Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Aata Thambayach Naay प्रेरणादायी चित्रपट आता पाहा घरबसल्या!
भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा ‘आता थांबायचं नाय’ (Aata Thambayach Naay) हा चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरित आहे. मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं हृदयस्पर्शी कथानक, चित्रपटातील दमदार कलाकार, शिवराज यांचं पहिलं दिग्दर्शन या सगळ्या गोष्टींचं मराठी प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. १ मे २०२५ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट महिन्याभरापेक्षाही जास्त काळ थिएटरमध्ये सुरु होता. आणि आता लवकरच प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे.(Marathi movies 2025)

‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचा प्रीमियर ZEE5 वर २८ जून २०२५ रोजी करण्यात येणार आहे. मानवी भावना आणि आशेचं अनोखं दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि कलाकारांकडूनही कौतुकास्पद अभिप्राय मिळत आहे. आयएमडीबीवर 8.8 चं जबरदस्त रेटिंग मिळवणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६.५३ कोटी कामले आहेत.(Aata Thambayach Naay box office collection)
================================
=================================
‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केले असून यात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे अशी तगडी कलाकार मंडळी आहेत.(Aata Thambayach Naay Movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi