
Indian Cinema :हिरो म्हणून साईन केलेला पहिला सिनेमा तब्बल २२ वर्षानी रिलीज झाला!
हिंदी सिनेमाच्या दुनियेत पहिल्यांदा नायकाचा रोल मिळालेल्या अभिनेत्याचा हा चित्रपट रिलीज मात्र त्याच्या मृत्यूनंतर झाला होता या संपूर्ण घटनेचा पिरेड हा तब्बल २२ वर्षांचा होता. हा चित्रपट बनायला प्रचंड वेळ लागला. चित्रपट निर्मितीच्या दरम्यान अनेक अडथळे आले. अनेकांचे मृत्यू झाले. शेवटी २२ वर्षानंतर हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला. त्यावेळेला या चित्रपटाचा नायक देखील या दुनियेत नव्हता! म्हणजे ज्या नायकाने प्रमुख नायक म्हणून त्याचा पहिला चित्रपट साइन केला तोच चित्रपट त्याच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला. कोण होता तो नायक आणि कोणता होता तो चित्रपट? तो अभिनेता होता संजीव कुमार (Sanjeev Kumar). खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. (Bollywood untold stories)

संजीव कुमार गुजराती आणि हिंदी रंगभूमीवरील एक कसदार अभिनेते होते. पण चित्रपटात काम मिळावं म्हणून साठच्या दशकाच्या सुरुवातीपासूनच प्रयत्न होते. छोट्या-मोठ्या भूमिका मिळत होत्या पण नायक म्हणून चित्रपट मिळत नव्हता. संघर्ष चालू होता स्वत: ला सिद्ध करण्याचा. ‘मुगल ए आजम’ हा चित्रपट ५ ऑगस्ट १९६० रोजी प्रदर्शित झाला आणि सुपर हिट झाला. या सिनेमाचे दिग्दर्शक के आसिफ यांनी त्याच लेव्हलचा एक आणखी भव्य चित्रपट बनवायचे ठरवले. आता चित्रपटाचे कथानक लैला मजनू यांच्या वर होते. चित्रपटाचे नाव ठरलं ‘लव अँड गॉड’ या चित्रपटात नायक म्हणून त्यांनी अभिनेता गुरुदत्त यांना तर नायिका म्हणून निम्मीला साईन केले. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले . (Indian cinema)

==============
हे देखील वाचा : Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!
==============
या सिनेमात संजीव कुमार यांना देखील एक छोटी भूमिका दिली होती. के असिफ अतिशय चोखंदळ. त्यामुळे प्रत्येक शॉट खूप विचार करून घेत असे. साहजिकच चित्रपटाच्या शूटिंग चा स्पीड खूप कमी होता. चित्रपटाची काही रिळे बनल्यानंतर १० ऑक्टोबर १९६४ या दिवशी गुरुदत्त यांचे निधन झाले.(त्यांनी आत्महत्या केली) के असिफ यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. कारण आता या भूमिकेत कोणाला घ्यायचे? हा प्रश्न निर्माण झाला होता. अभिनेता संजीव कुमार यांचा अभिनय ते पाहत होते. त्यांनी संजीव कुमारला मजनूच्या भूमिकेत घेतले. आणि चित्रपटाची शूट सुरू झाले संजीव कुमार यांनी नायक म्हणून साईन केलेला हा पहिलाच चित्रपट होता. संजीव कुमार मजनू आणि निम्मी लैला हे तसं ऑड कॉम्बिनेशन होतं पण के असिफ यांनी निवड केली होती. चित्रपट चित्रीकरण चालू केले. निवांतपणे चित्रपट बनू लागला. नंतर संजीव कुमार देखील हिंदी सिनेमात हळूहळू आपलं नाव सिद्ध करू लागला. मात्र त्याने साईन केलेला पहिला सिनेमा काही तयार च होत नव्हता. (Entertainment news)

‘लव अँड गॉड’ या चित्रपटाचे शूटिंग खूपच मंद गतीने चालू होते. ९ मार्च १९७१ रोजी दिग्दर्शक के असिफ यांचे अनपेक्षित निधन झाले आणि चित्रपट बंदच पडला. नंतर त्यांची पत्नी अख्तर हिने सिनेमा पूर्ण करायचा ठरवले. तीन वेगवेगळ्या स्टुडीओ या सिनेमाचे शूट झाले होते. तिथून काही फुटेज गोळा केले. अक्षरशः आजच्या भाषेत कट पेस्ट करत हा चित्रपट पूर्ण करण्याचे आले.के सी बोकाडीया यांनी या साठी मदत केली. यादरम्यान अनेक कलावंतांचे निधन झाले होते पुन्हा पुन्हा रिशूट करावे लागल्याने सिनेमात विस्कळीत पणा आला होता. ५ नोव्हेंबर १९८५ रोजी अभिनेता संजीव कुमार यांचे देखील निधन झाले. २७ मे १९८६ रोजेई ‘लव अँड गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि फ्लॉप झाला. या सिनेमात म. रफी, तलत, लता, मन्नाडे, खान मस्ताना , हेमंत कुमार यांची गाणी होती. त्या काळात रेडीओ वर रेडीओ सिलोन वर हि गाणी रोज लागायची. (Bollywodd tadaka)