Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Chhaava : ‘बाहुबली’ सारखी काल्पनिक गोष्ट २ भागांत येते मग शंभू महाराजांची का नाही?

 Chhaava : ‘बाहुबली’ सारखी काल्पनिक गोष्ट २ भागांत येते मग शंभू महाराजांची का नाही?
मिक्स मसाला

Chhaava : ‘बाहुबली’ सारखी काल्पनिक गोष्ट २ भागांत येते मग शंभू महाराजांची का नाही?

by रसिका शिंदे-पॉल 26/04/2025

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ (Chhaava) चित्रपट सध्या प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करत ऐतिहासिक चित्रपटांच्या यादीत आपलं नाव अजरामर करत आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ६०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला असून नवा रेकॉर्ड तयार केला आहे. एकीकडे प्रेक्षक चित्रपटाचं कौतुक करत असताना दुसरीकडे मात्र या चित्रपटाला काही अंशी टीकेचाही सामना करावा लागला होता. अभिनेता आस्ताद काळे याने देखील चित्रपटात काम करुनही ‘छावा’ चित्रपट वाईट असल्याचं म्हटलं होतं. आता यावर अधिक स्पष्टीकरण देत आस्तादने बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे. (Chhaava movie)

छावा’ वाईट फिल्म आहे” असं म्हणत आस्तादने काही दिवसांपूर्वी क पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अशातच आता या सगळ्यावर अभिनेत्याने भाष्य केलं आहे. राजश्री मराठीशी बोलताना त्याने याबद्दल सविस्तरपणे त्याचं मत मांडलं. आस्ताद म्हणाला की, “माझं वैयक्तिक मत आहे आणि ते मत असण्याचा मला संविधानाने अधिकार दिलेला आहे. मला तो चित्रपट आवडला नाही. माझा त्या पोस्टमधला शब्द चुकला असेल. ‘फिल्म वाईट आहे’ असं म्हणण्यापेक्षा ‘मला ती फिल्म आवडली नाही’ असं म्हणणं जास्त चांगलं ठरलं असतं.” (Bollywood tadaka)

पुढे तो म्हणाला की, “यामुळे येणाऱ्या प्रतिक्रिया तशाच आल्या असत्या. त्याबद्दल माझं काही मत नाही. मला त्या चित्रपटातलं काय आवडलं हे सांगतो, विकी कौशल या नटाने खूप कष्ट घेतले. खूप प्रमाणिकपणे त्याने काम केलं आहे. हे मी बोलू शकतो कारण, मी काही प्रसंगांमध्ये त्याच्याबरोबर काम केलं आहे. दुसरी गोष्ट सेट फार अप्रतिम होता. युद्धाचे काही प्रसंगही छान झाले. पण फक्त यामुळेच चित्रपट होत नाही असं माझं स्पष्ट मत आहे”. (Entertainment trending news)

आस्तादने पुढे असं देखील म्हटलं की, “मी जे बोललो होतो, त्यात ऐतिहासिकदृष्ट्या काही सीन हे समस्यात्मक होते. बुऱ्हाणपूरची लूट आणि मग राज्याभिषेक, हे दोन्ही उलट घडलं होतं. आधी राज्याभिषेक झाला होता. १४, १५, १६ जानेवारी १६८१ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला होता आणि ३१ जानेवारी रोजी बुऱ्हाणपूरची लूट झाली. याबद्दल जाऊ देना… एवढं काय? असा विचार केला तर मग सगळ्याच बाबतीत हे लागू होतं. तुम्ही का इतिहासाची प्रतारणा करता? त्यातून साध्य काय होतं? दुर्दैवाने त्या काळात त्यांचं चरित्रहनन करण्याचे प्रयत्नही झाले. महाराजांनी येसूबाईंच्या नावाचाही तेव्हा शिक्का केला होता आणि ही खूप मोठी क्रांतीकारी गोष्ट आहे. याबद्दल तुम्ही का नाही दाखवू शकलात?” (Aastad kale and chhaava movie)

============

हे देखील वाचा : Chhaava review : कसा आहे विकी कौशलचा ‘छावा’?

============

“मी हे या कारणासाठी बोलत आहे, कारण तुमच्याकडे ते आर्थिक, तांत्रिक बळ आहे. तुमच्या प्रोडक्शनमध्ये मोठमोठे कलाकार काम करण्यास तयार होतात. मग महाराजांच्या नऊ वर्षांच्या काळाबद्दल दोन चित्रपट करण्याचा निर्णय का नाही घेतला? कसली घाई होती? ‘बाहुबली’सारखी काल्पनिक गोष्ट त्यांनी दोन भागांत सांगितली; मग महाराजांची गोष्ट तुम्हाला दोन भागांत का सांगावीशी वाटली नाही?. घ्या ना कष्ट… खूप वरवर आणि खोलात न जाता केलेला हा प्रयत्न होता जो मला आवडला नाही.” (Entertainment news)

‘छावा’ (Chhaava) चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना आस्ताद म्हणाला की, “मला पूर्ण स्क्रिप्ट दिलं नव्हतं. माझ्या कास्टिंगसाठी फोन आले तेव्हा माझं हो… नाही… चाललं होतं. कारण ते काल्पनिक पात्र आहे. सुर्याजी निकम असं पात्र होऊन गेलेलं नाही. त्यांची नोंद तरी नाही. त्यासाठी थिएटर केलेले कलाकार असल्याचं सांगितलं गेलं होतं. मी त्यांना माझा सीन पाठवण्याची विनंती केली. तर ते नाही म्हणाले. ठीक आहे ते साहजिकच आहे. मग सेटवर तयार होऊन सीन वाचला तेव्हा लक्षात आलं की, फक्त दीड वाक्य आहेत आणि तयार होऊन मी नाही करणार हे बोलण्यासाठी माझी तशी शिकवण नाही. त्यामुळे मी ते केलं”. (Bollywood historical movies)

दरम्यान, ‘छावा’ चित्रपटात विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदाना (Raashmika Mandanna) हिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, संतोष जुवेकर, किरण करमरकर, आशुतोष राणा असे अनेक दिग्गज कलाकार चित्रपटात झळकले आहेत. (Chhaava movie cast)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aastad kale actor Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Chhaava Chhatrapati sambhaji maharaj chhatrapati shivaji maharaj Entertainment Laxman Utekar Rashmika Mandanna Vicky Kaushal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.