Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mili Movie : प्रेमाची वेगळी परिभाषा

 Mili Movie : प्रेमाची वेगळी परिभाषा
कलाकृती विशेष

Mili Movie : प्रेमाची वेगळी परिभाषा

by दिलीप ठाकूर 19/06/2025

हिंदी चित्रपटातील प्रेम ही कधीच न आटणारी/ ओहोटी नसलेली हवीहवीशी वाटणारी बहुरंगी गोष्ट. हिंदी चित्रपट निर्मितीत प्रेमपटांची संख्या जास्त भरेल.कित्ती सांगावेत तरी कमीच. आणि मग त्यात प्रेमगीत,प्रियकराच्या भेटीच्या ओढीचे गीत,कधी विरह गीत , एखाद्या प्रेमाच्या गोष्टीचा शेवट गोड तर एखाद्या प्रेमाच्या गोष्टीचा शेवट दुर्दैवाने शोकांतिका, प्रेमाचे संवाद,प्रेम गीत यांचे पीक तर अफाट. पडद्यावरचे प्रेम पाहून पाहून प्रेमवीर घडले. आणि यात ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘मिली’ चित्रपटातील प्रेमाची गोष्ट आणखीनच वेगळी. जगावेगळी म्हटलं तरी चालेल. मुंबईत हा चित्रपट २० जून १९७५ रोजी प्रदर्शित झाला. म्हणजेच या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबईत मेन थिएटर नॉव्हेल्टीत या चित्रपटाने साधारण स्वरुपाचे यश संपादले. (Classic bollywood movies)

हे प्रेम अगदीच वेगळे. एका अतिशय दुर्धर आजाराने ग्रस्त असलेली मिली (जया बच्चन) आपल्या आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टींचा आनंद घेतेय.मैत्रीणीत रमतेय. अशातच त्याच सोसायटीत राहायला आलेला शेखर दयाल (अमिताभ बच्चन) हा आपले एकटेपण घालवण्यासाठी नियमित थोडेसे मद्यपान करतो. त्याला मिलीच्या आयुष्याबद्दल तिच्या वडिलांकडून (अशोक कुमार) समजते आणि तिच्याबद्दल शेखर दयाल याला सॉफ्ट कॉर्नर वाटू लागतो. त्यातून त्यांचे प्रेमाचे एक वेगळे नाते निर्माण होते आणि मिलीला चांगले उपचार मिळावेत म्हणून शेखर तिला विदेशी घेऊन जातो….(Entertainment news)

ही गोष्ट बिमल दत्ता व डॉ राही मासूम रझा यांनी लिहिली आहे. हसत खेळत खेळत भावनिक होणारी अशी ही गोष्ट आहे. ह्रषिकेश मुखर्जी यांनी अतिशय उत्कटपणे ती साकारली. चित्रपटात उषा किरण, सुरेश चटवाल, शुभा खोटे, अरुणा इराणी इत्यादींच्याही प्रमुख भूमिका आहेत. छायाचित्रण जयवंत पाठारे यांचे आहे. चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे योगेश यांच्या गीतांना सचिन देव बर्मन यांचे श्रवणीय संगीत. आये तुम याद मुझे (पार्श्वगायक किशोर कुमार), बडी सुनी सुनी है (किशोर कुमार), मैने कहा फुलो से (लता मंगेशकर) ही गाणी कधीही ऐकावीत,अगदी प्रसन्न वाटते.(Bollywood Untold Stories)

================================

हे देखील वाचा: Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

=================================

‘मिली’ चित्रपट म्हणजे दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी यांनी आपल्याच ‘आनंद'(१९७१) ची नायिकाप्रधान गोष्ट साकारली असे म्हटले गेले. वरकरणी तथ्य दिसते. ‘आनंद'(राजेश खन्ना)आपल्याकडे आता मोजकेच आयुष्य शिल्लक असून त्या दिवसांचा अधिकाधिक मनसोक्त मनमुराद आनंद घ्यावा असे त्याला मनापासून वाटते. उर्वरित आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याला भरभरुन जगायचाय. त्यातून तो जगण्याचे तत्वज्ञान सांगतो. ‘मिली’चीही तीच भावना आहे. पण तिला नवीन शेजारी आल्याने एक भावनिक आधार मिळतो. आणि त्यातून उपचाराचा मार्ग सापडतो. ‘आनंद’चित्रपटाचा शेवट पाहून अनेकांचे डोळे पाणावतात. आजही म्हणजे चित्रपटाला तब्बल चौपन्न वर्ष होवूनही तो हेलावून सोडतो. ‘मिली’ अंतर्मुख करतो. असे चित्रपट आजच्या काळात निर्माण होणे आवश्यक असले तरी अवघड. (Entertainment Tadaka)

ह्रषिकेश मुखर्जी यांची जया भादुरीवर विशेष माया. त्यांनीच पुण्यातील दूरदर्शन व चित्रपट अभिनय प्रशिक्षण संस्थेतून जया भादुरीला ‘गुड्डी’ (१९७१)तून चित्रपट क्षेत्रात आणले. त्यानंतर त्यांच्या ‘बावर्ची’ (१९७२),’अभिमान’ (१९७३), ‘चुपके चुपके’ (१९७५), ‘मिली’ (१९७५) या चित्रपटात जया बच्चन आहे. दरम्यान जया भादुरीची जया बच्चन झाली. ह्रषिदांची अमिताभ बच्चनवरही खास मर्जी. ‘बावर्ची’चे निवेदन आणि ‘गोलमाल’ (१९७९) या चित्रपटात अमिताभ पाहुणा कलाकार. तसेच ह्रषिदांच्या ‘आनंद’ (१९७१), ‘नमक हराम’ (१९७३), ‘अभिमान’ (१९७३),’मिली’ (१९७५), ‘आलाप’ (१९७७), ‘जुर्माना’ (१९७९), ‘बेमिसाल’ (१९८२) या चित्रपटात अमिताभ आहे. (Hrishikesh Mukherjee movies)

================================

हे देखील वाचा: Jaya Bachchan : …म्हणून जया बच्चन ‘सिलसिला’च्या सेटवर रोज जायच्या!

=================================

दिग्दर्शक व कलाकार अशा जोडीत हीदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण जोडी. सहज म्हणून सांगतो,गुलजार यांनी आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात जितेंद्र व विनोद खन्ना यांना सातत्याने संधी दिली (पण राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांना आपल्या दिग्दर्शनातील कोणत्याच चित्रपटात संधी दिली नाही) तर ह्रषिकेश मुखर्जी यांनी राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले, पण आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात जितेंद्र व विनोद खन्ना यांना कधीच संधी दिली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आनंद’,’बावर्ची’,’नमक हराम’ व ‘नौकरी’ या चित्रपटात राजेश खन्ना आहे.) या सगळ्यात ‘मिली’ वेगळा. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत १९७५ साल हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण. हे असे अधोरेखित होत आहे.

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bachchan ashok kumar Bollywood Bollywood Chitchat bollywood masala bollywood tadaka bollywood update Celebrity Celebrity News classic old movies Entertainment Entertainment News Hrishikesh Mukherjee jaya bachchan jaya badhuri Kishore Kumar latest entertainment news in marathi marathi entertainment news Mili movie 1975
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.