Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Sonali Bendre : डॉक्टरने वेस्टर्न कपडेच का घातले पाहिजे? ‘हम

ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अभिनेत्री ते खासदार जया बच्चन!

 अभिनेत्री ते खासदार जया बच्चन!
कलाकृती विशेष

अभिनेत्री ते खासदार जया बच्चन!

by दिलीप ठाकूर 09/04/2021

जया भादुरी म्हटलं की, ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘गुड्डी’ (१९७१) आठवते, जया बच्चन म्हटलं की, ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शितच ‘अभिमान’ (१९७३) आठवायला हवाच, अमिताभ बच्चनची पत्नी म्हटलं की, यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’ (१९८१) आठवायला हवाच. ऐश्वर्या राय म्हटलं की, तिची जया बच्चन नावाची सासू आठवायला हवीच. फरक इतकाच की, ती पारंपरिक कौटुंबिक चित्रपटाप्रमाणे खाष्ट नाही. फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले तरीही जया भादुरीचा अभिनय अगदी नैसर्गिक. राज्यसभेतील चित्रपट कलाकार खासदार म्हटलं की, जया बच्चनचेही नाव यायलाच हवं (सोबतच रेखाचेही येते हेही सांगायला हवे का?) पण जया बच्चन खासदार असली तरी राजकारणी नाही.

जया भादुरी (Jaya Bachchan) हिंदी चित्रपटसृष्टीत आली तो एक प्रकारचा हिंदी चित्रपटाच्या नायिकेचा चेहरा बदलण्याचा अथवा स्थित्यंतराचा काळ होता. (एखाद्या क्षेत्रात आपला प्रवेश नेमका कधी होतो हे खूप महत्त्वाचे असते हो) मीनाकुमारी, वहिदा रहेमान, वैजयंतीमाला, माला सिन्हा, नंदा, आशा पारेख, नूतन यांच्या कारकिर्दीचे ते दुसरे टोक होते. (उताराचा काळ होता असे म्हणणे बरे नाही) तनुजा, सायरा बानू, शर्मिला टागोर, मुमताज, कुमकुम यांचाही बराच रुपेरी प्रवास झाला होता. हेमा मालिनी, लीना चंदावरकर, राखी, रेखा, बबिता अशा अगदी नवीन ग्लॅमरस आणि तजेलदार अभिनेत्रींचे आगमन झाले होते. पाश्चात्य लूकची झीनत अमान आली होती. परवीन बाबी, आशा सचदेव येत होत्या. जया भादुरीचे सोबर व्यक्तिमत्व हिंदी चित्रपट आणि समाज अशा दोन्ही बाबतीत पारंपरिक वळणाचे, परंपरा, सभ्यता, संस्कृती जपणारे, पदर संस्कृतीचे आणि तीच तिची ताकद होती, तरी कदाचित… कदाचित बदलत्या वातावरणात ती मर्यादाही ठरली असती.

ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार या दिग्दर्शकांच्या चित्रपटात तिला हुकमी स्थान होते. याचे कारण म्हणजे, त्यांचे चित्रपट हे मध्यममार्गी असत (त्या काळाचा विचार करता मसालेदार मनोरंजक चित्रपट आणि समांतर अर्थात नवप्रवाहातील चित्रपट, या दोन्हीच्या मधला चित्रपट). ऋषिदांनीच जया भादुरीला ‘गुड्डी’तून हिंदी चित्रपटात पहिली संधी दिली जया भादुरीचा (जन्म. ९ एप्रिल १९४८ जबलपुर, मध्य प्रदेश येथे) या चित्रपटातील साधेपणा, निरागसता प्रेक्षकांना एवढा भावला की बस्स.. आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलीबद्दल जशी आत्मियता असते तशीच त्यांना प्रेक्षकांकडून मिळाली. खरं तर जया भादुरीला सर्वप्रथम बंगाली दिग्दर्शक सत्यजीत रे यांनी ‘महानगर’ (१९६३) या चित्रपटात संधी दिली. तेव्हा तिचे वय पंधरा होते. त्यात तिने अनिल चटर्जी आणि मधबी मुखर्जी यांच्यासोबत भूमिका साकारली. त्यानंतर तिने Dhanyee Meye या आणखीन एका बंगाली चित्रपटात भूमिका साकारली.

Jaya Bachchan

ऋषिकेश मुखर्जी यांनी ‘सुमन’ या बंगाली चित्रपटातील जया भादुरीचा अभिनय पाहिला आणि आपल्या ‘गुड्डी’ या चित्रपटासाठी शालेय विद्यार्थिनीची भूमिका दिली. यात तिचा नायक होता, समित भांजा. हा चित्रपट गाजला आणि जया भादुरीला लागलीच राजश्री प्रोडक्शनच्या ‘उपहार’ या‍ चित्रपटात स्वरुप दत्तची  नायिका बनण्याची संधी मिळाली. पारंपारीक पेहराव, सामान्य वागण्याने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर ऑपेरा हाऊसमध्ये या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. असे यशच कलाकाराला एखादी प्रतिमा अर्थात इमेज देते आणि त्यानुसार नवीन चित्रपटात भूमिका मिळतात. त्या काळात तर प्रामुख्याने इमेजच चालायची. जया भादुरीला असाच एक चित्रपट मिळाला, बासू चटर्जी दिग्दर्शित “पिया का घर”. यात अनिल धवन तिचा नायक होता. राजा ठाकूर दिग्दर्शित ‘मुंबईचा जावई’ (१९७०) या चित्रपटाचा हा रिमेक होता. जया भादुरीची आता वाटचाल आकार घेऊ लागली.

एकीकडे ती सोबर व्यक्तिरेखा साकारायची (गुलजार दिग्दर्शित ‘कोशिश’ हा मुका बहिरा नायक नायिका असलेला चित्रपट होता. संजीवकुमार तिचा नायक होता, तर ऋषिकेश  मुखर्जी दिग्दर्शित ‘बावर्ची’ खेळकर, खोडकर कौटुंबिक चित्रपट) तसेच तिने काही मसालेदार मनोरंजक चित्रपटात भूमिका साकारल्या. (नरेंद्र बेदी दिग्दर्शित ‘जवानी दीवानी’मध्ये ती रणधीर कपूरची नायिका होती, तर चिन्नाप्पा देवरच्या ‘गाय और गौरी’मध्ये शत्रूघ्न सिन्हाची आणि रघुनाथ झालानी दिग्दर्शित ‘अनामिका’मध्ये संजीवकुमारची नायिका होती. गुलजार दिग्दर्शित ‘परिचय ‘मध्ये ती जितेंद्रची नायिका होती. अनिल गांगुली दिग्दर्शित ‘कोरा कागज’मध्ये ती विजय आनंदची नायिका होती. विशेष म्हणजे हे चित्रपट सुपर हिट ठरले.) यशाप्रमाणे काही चित्रपट फ्लाॅपही ठरले. रणधीर कपूरसोबतचा दिल दिवाना, संजीवकुमारसोबतचा ‘नया दिन नयी रात’, अनिल धवनसोबतचा ‘अन्नदाता’, डॅनी डेन्झोपासोबतचा ‘अभी तो जी ले’, विजय अरोराबरोबरचा ‘फागून’ रोमेश शर्मासोबतचा ‘दुसरी सीता’ याबरोबरच अमिताभ बच्चनसोबत तिने ‘एक नजर’, ‘बन्सी बिरजू’ या चित्रपटात भूमिका साकारताना ते खूप जवळ आले (या दोन्ही चित्रपटात तिचे मुजरा नृत्य आहे. जया भादुरीच्या इमेजला ते शोभणारे नव्हते. पण चित्रपटसृष्टीत कार्यरत राहण्यासाठी असेही चित्रपट आणि अशाही भूमिका स्वीकाराव्या लागतात.)

Amitabh Bachchan and wife Jaya Bachchan
Amitabh Bachchan and wife Jaya Bachchan

अमिताभलाच दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी ‘जंजीर’ (१९७३) मध्ये निश्चित करावे म्हणून जया भादुरीनेच ‘समाधी’च्या सेटवर आग्रह वाढवल्याचे किस्से आहेत. त्याबरोबरच ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘अभिमान’मध्येही या दोघांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि ते असे व इतके एकत्र आले की, ‘अभिमान’चे शूटिंग संपले आणि ३ जून १९७३ रोजी ते विवाहबध्द झाले. जया भादुरी आता जया बच्चन झाली आणि काही दिवसातच रिलीज झालेला ‘जंजीर’ सुपर हिट ठरला आणि अमिताभ बच्चन नावाचे वादळ जन्माला आले. तेव्हा सेटवर या जोडीचा ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘चुपके चुपके’ होता तर ३ ऑक्टोबर १९७३ रोजी रमेश सिप्पी दिग्दर्शित सर्वकालीन सुपर हिट ‘शोले’ (रिलीज १९७५) चा मुहूर्त झाला. तो पडद्यावर येईपर्यंत जया बच्चन सिनेमापासून दूर जात जुहूच्या प्रतिक्षा बंगल्यात संसारात रमली आणि तो सांभाळतच तिने संजीवकुमारबरोबरचा ‘नौकर’ हा चित्रपट पूर्ण केला. तसाच तिचा एक विनोद मेहराबरोबरचा चित्रपट ‘आहट’ जवळपास वीस बावीस वर्षांनी पूर्ण होऊन प्रदर्शित झाला. दिग्दर्शक किशोर रेगे यांच्या अथक प्रयत्नानेच ते शक्य झाले. अमिताभप्रमाणेच संजीवकुमारसोबत जयाने सातत्याने भूमिका साकारल्या. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट पुण्याचा फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टीट्यूटमध्ये झाली. त्यानंतर ते ‘गुड्डी’च्या सेटवर भेटले.

