Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amitabh Bachchan यांच्या कोटींच्या संपत्तीचा कोण होणार वारसदार? बिग बीने दिलं स्पष्ट उत्तर म्हणाले… 

 Amitabh Bachchan यांच्या कोटींच्या संपत्तीचा कोण होणार वारसदार? बिग बीने दिलं स्पष्ट उत्तर म्हणाले… 
कलाकृती विशेष

Amitabh Bachchan यांच्या कोटींच्या संपत्तीचा कोण होणार वारसदार? बिग बीने दिलं स्पष्ट उत्तर म्हणाले… 

by Team KalakrutiMedia 10/06/2025

Amitabh Bachchan: बॉलीवूडचा शहंशहा अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित आणि आदर्श जोडप्यांपैकी एक आहेत. अभिनय, कर्तृत्व आणि व्यावसायिक शिस्तीच्या बाबतीत बच्चन कुटुंबाने कायमच उच्च स्थान मिळवलं आहे. पण आता पुन्हा एकदा हे कुटुंब चर्चेत आलंय ते त्यांच्या संपत्तीच्या वाटपावर दिलेल्या जुन्या वक्तव्यामुळे. एका माध्यम संस्थेच्या रिपोर्टनुसार, 2024 पर्यंत अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती सुमारे 1,600 कोटी रुपये इतकी आहे. अनेक बड्या ब्रँड्सचे अॅम्बेसेडर असलेले आणि ‘कौन बनेगा करोडपती’सारख्या सुपरहिट शोचे सूत्रसंचालन करणारे बिग बी, अजूनही सक्रियपणे कार्यरत आहेत. पण त्यांच्या संपत्तीचा वारसदार कोण असेल, यावर एक जुना 2011 मधील इंटरव्ह्यू सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. (Amitabh Bachchan Property)

Amitabh Bachchan Property

अमिताभ बच्चन यांनी त्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की, त्यांच्या संपत्तीचा समान वाटा त्यांच्या मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन नंदा यांना दिला जाईल. त्यांनी सांगितलं, “लोक म्हणतात मुलगी परकं धन असते, पण आमच्यासाठी श्वेता देखील अभिषेक इतकीच जवळची आहे. तिचाही त्या सर्व गोष्टींवर तितकाच अधिकार आहे.” जया बच्चन आणि अमिताभ यांनी खूप पूर्वीच हे निश्चित केलं होतं की, संपत्तीबाबत कोणतीही मुलगा मुलगी असा भेदभाव न करता न्याय केला जाईल.

Amitabh Bachchan Property

मध्ये अशा चर्चा देखील आहेत की, ‘जलसा’ नावाचं बच्चन कुटुंबाचं प्रसिद्ध बंगला श्वेताला गिफ्ट म्हणून दिलं गेलं आहे, ज्याची अंदाजे किंमत ५० कोटी रुपये आहे. श्वेताने अभिनयात प्रवेश न करताही आपल्या वडिलांच्या नजरेत समान स्थान मिळवलंय, हे यातून दिसून येतं.अमिताभ यांनी मुलाखतीत अभिषेकबद्दल बोलताना सांगितलं होतं की, त्यांचं आणि अभिषेकचं नातं केवळ बाप–मुलाचं नाही, तर मैत्रीचं आहे. त्यांनी अनेकदा याचा उल्लेख केलाय की, आपल्या मुलाशी मैत्रीचं नातं असावं अशीच त्यांची इच्छा होती आणि अभिषेक त्याच अपेक्षांवर खरा उतरतो.  कायम सक्रिय असलेले अमिताभ बच्चन अजूनही बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत.(Amitabh Bachchan Property)

================================

हे देखील वाचा: ‘एक… दो… तीन’ ते मोहिनी पर्यंतचा प्रवास: Madhuri Dixit च्या स्टारडमचा खास किस्सा!

================================

एका सिनेमासाठी ते 6 कोटींहून अधिक मानधन घेतात, तर ‘केबीसी’च्या एका भागासाठी त्यांना 5 कोटी रुपये मिळतात. त्यांच्या नावावर 20 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या लक्झरी गाड्या देखील आहेत. अमिताभ बच्चन यांचं हे वक्तव्य केवळ त्यांचं कुटुंब व्यवस्थापनच नव्हे, तर समाजाला एक सकारात्मक संदेश देणारं ठरतं — की मुलगी असो वा मुलगा, अधिकाराच्या बाबतीत दोघेही समान असावेत. बच्चन कुटुंबाचा हा दृष्टिकोन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.  

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Bachchan Amitabh Bachchan Amitabh Bachchan Property Celebrity Entertainment jaya bachchan shweta Bachchan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.