Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील

Jolly LLB 3: अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमनेसामने!

Manoj Bajpayee : “मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो”!

सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

Aatali Batami Phutli Trailer:  धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

मराठी टीव्ही मालिकेतील अभिनेता होणार बाबा; खास फोटो शेअर करत

Maharashtrachi Hasyajatra तून विशाखा सुभेदारने एक्झिट का घेतली? अभिनेत्रीने सांगितलं

Shubhvivah मालिकेतील अभिनेत्रीने लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर दिली गुड न्यूज !

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

36 Chowringhee Lane : अपर्णा सेनची पहीली कलाकृती

 36 Chowringhee Lane : अपर्णा सेनची पहीली कलाकृती
बात पुरानी बडी सुहानी

36 Chowringhee Lane : अपर्णा सेनची पहीली कलाकृती

by धनंजय कुलकर्णी 25/01/2025

भारतीय सिनेमाच्या इतिहासात अगदी मोजक्याच सिनेमातून अभिनय करून आपल्या कलाकृतीने आगळा वेगळा ठसा उमटविणार्‍यात एक नाव होतं जेनिफर कॅन्डॉल (Jennifer Kendal) या अभिनेत्रीचे. अभिनेता शशी कपूर (Shashi Kapoor) ची ती पत्नी होती. मेन स्ट्रीम सिनेमात आघाडीचा नायक असताना देखील शशी कपूरने काही कलात्मक चित्रपटांची निर्मिती केली या मागे त्याची पत्नी जेनिफरचा मोठा सहभाग आहे कारण ती मूळची नाटकातील अभिनेत्री होती. (36 Chowringhee Lane)

नाटक आणि सिनेमा या दोन्ही माध्यमांच्या ताकतीची तिला जाणीव होती. शेक्सपीयर (William Shakespeare)च्या नाटकांचे जगभर प्रयोग करणा‍र्‍या संचाची ती प्रमुख होती. एकदा भारताच्या दौर्‍यावर असताना तिची शशीसोबत १९५६ साली भेट झाली. तिच्या कलाप्रेमाने तो भारावला व चक्क तिच्या प्रेमात पडला. पुढे दोन वर्षांनी दोघांनी लग्न केले.(ती वयाने त्याच्याहून पाच वर्षांनी मोठी होती) १९८१ साली शशीने एक सिनेमा बनविला होता ’३६ चोरंगी लेन’ (36 Chowringhee Lane) एक अभिजात चित्रपट म्हणून तो आजही अठवला जातो अभ्यासला जातो. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट होता.

या (36 Chowringhee Lane) सिनेमाची कथा तिचीच होती. १९७० सालच्या कलकत्याच्या वातावरणातील या कथेत एका अ‍ॅंग्लो इंडीयन महिलेची शोकांतिका आहे. स्वातंत्र्य मिळून देशाला वीसेक वर्ष होऊन गेली आहेत. अनेक अ‍ॅंग्लो इंडीयन देश सोडून निघून गेले; काही इथेच राहिले. त्यातलीच ही कथेची मध्यवर्ती व्यक्तीरेखा रंगवणारी व्हॉयोलेट स्टॉनहेम म्हणजेच जेनिफर. पन्नाशीच्या पुढची ही बाई एकाकी आहे. गतकाळातील आठवणी हाच तिच्या जीवनाचा आधार. तिची एक पुतणी ऑस्ट्रेलियात असते तिची आलेली पत्र तिच्या गद्य जीवनावरची हिरवळ असते. ती एका शाळेत शेक्सपीयर शिकवित असते.

कलकत्याच्या ’36 Chowringhee Lane’ (36 Chowringhee Lane) मध्ये तिचं वास्तव्य असतं. एक भाऊ दुर्धर आजाराने इस्पितळात उपचार घेत असतो. घरातील तिच्या एकाकीपणात तिचं लाडकं मांजर आणि चावीचा ग्रामोफोन हेच तिच्या विरंगुळ्याची साधनं. चर्च मध्ये जायचं, आपल्या आप्तेष्टांच्या कबरीवर फुलं वहायची, मेणबत्ती लावायची असे काही साप्ताहिक कार्यक्रम सोडल्यास सारा दिवस तिला खायला उठत असतो. तिच्या आयुष्यात नवं आनंदी वेगळं असं काही घडतच नसतं काळ जणू तिच्यासाठी थांबलेला असतो. असं एकाकी, गद्य. कंटाळवाणं आयुष्य जगणार्‍या स्टॉनहेमच्या जीवनात अचानक आनंदाचे क्षण येतात.

