Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Ranbir Kapoor : ८३५ कोटींच्या ‘रामायण’ चित्रपटाची सर्वात मोठी अपडेट!
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा आहे. चित्रपटाच्या सेटवरुन कलाकारांच्या गेटअपचे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बॉलिवूडच्या पहिल्या बिग बजेट चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. आता या भव्य ‘रामायण’ चित्रपटाबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर आली असून लवकरच चित्रपटाचा लोगो अनावरण केला जाणार आहे. (Ramayana Movie Update)

दरम्यान, ‘रामायण’ चित्रपट हा दोन भागांमध्ये रिलीज केला जाणार असून पहिल्या भागाचं शुटींग पूर्ण झालं आहे. रामायणच्या सेटवरील एख व्हिडिओ समोर आला असून यात प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारा रणबीर कपूर आणि लक्ष्मण ही भूमिका साकारणारा रवी दुबे एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. मिडिया रिपोर्टनुसार रामायण चित्रपट नेमका कधी रिलीज होणार याची माहिती देणारा चित्रपटाचा अधिकृत लोगो येत्या ३ जूलै २०२५ रोजी डिजीटली प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. तसेच, पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचा ट्रेलर देखील तयार असून तो ३ मिनिटांचा असल्याचा सांगितलं जात आहे. (Bollywood Big Budget Films)

मल्टि स्टारकास्ट असणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाचे २ भाग अनुक्रमे २०२६ आणि २०२७ मध्ये रिलीज होणार आहेत. दरम्यान, रामायण हा चित्रपट दोन साऊथ सुपरस्टारर्सचा बॉलिवूड डेब्यू असणार आहे. साई पल्लवी (Sai Pallavi) आणि यश (Yash) ‘रामायण’ या चित्रपटात सीता माता व रावणाची भूमिका साकारणार असून या हिंदीत ते पदार्पण या निमित्ताने करणार आहेत. याव्यतिरिक्त चित्रपटात रणबीर कपूर, रवी दुबे, रकूलप्रीत सिंग, लारा दत्ता, सनी देओल, आदिनाथ कोठारे, काजल अग्रवाल, अमिताभ बच्चन, विवेक ऑबरॉय, अरुण गोविल अशी भली मोठी स्टारकास्ट झळकणार आहे. (Ramayana Movie Starcast)
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological चित्रपट!
=================================
यापूर्वीही ‘रामायणा’वर आधारित अनेक कलाकृती आल्या आहेत. ‘संपूर्ण रामायण’ ( Sampoorna Ramayana) हा चित्रपट जितका गाजला तितकीच, ‘रामानंद दयासागर’ यांची ‘रामायण’ ही लोकप्रिय मालिकाही गाजली. इतकचं नव्हे, तर आतापर्यंत प्रभू श्रीराम यांची भूमिका जरी अनेक अभिनेत्यांनी साकारली असली तरी अरुण गोविल, गुर्मीत चौधरी, जितेंद्र आणि प्रभास यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहेत. त्यामुळे, आता चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम कसे साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. (Ramayana Movies and Web Series)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi