांनी व्यवस्थित बिजनेस केला. कारण दोन्ही सिनेमाचे जॉनर टोटली वेगळे होते. १९८२ साली एकदा अशीच टक्कर अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या सिनेमांची झाली होती. दोन्ही सिनेमाचे जॉनर देखील वेगळे होते. त्यामुळे या दोन्ही सिनेमांनी त्या काळात चांगला बिझनेस केला होता. पण या सिनेमाच्या टकरी बद्दल त्या काळातील मिडीयात खूप चर्चा रानागली होती. कोणते होते तो दोन चित्रपट आणि काय होता नेमका किस्सा?
16 एप्रिल 1982 या दिवशी गोल्डी विजय आनंद यांनी दिग्दर्शित केलेला ‘राजपूत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. धर्मेंद्र, राजेश खन्ना, विनोद खन्ना, हेमामालिनी, टीना मुनीम, रंजीता अशी तगडी जबरदस्त स्टार कास्ट असलेला मल्टीस्टारर चित्रपट ‘राजपूत’. खरंतर हा सिनेमा खूप काळापासून निर्मिती अवस्थेत होता. 1976 साली हा सिनेमा लॉन्च झाला होता. त्यात अनेक बदल होत गेले. स्क्रिप्ट मध्ये खूप बदल झाले. काही कलावंत बदलले गेले आणि तब्बल सहा वर्षानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला.

गोल्डी विजय आंनंद यांनी आपल्या पुस्तकामध्ये “हा सिनेमा करताना मी पार वैतागून गेलो होतो!” असे सांगितले आहे. या काळात विजय आनंद दोन मोठ्या चित्रपटांवर काम करत होते आणि दोन्ही सिनेमे मल्टीस्टारर होते. पैकी एक होता ‘राजपूत’ आणि दुसरा होता ‘राम बलराम’ दोन्ही सिनेमात बडी बडी स्टार कास्ट असल्यामुळे चित्रपट खूप स्लोली बनत गेले. ‘राजपूत’ या चित्रपटाचे कथानक चांगले होते. कथानक निम शहरी भागातले होते. तिथले राजकीय संघर्ष दाखवणारे होते राजपूत घराण्याचा भावनिक संघर्ष या चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने दाखवला होता.
या नंतरच्या पुढच्या शुक्रवारी म्हणजे 23 एप्रिल 1982 या दिवशी मनमोहन देसाई यांचा ब्लॉकबस्टर ‘देशप्रेमी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मनमोहन देसाई यांचे चित्रपट म्हणजे तसे मनोरंजनाच्या नावाखाली वाट्टेल ते या सदरात मोडणारे! हा चित्रपट देखील त्याला अपवाद नव्हता. फक्त याला देशभक्तीची फोडणी दिली होती. हा सिनेमा देखील मल्टीस्टारर होता अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता. सोबत शम्मी कपूर, उत्तम कुमार, प्रेमनाथ, हेमामालिनी, शर्मिला टागोर यांच्या भूमिका होत्या. ‘राजपूत’ आणि ‘देशप्रेमी’ या दोन्ही चित्रपटांना संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते आणि दोन्ही चित्रपटातील गाणी त्या काळात खूप गाजली होती.

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाची त्या काळात प्रचंड हवा असायची. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर पहिले दोन-तीन आठवडे त्या चित्रपटाला प्रचंड गर्दी होत असायची. यावेळी असंच झालं. ‘देशप्रेमी’ प्रदर्शित झाला आणि ‘राजपूत’ या चित्रपटाची गर्दी काहीशी कमी झाली. पण तीन-चार आठवड्यानंतर पुन्हा एकदा ‘राजपूत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची गर्दी खेचायला सुरुवात केली. यावर्षीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बघितले तर ‘राजपूत’ या चित्रपटाचे कलेक्शन ‘देश प्रेमी’ पेक्षा जास्त होते.
================================
हे देखील वाचा : Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..
================================
‘राजपूत’ या चित्रपटात राजेश खन्ना, विनोद खन्ना यांच्या देखील दमदार भूमिका होत्या. ‘अकेला गया था मै न आया अकेला मेरे संग संग आया तेरी यादों का मेला…’ हे किशोर कुमार चे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. तसेच धर्मेंद्र वर चित्रित ‘कहानीया सुनाती है पवन आती जाती है…’ या रफीने गायलेल्या गाण्याला देखील चांगली लोक प्रियता मिळाली होती. दुसरीकडे ‘देशप्रेमी’ या चित्रपटातील ‘खातून के खिदमत मे सलाम आपुन का’, ‘जाते हो तो जाओ पर इतना सोच लो’, ‘गोरे नही हम काले सही’ या गाण्यांनी पब्लिकला खुश केले होते. इन शॉर्ट लागोपाठच्या आठवड्यात प्रदर्शित होऊन देखील या सिनेमांनी एकमेकांच्या धंद्यावर परिणाम होऊ दिला नाही आणि दोन्ही सिनेमाने चांगला बिजनेस केला. 1982 चा सर्वाधिक हिट सिनेमा मात्र मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्सर होता!