तो ख्रिसमसचा दिवस असतो. सर्वत्र आनंदाच्या सुखद गारव्याचे वातावरण असते. चर्चमधून बाहेर पडताना तिला तिची जुनी विद्यार्थिनी नंदीता भेटते तिच्यासोबत तिचा प्रियकर समशेर असतो. ती आनंदाने त्यांना घरी कॉफी घ्यायला बोलावते. त्या दोघांच्या घरातील आगमनाने तिच्या मनाला आनंदाचे भरते येते. समशेर साहित्याचा विद्यार्थी असतो आणि कलेच्या क्षेत्रात त्याला काही करायचे असते. ती दोघे प्रेमात पडलेली असतात आणि एकांताच्या शोधात असतात. (36 Chowringhee Lane)

आता आयती संधीसमोर पाहून ते स्टॉनहेमला त्यांचा फ्लॅट वापरण्याची परवानगी मागतात. ती आनंदाने देते. मग काय यांच्या प्रणयाला रंग चढतो. त्या दोघांच्या येण्याने हिच्याही जीवनाला पालवी फुटते. तिघे एकत्र जेवायला जातात, सहलीला जातात. बाईंच्या जीवनाला नवं वळण लागतं, जगण्याला नवी उमेद जागृत होते. पण हा आनंद घटकाभराचा असतो काही महिन्यांनी ती दोघे लग्न करतात आणि स्वतंत्रपणे दुसरीकडे रहायला जातात. पुन्हा बाई एकट्या पडतात.

पुन्हा ख्रिसमस येतो. ती स्वत:च्या हाताने त्यांना देण्यासाठी केक बनवते. त्यांना घरी बोलावते. पण आम्ही ख्रिसमसला शहराच्या बाहेर आहोत असा निरोप बाईंना मिळतो. तरी सरप्राईज द्याव म्हणून केक घेवून त्यांच्या घरी बाई जातात आणि समोरचं दृष्य बघून थिजून जातात. घरात मस्त नाच गाण्याची पार्टी चालू असते. दोघे बेधुंद होवून पार्टीत मश्गुल असतात. तरूणांच्या जीवनात आपल्याला काही स्थान नाही हे स्टॉनहेम बाईंना कळून चुकते. जड पावलांनी आसवं आतल्या आत पिऊन टाकीत त्या घरी येतात. त्यांच लाडकं मांजर त्यांच्या पायाशी घुटमळू लागतं. किंग लियरच्या ओळी त्यांच्या मनाला आणखी बेचैन करू घोळू लागतात. (36 Chowringhee Lane)

===========

हे देखील वाचा : Mera Naam Joker : ‘ए भाय जरा देखके चलो’ गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

===========

अपर्णा सेन (Aparna Sen) चा हा पहिलाच (36 Chowringhee Lane) सिनेमा असूनही कमालीचा सफाईदार वाटतो. साठच्या दशकातील कलकत्त्याचं वातावरण तिने हुबेहूब उभं केलं होतं. यातील देवश्री रॉय (Debashree Roy) आणि ध्रुतमान चटर्जी (Dhritiman Chatterjee) यांच्या काही इंटीमेट सीन्सने वादळ निर्माण केले होते. १९८२ सालच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमाचा व दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. जेनिफरला या भूमिकेसाठी नामांकन मिळालं होतं. (पण पारितोषिक मात्र रेखाला ’उमराव जान’ साठी मिळालं.) दोन ख्रिसमसच्या दरम्यानच्या वर्षभरातील घटनांची ही कहानी आजही प्रत्येक २५ डिसेंबरला आठवल्या शिवाय रहात नाही.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 36 Chowringhee Lane actor actress aparna sen Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Debashree Roy Dhritiman Chatterjee Entertainment Featured jennifer kendal Shashi Kapoor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.