Ariana Grande : वजन घटलं, हाडांचा झाला सापळा, अभिनेत्रीला झालं

Ariana Grande : वजन घटलं, हाडांचा झाला सापळा, अभिनेत्रीला झालं तरी काय?
चंदेरी जगात आपलं ग्लॅमर टिकवून ठेवण्यासाठी कलाकारांना फार मेहनत करावी लागते. मग हॅालिवूड असोत किंवा अन्य कोणतीही चित्रपट इंडस्ट्री. वय वाढलं तरीही सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी किंवा मीडियामध्ये सतत चर्चेत राहण्यासाठी अभिनेत्री किंवा अभिनेते स्टंट करत असतात. काही दिवसांपूर्वीच केन वेस्ट याने स्टंटसाठी आपल्या बायकोला ट्रान्सपरन्ट ड्रेस परिधान करायला लावला होता. आणि आता प्रसिद्ध अमेरिकन गायिका एरियाना ग्रांडे लंडनमधील बाफ्टाच्या रेड कार्पेटवर वेगळ्या अवतारात दिसली. तिची तब्येत पाहून चाहते हैराण झाले. ती इतकी बारीक दिसतेय की तिची हाडंही दिसतायत. आता नेमकं खरंच एरियाना आजारी आहे की नवा स्टंट आहे जाणून घेऊयात. (Ariana Grande)
एरियाना ग्रँडे (Ariana Grande) तिच्या करिअरमध्ये सध्या आघाडीवर आहे. आणि त्यामुळे कामाचा ताण, आराम न मिळणं आणि वैयक्तिक जीवनात सुरु असलेली धावपळ या सगळ्यांशी तिची
झुंज सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. लंडनमधील बाफ्टा सोहळ्यात गुलाबी आणि काळ्या रंगाचा लुई व्हिटॉन गाऊन परिधान करताना ती दिसली. ड्रेस कितीही सुंदर असला तरी तिची तब्येत पाहाण्यासारखी नव्हती. तिचे गाल आत गेले होते आणि हाडांचा सापळा दिसत होता. अचानक एरियानाला असं पाहून चाहते थक्क झाले. (Hollywood News)

काही मिडिया रिपोर्टनुसार, ताणतणाव आणि चिंता यांचा तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. पेज सिक्सशी बोलताना एरियानाच्या एका सहकाऱ्याने तिच्या वेळापत्रकाचा उल्लेख केला. तो म्हणाला की, “शारीरिकदृष्ट्या हे खुप कठीण आहे. मला वाटत नाही की तुमच्या शरीराला कधी खावं हे देखील माहितेय. जेव्हा तुम्ही जागं असायला हवं तेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुम्ही जागे असता. याशिवाय, फॅशनमुळे नखे, केस, मेकअप… यावर इक्सपिरिमेंट्स सुरुच असतात”. शिवाय एरियाना ग्रांडेसोबत (Ariana Grande) काम केलेल्या आणखी एका व्यक्तिने ती गेला बराच काळ डिप्रेशनमध्ये असल्याचं म्हणाली. मागे एका मुलाखतीत एरियानाने, “पोस्ट-ट्रॉसिव्ह स्ट्रेस डिसऑर्डर, नैराश्य आणि चिंता यांच्याशी ती झुंजत असल्याचं म्हणाली होती. शिवाय त्यातून बाहेर येण्यासाठी ती थेरपी घेत होती”, असंही ती म्हणाली होती. (Trending news)
=========
हे देखील वाचा : जतीन खन्नाचा राजेश खन्ना कसा झाला?
=========
सेलिब्रिटी असल्यामुळे फेम सोबत येतंच. आणि एकदा आपल्या नानांसोबत फेम जोडलं गेलं की ते कायमस्वरुपी टिकवून ठेवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. जर का कलाकारांचं फेम कमी झालं किंवा चाहते त्यांना दुर्लक्षित करु लागले तर कलाकारांची मानसिक स्थिती बिघडते. एरियाना शिवाय सेलेना गोमेज, लेडी गागा, दीपिका पडूकोण, अनुष्का शर्मा यांनीही डिप्रेशनचा सामना केला आहे. महत्वाचं म्हणजे मेन्टल हेल्थबद्दल या कलाकारांनी उघडपणे आपली मतं मांडली आहेत आणि त्यातून सामना करत ते कसे बाहेर आले यावरही त्यांनी भाष्य केले आहे. त्यामुळे ग्लॅमर टिकवताना शारिरीक स्वास्थ्य टिकवणं जितकं गरजेचं आणि महत्वाचं असतं त्यापेक्षा मानसिक आरोग्य निरोगी असणं फार गरजेचं असतं. (Ariana Grande)