Tamannaah-Vijay : लग्नाच्या चर्चा सुरु असताना तमन्ना-विजयचं ब्रेकअप?

YouTube : नेटफ्लिक्स अन् प्राइमशी स्पर्धा करण्यासाठी YouTubeचा नवा अवतार येणार
जगात कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल किंवा जगात काय सुरु आहे याची माहिती घ्यायची असेल तर लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच हाती Youtube हे महत्वाचं शस्त्र असतं. शिवाय, युट्यूबवर ऑडिओच्या साहाय्याने आपण आपल्याला हवा असलेला व्हिडिओ देखील शोधू शकत असल्यामुळे सगळ्यात सोप्पं असं हे अॅप नक्कीच आहे. कोणत्या इतर ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन जरी नसलं तरी युट्यूबवर आवडत्या मालिका किंवा चित्रपट पाहण्याची मुभा आहे. पण आता युट्यूबमध्ये एक मोठा बदल होणार असून हे अॅप नेटफ्लिक्ससह इतर ओटीटी वाहिन्यांना टक्कर देणार आहे. (YouTube)
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच युट्यूब अपग्रेड होणार आहे. नेटफ्लिक्स, जिओ स्टार किंवा अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणे युट्यूबही सबस्क्रिप्शनवर आधारित कंटेंन्टवर भर देणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आपला आवडता कंन्टेंट पैसे भरुन तो पाहू शकतील. काही काळापूर्वी युट्यूबने प्राईमटाईम चॅनल्सची सुरुवात केली होती. (Social media policy)

सध्या YouTube जाहिरातींव्यतिरिक्त पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग शोधत असून त्यासोबतच युट्यूब प्लॅटफॉर्मचा संपूर्ण लेआउट देखील बदलला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, युट्यूब अॅपचा लेआउट पुन्हा डिझाइन केला जाईल. या अॅपला नेटफ्लिक्स किंवा जिओस्टारसारखा एक वेगळ लूक दिला जाण्याची शक्यता आहे. शिवाय, प्रेक्षकांच्या आवडीनुसार शो, सीरिज, चित्रपट रिलीज करुन युट्यूब सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना विविध सेवा दिल्या जातील.
याव्यतिरिक्त युट्यूबच्या नव्या लेआऊटमध्ये मेकर्स त्यांच्या शोचे एपिसोड आणि सीझनची झलक फ्रंट पेजवर दाखवू शकतात. सध्या हे फिचर युट्यूबवर उपलब्ध नाही आहे. प्रेक्षकांच्या सोयीनुसार त्यांचे आवडते शो पाहणं या नव्या बदलांमुळे सोप्पं होईल आणि पुढील काही दिवसांमध्येच युट्यूब युजर्सना एक नवीन लूक पाहायला मिळेल. (Digital India)
============
हे देखील वाचा :Tejashree Walawalkar : “…आणि माझ्यासाठी खास ‘ती’ भूमिका लिहिली गेली”
============
तसेच, YouTube ने अधिक माहिती देत म्हटले आहे की, “१२ मे पासून युट्यूब व्हिडिओमध्ये योग्य ब्रेकपॉइंट्सवर जाहिराती दिसतील. म्हणजेच,सध्या व्हिडिओच्या मध्यभागी कुठेही जाहिराती सुरू होतात. या नव्या बदलानुसार कंपनी कोणत्याही महत्वाच्या सीनदरम्यान किंवा डायलॉगच्या मध्येच कट करून जाहिराती दाखवू शकणार नाहीत आणि त्यामुळे व्ह्युअर्सना कोणताही अडथळा येणार नाही. सध्या प्रेक्षक थिएटरपेक्षा घरबसल्या विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर जगभरातील विविध भाषांमधील कंटेन्ट पाहण्यास प्राधान्य देत असल्यामुळे आता युट्यूबनेही महत्वाची पावले उचलली आहेत. (Entertainment update)