
Sonali Bendre : ‘छम छम करता है’ गाण्यावेळी सोनाली गरोदर होती?
२००४ साली आलेला ‘अगं बाई अरेच्चा…’ चित्रपट आठवतो? जे कुठल्याही पुरुषाला जमणार नाही असं वरदान मुख्य अभिनेता म्हणदे संजय नार्वेकर यांना मिळलं आणि त्यांना प्रत्येक स्त्रीच्या मनातलं ऐकू येतं. चित्रपटाची कथा तर अनोखी होतीच; पण त्यात सोज्वळ, देखणी सोनाली बेंद्रेचं आयटम सॉंग तितकच शॉकिंग होतं. ‘छम छम करता है ये नशीला बदन’ आजही हे गाणं लग्नसराईत किंवा कुठेही डिजेवर वाजलं की पाय आपोआप थिरकायला लागतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सोनाली बेंद्रे हिने या गाण्याच्या शुटींगचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे ज्यावर खरं तर तुमचा विश्वासच बसणार नाही…(Entertainment news)

कॉरिओग्राफर फराह खान हिने नुकतीच सोनाली बेंद्रेच्या घरी हजेरी लावली होती. यावेळी दोघांच्या गप्पांमध्ये सोनालीने जुन्या आठवणींना उजाळा दिला. फराह सोनालीला म्हणाली की, “आपण दोघींनी अनेक गाणी एकत्र केली आहेत. ‘आँखो मे बसे हो तुम’, ‘मेरे महबूब मेरे सनम’. आणि त्यातही आपण एक गाजलेलं मराठी गाणंही केलं ‘छम छम करता है’. यावर सोनाली लगेच म्हणाली की, “त्या गाण्याच्या वेळी मी गरोदर होते आणी मलाच माहित नव्हतं.”(Entertainement)
सोनाली पुढे म्हमाली की, “मी पंजाबी माणसाशी लग्न केलं म्हणून माझं खाणं वाढलं असेल असं सगळ्यांना वाटलं. मलाही तेव्हा कळत नव्हतं की माझं पोट का नाही कमी होत आहे. पण नंतर मी प्रेग्नंट असल्याचं मला कळलं. आणि त्याच गरोदरपणात चक्क मी एक थिरकायाला लावणारं गाणं शुट केलं होतं हे नवलच”. (Bollywood news)
================================
हे देखील वाचा: Gandhi चित्रपटातील ‘त्या’ सीनमध्ये ३ लाख लोकं झाली होती सहभागी!
=================================
दरम्यान, सोनाली बेंद्रेने २००२ साली फिल्ममेकर गोल्डी बहलसोबत लग्नगाट बांधली होती. २००५ साली तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सोनालीने ‘हम साथ साथ है’, ‘सरफरोश’, ‘ड्युपलिकेट’, ‘दिलजले’, ‘दिल ही दिल में, ‘जिस देश में गंगा रेहती है’, ‘चोरी चोरी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये सोनाली बेंद्रे हिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Sonali Bendre movies)