‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
जेव्हा अनिल कपूरला आले होते धमक्यांचे फोन; हे फोन करणारी व्यक्ती होती…
सिनेमाच्या बेहिशेबी दुनियेत प्रत्येक जण कायम आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत राहतो. दहा दहा वीस वीस वर्ष हिट झालेला कलावंत देखील त्याच्या आगामी कलाकृतीसाठी पुन्हा नव्याने सज्ज होत असतो आणि स्वतःला सिद्ध करत असतो. प्रत्येकासाठी इथे अस्तित्वाची लढाई असते. अस्तित्व टिकलं तरच आपण टिकू असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे यासाठी बऱ्याचदा काही कलाकार कोणत्याही थरावर जायला तयार असतात. असाच एक किस्सा नव्वदच्या दशकातला आहे. (Anil Kapoor received a threat call..)
त्यावेळी दिग्दर्शक सुभाष घई ‘त्रिमूर्ती’ नावाचा एक मल्टीस्टारर सिनेमा बनवत होते. या सिनेमात संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि शाहरुख खान हे तिघे पहिल्यांदाच एकत्र येणार होते. या चित्रपटात मराठी चित्रपट आणि नाटकातील ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे पहिल्यांदाच बॉलिवूडच्या चित्रपटात फुल लेंथचा खलनायक रंगवणार होते.
चित्रपटाचे कास्टिंग झाले. पण त्याच वेळी अभिनेता संजय दत्तचे आणि अंडरवर्ल्डचे संबंध उघड झाले. आणि टाडा कोर्टाने त्याला अटक केली. संजय दत्त जेलमध्ये गेल्यानंतर कित्येक निर्मात्यांचे धाबे दणाणले. कारण त्याचे बरेचसे चित्रपट फ्लोअरवर होते. काही चित्रपट अर्धवट बनले देखील होते. संपूर्ण बॉलीवूड या प्रकरणाने हादरून गेले होते.
सुभाष घई यांचा ‘त्रिमूर्ती’ हा चित्रपट फक्त कागदावर बनला होता. त्याचे शूटिंग सुरू व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी संजय दत्तच्या जागी नवीन अभिनेत्याची निवड करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी सनी देवल यांना अप्रोच केले. परंतु तारखांचे कारण देत त्याने नकार दिला. त्यानंतर या भूमिकेसाठी अनिल कपूर (Anil Kapoor) व आदित्य पंचोली यांच्या नावाचा देखील विचार सुरू झाला. पण कुठलेच नाव फायनल होत नव्हतं.
याच काळात एक मोठी ‘ब्रेकिंग न्यूज’ आली. अभिनेता अनिल कपूरला धमक्यांचे फोन यायला सुरुवात झाली. या थ्रेटनिंग कॉल मध्ये अनिल कपूरला जीवे मारण्याची धमकी मिळत होती. या कॉलमध्ये त्याने सुभाष घईच्या चित्रपटात काम करू नये, असा देखील आदेश मिळत होता. सुरुवातीला अनिल कपूरने सर्व गमतीचा भाग म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. पण सलग आठ दिवस धमक्यांचे फोन आल्यामुळे तो घाबरला. आणि त्याने ही बातमी आपला मोठा भाऊ बोनी कपूर याला सांगितली. (When Anil Kapoor received a threat call)
त्याकाळात हिंदी सिनेमात अंडरवर्ल्डच्या लोकांचा मोठा बोलबाला होता. संजू बाबाचे प्रकरण ताजे होते. आधी संशयाची सुई तिकडेच गेली कारण अनिल कपूरला तोच रोल ऑफर झाला होता. बोनी कपूरने सर्व प्रकरण गांभीर्याने घेतले आणि बांद्रा पोलीस चौकीमध्ये यासंदर्भात रीतसर तक्रार केली.
पोलिसांनी सलग दोन-चार दिवस अनिल कपूरचे फोन टॅप केले त्यातून त्यांना असे लक्षात आले की, हे धमकीचे फोन जुहूच्या हॉटेल सी किंग मधून येत आहेत. पोलिसांनी हॉटेलच्या रूमवर धाड टाकली. तिथे त्यांना ही रूम आदित्य पंचोलीने बुक केल्याचे समजले आणि तिवारी नावाचा एक इसम तिथून अनिल कपूरला रोज धमक्या देत होता. पोलिसांनी तिवारीला लगेच अटक केली.
==============
हे ही वाचा: पद्मिनी कोल्हापूरेच्या थोबाडीत मारण्यासाठी वापरला न्यूटनचा नियम!
खराखुरा ‘सुपरहिरो’ फरहान अख्तर; जीवाची बाजी लावून वाचवले एका कर्मचाऱ्याचे प्राण
=============
सुरुवातीला आदित्य पांचोलीने या प्रकरणाची माझा काहीही संबंध नाही असे सांगितले, पण पोलिसांनी पोलीस हिसका दाखवून त्याच्याकडून वदवून घेतले. पुढे काही दिवस ही केस चालली. पण नंतर बोनी कपूरनेच ही केस मागे घेतली. यातून एक झालं आदित्य पंचोलीचा पत्ता कट झाला आणि अनिल कपूर याचा ‘त्रिमूर्ती’ या सिनेमांमध्ये समावेश झाला. पुढे ‘त्रिमूर्ती’ हा चित्रपट बनला. एस मुकुल आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. सिनेमात ठासून मसाला भरला होता. पण दुर्दैवाने सुभाष घई यांचा हा सर्वात सुपर फ्लॉप सिनेमा ठरला.