Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

SHATAK : RSS शताब्दीच्या निमित्ताने ‘शतक’ चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित!

Bai Tujha Ashirwad: स्टार प्रवाहवर नव्या मालिकेचा AI टीजर रिलीज;

Bigg Boss Marathi 6: ‘तन्वी कोलते किती बोलते’; भाऊच्या धक्क्यावर Riteish

सांज ये गोकुळी सावळी सावळी..

आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा Tighi चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Dhanush दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? घटस्फोटानंतर दोनचं वर्षांनी नऊ वर्षांनी लहान

KJVMM BOX Collection: हेमंत ढोमेंच्या चित्रपटानं राखला बॉक्स ऑफिसचा गड

“तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालाय”; रितेश भाऊंनी घेतली Tanvi Kolte

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Usha Uthup आधी ‘दम मारो दम मिट जाये गम ’ गाणं गाणार होत्या?

 Usha Uthup आधी ‘दम मारो दम मिट जाये गम ’ गाणं गाणार होत्या?
बात पुरानी बडी सुहानी

Usha Uthup आधी ‘दम मारो दम मिट जाये गम ’ गाणं गाणार होत्या?

by धनंजय कुलकर्णी 05/06/2025

आपल्या देशातील पहिली पॉप सिंगर जिने वेस्टनाईन म्युझिक आणि डिस्को म्युझिक ला खऱ्या अर्थाने देशात रूजवलं जिला क्विन ऑफ पॉप म्युझिक म्हणतात  ती गायिका म्हणजे उषा उथप. अलीकडेच प्रकाशित झालेल्या The queen of Indian pop music : Usha uthup या पुस्तकात अनेक  गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘हरे रामा हरे कृष्णा’ या देव आनंद दिग्दर्शित चित्रपटात पहिल्यांदा उषा उथप गायली. या चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे आशा भोसलेने गायलेलं आणि प्रचंड गाजलेलं गाणं सुरुवातीला उषा उथप गाणार होती. परंतु काही कारणाने हे गाणं आशा भोसले यांच्याकडे गेले.

मुळात ‘दम मारो दम’  या गाण्याची ट्रीटमेंट आधी वेगळी असणार होती. या गाण्यात उषा उथप सोबत चक्क लता मंगेशकर गाणार होती. उषा झीनत करीता आणि लता मुमताज करीता. पण नंतर अनेक बदल झाले आणि सर्व गाण्यांचे गायक बदलले गेले. नेमकं काय घडलं होतं? उषा उथप च्या पहिल्या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याच्या वेळचा  खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.

उषा उथप  साठच्या दशकाच्या उत्तरार्धात अनेक हॉटेल्स मधून नाईट क्लब्ज मधून इंग्लिश गाणी गात असायची. कलकत्त्याला तिचे  कॉन्टॅक्ट संपल्यानंतर दिल्लीच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये ती गावू लागली. एकदा संगीतकार आर डी बर्मन आणि देवआनंद दिल्लीमध्ये ओबेरॉय हॉटेलमध्ये गेले तिथे त्यांनी उषाचे पॉप गाणे ऐकले. त्या दोघांनाही तिचा आवाज खूप प्रॉमिसिंग वाटला. कार्यक्रम झाल्यानंतर ते दोघे तिला भेटले आणि आगामी ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटात गाणार का? असे विचारले. आर डी बर्मन आणि देव आनंद ही हिंदी सिनेमातील दोन मोठी नाव होती. उषा ने  आनंदाने होकार दिला.

========================

हे देखील वाचा: Kishore Kumar : कोणत्या गायिकेने किशोर कुमारला दिला होता अनमोल सल्ला?

========================

मुंबईत आल्यानंतर ‘दम मारो दम’ हे गाणं लता मंगेशकर सोबत तिला गायचं होतं. गाणं पाश्चिमात्य शैली आणि हिंदुस्तानी शैली याचं फ्युजन होतं. उषा झीनत करीता आणि लता मुमताज करीता गाणार होती. उषा च्या भरपूर  भरपूर रिहर्सल झाल्या. पण नंतर हे गाणं आशा भोसले यांच्याकडून जाऊन घेतले गेले. अर्थात गाण्याला आता पूर्णपणे वेगळी ट्रीटमेंट दिली होती. ते गाणं आता सोलो स्वरूपात रेकॉर्ड झालो होते. उषा उथप खूप नाराज झाली. पहिलेच गाणे आणि ते देखील हिरावले गेले.  पण पंचमने यांनी सांगितले ‘कुछ करते है…’  त्या पद्धतीने उषा उथप साठी पुन्हा एका नवीन गाण्याची सिच्युएशन तयार केली गेली.

आता या गाण्यांमध्ये ती आशा भोसले सोबत गाणं गाणार होती. आशा भोसले दम मारो दम गाण्याचाच  पोर्शन गाणार होती तर उषा उथप साठी आय लव यू हे पूर्णपणे इंग्रजीत असलेलं गाणं गाणार होती. त्यातील  उषा चे उच्चार गाण्याची स्टाईल जबरदस्त होती. अशा पद्धतीने उषा उथप चा हिंदी सिनेमाच्या दुनियेत प्रवेश झाला. यानंतर तिने सत्तरच्या दशकामध्ये भरपूर गाणी गायली. आर डी बर्मन आणि बप्पी लहरी यांनी तिच्या स्वराचा यथायोग्य असा उपयोग करून घेतला. गाणी जरी डिस्को,क्लब सॉंग,पॉप असली तरी उषा चा पेहराव संपूर्णपणे भारतीय असायचा. दक्षिणात्य साड्या आणि मोठी काळी टिकली ही त्यांची प्रतिमा भारतीयांच्या मनात घट्ट बसली आहे.

==============

हे देखील वाचा : Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?

==============

मराठीतील सुलोचना चव्हाण या देखील भले ही शृंगारिक लावण्या गात असल्या तरी त्यांची वेशभूषा अतिशय शालीन खानदानी आणि सुसंस्कृत अशी होती. ऐंशी च्या दशकाच्या सुरुवातीला आलेला हरी ओम हरी आणि रंभा हो संभा हो या गाण्याचा अभूतपूर्व अशी लोकप्रियता हासील केली होती. कोई यहा नाचे नाचे (डिस्को डान्सर), डार्लिंग आंखो से (सात खून माफ) तू मुझे जान से भी प्यारा है (वारदात), दोस्तो से प्यार किया (शान), वन टू चा चा चा (शालीमार) हरी ओम हरी (प्यारा दुश्मन), रंभा हो हो (अरमान)आमी शोत्ती बोलती (कहानी) हि गाणी अफाट गाजली. भारत सरकार कडून पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा उचित सन्मान झाला आहे.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor asha bhosle Bollywood bollywood update Entertainment Sulochana Chavan usha uthup
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.