Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Khushboo Movie : बेचारा दिल क्या करे…!

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

दिग्दर्शक संदीप सावंत यांचा ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा नवा सिनेमा लवकरच येणार भेटीला…

 दिग्दर्शक संदीप सावंत यांचा ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा नवा सिनेमा लवकरच येणार भेटीला…
Hya Goshtila Naavach Nahi Marathi Movie
मिक्स मसाला

दिग्दर्शक संदीप सावंत यांचा ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ हा नवा सिनेमा लवकरच येणार भेटीला…

by Team KalakrutiMedia 27/09/2024

कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे. स्वत:ला पडलेले प्रश्न, आजबाजूच्या समस्या दिग्दर्शक संदीप सावंत यांनी आपल्या सिनेमांतून आजवर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. ‘श्वास, ‘नदी वाहते’ यासारख्या चित्रपटांमधून चित्रभाषेची प्रगल्भ समज दिग्दर्शक संदीप सावंत यांनी या आधीच दाखवून दिली आहे. मराठी चित्रपट फक्त मनोरंजनातच न अडकता, जगण्यासाठीची प्रेरणा देण्याचे कामही तेवढय़ाच ताकदीने आजवर करत आला आहे. एक-दोन नव्हे तर अशा अनेक चित्रपटांची समृद्ध मालिकाच मराठी सिनेसृष्टीने गुंफली आहे. याच मालिकेत दिग्दर्शक संदीप सावंत ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून एक सुंदर पुष्प ओवण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या ८ नोव्हेंबरला पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.(Hya Goshtila Naavach Nahi Marathi Movie)

Hya Goshtila Naavach Nahi Marathi Movie
Hya Goshtila Naavach Nahi Marathi Movie

डॉ.सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या ‘मृत्यूस्पर्श‘ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचं बाळकडू कोणालाच मिळालेलं नसतं, पण कठीण परिस्थितीत माणूस असीम जिद्दीचे तोरण बांधून त्या संकटांवर मात करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, ज्यामध्ये माणसाच्या धैर्याची, चिकाटीची परीक्षा होते. ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातूनही नैराश्याच्या गर्तेत सापडलेला नायक मुकुंद आपल्या कुटुंबाच्या मदतीने जगण्याला कसा आत्मविश्वासाने सामोरा जातो याची प्रेरणादायी कथा पहायला मिळणार आहे. जयदीप कोडोलीकर, प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे,अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस आदि कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. ‘आयुष्यात दुःख भोगण्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीला दुःखात, त्रासात बघणं हे अधिक दुःखदायक असतं, अशावेळी आपलं जीवन अधिक सुंदर करण्याचं सामर्थ्य आत्मसात करणं गरजेचं असतं, हेच या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक संदीप सावंत सांगतात. पॅनोरमा स्टुडिओज सादरकर्तेअसलेल्या‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील  निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते रजत गोस्वामी आहेत.(Hya Goshtila Naavach Nahi Marathi Movie)

=============================

हे देखील वाचा: सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी ‘बोल बोल राणी’ सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येणार

=============================

‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाची पटकथा-संवाद -दिग्दर्शन संदीप सावंत यांचे आहे. छायाचित्रण प्रियशंकर घोष तर संकलन दिनेश पुजारी यांनी केले आहे. साऊंड डिझाइन सुहास किशोर राणे यांचे आहे. पार्श्वसंगीत विवेक पाटील, आकाश जाधव यांचे आहे. वेशभूषा कुलदीप चव्हाण, सेजल पाटील, राजश्री चारी यांची आहे. रि-रेकॉर्डिंग मिक्सर अनुप देव CAS यांचे आहे. व्यावसायिक सल्लागार देवयानी गांधी आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे. संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. ८ नोव्हेंबरला ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: director sandeep sawant Entertainment Hya Goshtila Naavach Nahi Hya Goshtila Naavach Nahi Marathi Movie Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.