‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
विरुष्का जेव्हा एकत्र काम करतात…
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या कपलची सध्या चांगलीच चर्चा आहे. खासकरून यांनी एकत्र केलेल्या जाहिरातींमुळे तर हे दोघे चांगलेच चर्चेत असतात. अशाच एका जाहिरातीसाठी या दोघांनी घेतलेल्या मानधनाचा आकडा समोर आला आहे.
२०१७ मध्ये विवाह बंधनात अडकलेल्या विरुष्काची, खरं तर २०१३ साली एका कमर्शियल शूट दरम्यान मैत्री झाली.आणि त्यानंतर हि जोडी आपल्याला अनेक मोठमोठ्या ब्रॅन्डच्या जाहिरातींमधून दिसू लागली.एका अग्रगण्य न्यूज पोर्टलच्या अहवालानुसार, मागील वर्षात एकत्र जाहिरात करण्यासाठी या जोडीने साधारण १० करोड रुपयांची मागणी केली होती . नवनवीन फॅशन अॅपरेल्स आणि स्पोर्ट्स अॅक्सेसरीजचे ब्रॅन्डींग यांनी आत्तापर्यंत केले आहे. मात्र हे दोघेही जाहिरातीमध्ये एकत्र हवे असल्यास तशी किंमत मात्र मोजावी लागत आहे.
मानधन बरच जास्त असलं, तरी त्यांच्या चाह्त्यांमध्ये त्यांच्याबद्दलची क्रेझ प्रचंड असल्याने त्यांच्या जोडीमुळे ब्रॅन्डच्या प्रसिद्धीत भर पडते. त्यामुळे मोठमोठ्या ब्रॅन्डने विरुष्काला पसंती दिली आहे.