
The Traitors मधून २२ दिग्गज सेलिब्रिटी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रंगणार नवा खेळ
भारतीय ओटीटी जगतात लवकरच एक नविन आणि हटके रिऍलिटी शो येतोय, ज्याचं नाव आहे ‘द ट्रेटर्स’ (The Traitors). आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या या शोचं हे भारतीय रूपांतर असून, जगभरात ३० देशांमध्ये याचा यशस्वी प्रसार झाला असून आता भारतातही या शोची धूम पाहायला मिळणार आहे. (The Traitors Amazon Prime Show)

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रसारित होणाऱ्या या शो मध्ये २२ प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत. सोशल मिडियावर काही नावांची चर्चा सुरु असून या यादीत टीव्ही, ओटीटी, बॉलिवूड आणि सोशल मीडियाच्या दिग्गज नावांचा समावेश आहे. करण कुंद्रा, उर्फी जावेद, रफ्तार, जन्नत जुबैर, हर्ष गुजराल, सुधांशु पांडे, अंशुला कपूर, आशीष विद्यार्थी, एल्विश यादव, सुमुखी सुरेश यांच्या नावांचा समावेश आहे. या शोचं सूत्रसंचालन करण जोहर करणार असून शोच्या ट्रेलरचा मुहूर्त ३० मे रोजी असणार आहे.

===============================
================================
‘द ट्रेटर्स’ हा शो बिग बॉस, स्प्लिट्सविला यांसारख्या शोच्या धाटणीचा आहे, मात्र त्यात भरपूर मेंटल गेम्स, सस्पेन्स आणि सिक्रेट मिशन्स असणार आहेत. हा शो २४x७ फॉर्मॅटमध्ये पूर्णतः बंद नसला, तरी अनेक क्षण टिपले जाणार आहेत.‘द ट्रेटर्स’ १२ जून २०२५ पासून अमेजॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होणार असून दर गुरुवारी रात्री ८ वाजता नविन भाग प्रदर्शित होईल. या खेळाचा विजेता १ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जिंकणार आहे.