
Dharmendra यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता चित्त्या सोबत फाईट करून सेटवरील लोकांचे प्राण वाचवले होते!
हिंदी सिनेमातील ही मॅन धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या बाबतचे अनेक किस्से आता पुन्हा नव्याने वाचायला मिळाले ऐकायला मिळाले. त्यातीलच एक महत्त्वाचा किस्सा. धर्मेंद्र यांनी एकदा एका सिनेमाच्या सेटवर एका चित्त्यापासून संपूर्ण युनिटचे प्राण वाचवले होते. हा चित्ता इतका बेभान झाला होता चिडला होता की नक्कीच त्याने सेटवर काही लोकांचा प्राण घेतला असता. त्याचे पहिले टार्गेट तर धर्मेंद्रच होता . पण धर्मेंद्रने आपल्या जीवाची पर्वा न करता बाजी लावून त्या हिंस्त्र प्राण्यापासून संपूर्ण युनिटचे प्राण वाचवले होते. कोणता होता तो चित्रपट आणि काय होता नेमका किस्सा?

दिग्दर्शक मोहन सहगल यांनी १९७९ साली धर्मेंद्र, रेखा, विनोद मेहरा आणि उत्पल दत्त यांना घेऊन एक चित्रपट बनवला होता ‘कर्तव्य’. हा चित्रपट एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. हा सिनेमा डॉ. राजकुमार (“गंधडा गुडी”) अभिनीत हिट कन्नड चित्रपटाचा रिमेक होता. जो नंतर तेलुगूमध्ये (‘अदवी रामुडू’) बनवण्यात आला आणि एन टी रामाराव प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमात धर्मेंद्रने एका डॅशिंग फॉरेस्ट ऑफिसरची भूमिका केली होती. या चित्रपटात एक सीन होता ; ज्यामध्ये धर्मेंद्रला एका चित्त्यासोबत फाईट करायची होती. यासाठी एक चित्ता त्याच्या ट्रेनर सोबत सेटवर आणला गेला. हा चित्ता तसा पाळीव होता त्यामुळे युनिटमधील लोकांचे भय काहीसे कमी झाले. चित्रपटाचे दिग्दर्शक मोहन सहगल यांनी मात्र धर्मेंद्रला या शॉटसाठी बॉडी डबल वापरण्याचा सल्ला दिला. कारण ते कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ इच्छित नव्हते. परंतु धर्मेंद्रने हा शॉट मीच देणार असा आग्रह केला. यापूर्वी आपण ‘आंखे’ आणि ‘मां’ या चित्रपटात प्राण्यांसोबत शॉट दिले आहेत असे धर्मेंद्र ने सांगितले. दिग्दर्शक कबूल झाले.
या शॉटच्या रिहर्सलच्यावेळी चित्ता सुरुवातीला चांगला कोऑपरेट करत होता. त्याचा ट्रेनर देखील सेटवर उपस्थित असायचा. जेव्हा या सीनच्या फायनल शूटची तयारी सुरू झाली तेव्हा पिंजऱ्याचे दार उघडले गेले. दिग्दर्शकाने ॲक्शन हा शब्द उच्चारला. लाईट्स कॅमेरा सर्व ऑन आणि चित्त्याचे डोळे चमकले. ब्राईट लाईटमुळे तो गोंधळला. सेटवर लोकांची गर्दी देखील खूप जास्त होती. त्यामुळे तो बिथरला आणि त्याने पिंजऱ्यातून थेट धर्मेंद्रच्या अंगावर उडी घेतली. धर्मेंद्रला हे सर्व अनपेक्षित होते. त्याने बाका प्रसंग ओळखला. ताबडतोब त्या चित्याची मान आपल्या हातात पकडली आणि त्याची मान दाबून धरली. चित्ता तर जोरदार प्रतिकार करत होता. पण धर्मेंद्रने तो भयानक प्रसंग ओळखला होता. जर त्याच्या हातून थोडी जरी पकड ढिली झाली असती तर चित्याचे पहिलं टार्गेट धर्मेंद्रच होता आणि त्याने सेट वरील लोकाना जखमी केले असते किंवा त्यांना चक्क खाऊन टाकले असते!

कारण चित्ता प्रचंड चिडलेला होता. हा प्रसंग काही मिनिटांचा होता, पण गलीतगात्र करणार होता. ट्रेनर सेटवर होतात त्याने ताबडतोब घटना स्थळी धाव घेतली. आणि त्या बिथरलेल्या चित्त्याला त्याने काबूत आणले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निष्पास टाकला आणि सर्वांनी धर्मेंद्र चे प्रचंड कौतुक केले. कारण त्याच्या बहादूरीने सर्वांचे प्राण वाचले होते. धर्मेंद्रच्या हातून जर तिथे थोडी जरी बेपर्वाई झाली असती तर सेटवर अनेकांच्या जीवावर बेतले असते. अलीकडे समाज माध्यमावर हा किस्सा सांगताना; बऱ्याच जणांनी या धर्मेंद्र चित्त्याच्या या फाईट सीनमध्ये चित्याचा जीव गेला अशा बातम्या देखील पसरवल्या आहेत. पण त्यात काही तथ्य नाही.
================================
हे देखील वाचा : अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!
================================
दिग्दर्शकाने यानंतर मात्र पुढील शूट करताना मोठी काळजी घेतली. आजच्या काळात असा शॉट घेणे शक्यच नाही कारण आता पशु संरक्षणाचे खूप कायदे आलेले आहेत. असे म्हणतात दिग्दर्शकाला यानंतर वन विभागाला काही दंड देखील भरावा लागला. मोहन सहगलने ६० आणि ७० च्या दशकात बॉक्स ऑफिसवर यशस्वी चित्रपटांची मालिका दिली तेव्हा ते सर्वात यशस्वी होते. ‘कर्तव्य’ साठी, त्यांना लेखक एस अली रझा यांची मोठी साथ लाभली . एस अली रझा “अंदाज”, “आन”, “मदर इंडिया” आणि “रेश्मा और शेरा” सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची पटकथा लिहिली होती.