
Riteish Deshmukh लातूरचा पण शिक्षण मुळात झालंय तरी कुठे?
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली लय भारी ओळख निर्माण करणारा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याच्या आगामी बऱ्याच प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे… रितेश जरी अभिनय क्षेत्रात कार्यरत असला तरी त्याचं कुटुंब राजकारणाशी जोडलेलं आहे… मुळचा लातूरचा असणारा रितेश लहानाचामोठा बाभळगावमध्ये झाला… देशमुखांच्या शाळा, शिक्षण संस्था असूनही रितेश देशमुख कोणत्या शाळेत शिकला आहे हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊयात..(Entertainment News)

रितेश देशमुखने नुकत्याच आपल्या शाळेला तब्बल ४० वर्षांनी भेट दिली… त्याचं शिक्षण पुर्ण झालंय पाचगणीत… शाळेच्या आठवणींना उजाळा देत त्याने शाळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे… सध्या रितेश त्याच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या कामात व्यस्त असून याचं शुटींग सातारा-महाबळेश्वर या परिसरात सुरू असल्याच्या चर्चा होत्या… याच निमित्ताने पाचगणीला गेल्यावर तब्बल ४० वर्षांनी रितेशने एका खास जागी भेट दिली आहे… व्हिडिओ पोस्ट करत रितेश लिहितो की, “मी माझ्या शाळेच्या मैदानात ४० वर्षांनंतर गेलो…” असं कॅप्शन दिलं आहे. रितेशच्या शाळेचं नाव संजीवन विद्यालय असून या शाळेच्या शरद पंडित स्टेडियमवर तो गेला होता. (Riteish Deshmukh Education)
रितेशला आधीपासून अभिनयात करिअर करायचं नव्हतं… शालेय शिक्षण पुर्ण झाल्यानंतर रितेशला खरंतर आर्किटेक व्हायचं होतं. यानुसार, त्याने मुंबईतील ‘रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’साठी प्रवेश घेतला होता… यानंतर परदेशातील एका नामांकित कंपनीत त्याने जवळपास एक वर्ष आर्किटेक्ट म्हणून काम केलं. परंतु, याच दरम्यान रितेशला चित्रपटासाठी विचारणा झाली अन् तो अभिनय क्षेत्राकडे वळला…
================================
हे देखील वाचा : Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!
=================================
रितेश देशमुख नुकताच ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) मध्ये दिसला होता… यानंतर त्याचा ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच भेटीला येणार असून ५ भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे… चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश दिसणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी देखील त्यानेच घेतली आहे… याशिवाय ‘धमाल ४’ आणि ‘मस्ती ४’ हे रितेशचे सीक्वेल चित्रपटही रिलीज होणार आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi