Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

‘आनंद’ च्या भूमिकेसाठी Rajesh Khanna हे पहिले चॉईस नव्हते!
जो चित्रपट पाहून आजवर कुणीही रसिक रडला नाही, भाऊक झाला नाही तो चित्रपट म्हणजे ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘आनंद’. भारतातील सर्वोत्कृष्ट दहा भावस्पर्शी चित्रपट काढायचे म्हटलं तर त्यात या चित्रपटाचा नक्कीच समावेश होईल. 12 मार्च 1971 रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने भारतीय सिनेमा मध्ये स्वतःचे एक आगळ वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटात ‘आनंद’ ची भूमिका राजेश खन्ना यांनी तर बाबू मोशायची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली होती. पण तुम्हाला माहित आहे का या दोन्ही भूमिकांसाठी हे दोन अभिनेते पहिला चॉईस नव्हतेच. दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी कुणाला घेऊन हा चित्रपट बनवणार होते? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.

ऋषिकेश मुखर्जी यांच्या डोक्यात ‘आनंद’ या चित्रपटाची कथा पन्नासच्या दशकापासूनच होती. ऋषिकेश मुखर्जी यांनी ‘मुसाफिर’ (१९५७) या चित्रपटापासून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यापूर्वी ते एडिटर म्हणून या क्षेत्रात कार्यरत होते. राज कपूर यांच्या अनेक चित्रपटाचे एडिटिंग त्यांनी केले आहे. त्यांची राजकपूर, देव आनंद आणि दिलीप कुमार या तिघांशी खूप चांगली मैत्री होते. ऋषिकेश मुखर्जी यांना म्हणून ‘आनंद’ या चित्रपटात खरं तर राज कपूर यांनाच प्रमुख भूमिकेसाठी घ्यायचं होतं. ऋषिकेश मुखर्जी यांना राज कपूर कायम बाबू मोशाय म्हणून बोलवत असत. बाबू मोशाय या बंगाली शब्दाचा अर्थ ग्रेट जंटलमन असा होतो.

साठच्या दशकामध्ये राजकपूर एकदा अस्थमा या आजाराने खूप त्रस्त झाले होते. त्या काळात ऋषिकेश मुखर्जी त्यांना भेटायला गेले. आपल्या मित्राची ही आजारी अवस्था पाहून त्याना खूप वाईट वाटले. परंतु या काळात राज कपूर आपले दुःख आजार विसरून येणाऱ्या प्रत्येकाशी आनंदाने बोलत होते. त्यांच्या सोबत चेष्टा मस्करी करत होते. जणू आपल्याला काही आजार झालाच नाही या अविर्भावात तो वावरत होते. ‘आनंद’चे कॅरेक्टर अशा रीतीने ऋषिकेश मुखर्जी यांच्या मनात डेव्हलप होत गेले. स्वतःला असाध्य आजार जरी झाला असला तरी स्वतःच्या दुःखाकडे दुर्लक्ष करून इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे काम हे कॅरेक्टर करत असते. ऋषिकेश मुखर्जी यांनी हाच प्लॉट आपल्या सिनेमात वापरायचे ठरवले.
================================
हे देखील वाचा : Saraswati Devi : कोणत्या संगीतकार महिलेला आपले नाव बदलून संगीत द्यावे लागले?
================================
परंतु ऋषीदा आता राज कपूर यांना ‘आनंद’ ची भूमिका द्यायला ते तयार नव्हते. कारण चित्रपटात या कॅरेक्टरचा मृत्यू दाखवला होता आणि आपल्या जिवलग प्रिय मित्राचा मृत्यू ते स्वतः पाहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी या व्यक्तिरेखेसाठी दुसरा कालावंतांची निवड करायला सुरुवात केली. ‘आनंद’ यांच्या भूमिकेसाठी बंगाली अभिनेते उत्तम कुमार आणि बाबू मोशायच्या भूमिकेसाठी दुसरे बंगाली अभिनेत्री सौमित्र चटर्जी यांची निवड यांच्या डोक्यात होती. त्यांनी दोघांनाही विचारले पण त्या काळात दोघेही बंगाली सिनेमामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी नम्र नकार दिला. यानंतर ‘आनंद’ ही भूमिका त्यांनी किशोर कुमार यांना द्यायचे ठरले होते. परंतु ऋषिकेश मुखर्जी यांनी जेव्हा किशोर कुमार यांना भेटायला गौरीकुंज या बंगल्यावर गेले तेव्हा वॉचमनला त्यांनी बंगाली माणसाला आत घ्यायचे नाही असे सांगून पिटाळून लावले होते! (कारण एका बंगाली व्यक्तीने त्यांचे पैसे बुडवले होते. त्यामुळे त्यांचा राग बंगाली माणसाला होता.)

यानंतर या भूमिकेसाठी शशी कपूर, धर्मेंद्र यांचा देखील विचार केला गेला असे म्हणतात. जेव्हा राजेश खन्ना याला या चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल कळाले तेव्हा तो स्वतःहून ऋषिदांकडे गेला आणि काम करण्याची इच्छा व्यक्त केली. राजेश खन्ना तेव्हा सुपरस्टार पदावर होता त्याचे मानधन अर्थातच ऋषिकेश मुखर्जी यांना परवडणारे नव्हते. परंतु राजेश खन्नाने मार्केट रेटच्या अगदी 20% रकमेमध्ये हा चित्रपट साइन केला आणि डेट्स देखील दिल्या. अवघ्या 28 दिवसांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. बाबू मोशाय ही भूमिका त्या काळात नवीन असलेल्या अमिताभ बच्चन यांना देण्यात आली. त्याच्या नावावर एकही हिट सिनेमा नव्हता. तरी ऋषी दा यांना अमिताभच्या अभिनयात स्पार्क दिसला होता. या चित्रपटाला संगीत लता मंगेशकर यांनी द्यावे अशी ऋषिकेश मुखर्जी यांची इच्छा होती परंतु लताने नकार दिल्यानंतर सलील चौधरी यांना त्यांनी पुन्हा कलकत्त्याहून बोलावून घेतले आणि या चित्रपटाला संगीत द्यायला सांगितले!
================================
हे देखील वाचा : राजेश खन्ना यांच्या ‘या’ सिनेमाच्या मुहूर्ताची क्लॅप Amitabh Bahchan यांनी दिली होती
================================
या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर्सला मुखर्जी यांनी एक स्वतंत्र ओळख निर्माण होईल याची काळजी घेतली. मग ते ललिता पवार यांची मेट्रन असो किंवा जॉनी वॉकर यांनी रंगवलेला अनोखे लाल असो. चित्रपटात संवाद गुलजार यांनी लिहिले होते तर दोन गाणी योगेश यांनी तर दोन गाणी गुलजार यांनी लिहिली होती. ‘आराधना’ चित्रपटानंतर राजेश खन्नाचा स्वर हा किशोर कुमार होता परंतु या चित्रपटामध्ये राजेश खन्ना साठी मुकेश आणि मन्नाडे यांनी गाणी गायली. ‘ बाबू मोशाय,जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही,’तुझे क्या आशीर्वाद दू बहन ये भी तो नही कह सकता मेरी उमर तुझे लग जाये….’ या आणि अशा डायलॉग ने ‘आनंद’ हा चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (राजेश खन्ना) हे पुरस्कार प्राप्त झाले तर फिल्म फेअर सोहळ्यात सहा पुरस्कार मिळाले.