जया बच्चननी पत्नीची जबाबदारी उत्तम रितीने बजावल्यावर चरित्र भूमिकेतून आपल्या करियरची सेकंड इनिंग सुरु केली. तेव्हा गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘हजार चौरासिकी माॅ’ (१९९८) या चित्रपटाचा मुहूर्त राजकमल कलामंदिर स्टुडिओत अमिताभ बच्चनच्या शुभहस्ते झाला, तेव्हा ‘पुनरागमनातील जयाचा आत्मविश्वास पाह्यला’ मी आवर्जून शूटिंग रिपोर्टीगसाठी हजर होतो. तेव्हा मधला काही काळ आपण कॅमेरासमोर नव्हतो असे जयाच्या एकूणच देहबोलीत कुठेच जाणवले नाही. त्यानंतर जया बच्चननी फिजा, कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, द्रोण, लागा चुनरी मे दाग वगैरे चित्रपटात भूमिका साकारली. अगदी बांगलादेशी चित्रपट ‘मेहेरजान’मध्ये व्हीक्टर बॅनर्जीसोबत भूमिका साकारली. एव्हाना अभिषेक बच्चनही अभिनय क्षेत्रात आला. आज बच्चन परिवार म्हणजे  जगातील ग्लॅमरस, वलयांकित प्रसिद्ध आणि श्रीमंत परिवार असे घट्ट समीकरण असून जया बच्चन त्याचा मजबूत कणा आहे.

=====

हे देखील वाचा: अभिनेत्री जया बच्चन यांचा आज वाढदिवस. त्यांच्या पहिल्या सिनेमाची हि इनसाईड स्टोरी

=====

सुसंस्कृत अमिताभच्या आयुष्यातील एकाच वेळेस नाजूक आणि अवघड प्रकरण म्हणजे रेखा! तो दोन मुलांचा (अभिषेक आणि श्वेता) पिता आणि प्रतिष्ठित बच्चन कुटुंबातील सुपुत्र असूनही रेखामय कसा बरे झाला यावर त्या काळात उभे आडवे, तिरके, वाकडे असे बरेच काहीना काही लिहिले गेले आणि त्यात जया बच्चनची अवस्था विचित्र होती. सुपरस्टारची पत्नी असल्याचा आनंद होता तरी तोच सुपरस्टार विवाहबाह्यसंबंधात रुतलाय हेही पचवायचे होते. यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’ (१९८१) हा चित्रपट याच सगळ्या नातेसंबंधाची स्टोरी असल्याचा गाॅसिप्स मॅगझिनचा विलक्षण गवगवा होता. प्रत्यक्षात हा चित्रपट बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘गुमराह’ची रिमेक होती. (पण मूळ चित्रपटातील नाट्य हरवले होते. जया आणि रेखा ‘सिलसिला ‘मध्ये अमिताभच्या नायिका होत्या इतकीच नोंद राहिली. या सगळ्या गदारोळात अमिताभ म्हटलं की जयाबरोबरच रेखाही सहज आठवते हो.

Jaya Bachchan Family
Jaya Bachchan Family

ती बीग बीची पत्नी असली तरी तिचं आपलं स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे, ओळख आहे. ती एका विश्व सुंदरीची सासू असली तरी तिचं आपलं एक वैशिष्ट्य आहे. ती एक दोनदा नव्हे तर चारदा समाजवादी पक्षाच्यावतीने उत्तर प्रदेशातून राज्यसभेत खासदार म्हणून निवडून आली तरी तिची आपली स्वतःची मते आहेत, तिला सामाजिक जाणीवा आहेत. सर्वप्रथम ती २००४ साली खासदार झाली तेव्हा तिला फक्त दोन वर्षांचा कालावधी मिळाला. त्यानंतर २००६ ते २०१०, मग २०१० ते २०१२ आणि आता २०१८ ते २०२२ असा प्रवास सुरु आहे. महत्वाचे म्हणजे, इतका काळ ‘दिल्लीतील सत्तेच्या राजकारणात’ राहूनही ती राजकारणी झाली नाही. तशी ती हिंदी सिनेमाच्या जगात पन्नास वर्षे वावरुनही फिल्मी झाली नाही. अनेक सामाजिक गोष्टींवर ती आपलं मत सडेतोडपणे व्यक्त करते.

जया बच्चनचा एकदा मराठी चित्रपटाशी संबंध आला. अमिताभचे मेकअपमन दीपक सावंत यांनी “आक्का” (१९९४) या मराठी चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा अमिताभ आणि जयाजींनी या चित्रपटात श्रीगणेश भक्तीचे गीत ‘तू जगती अधिपती नमन तुला पहिले श्री गणपती’ हे साकारले. गोरेगावच्या चित्रनगरीत याचे शूटिंग झाले होते. त्यानंतर याच चित्रपटाच्या ध्वनिफिती प्रकाशनाचा सोहळा जयाजींच्या शुभहस्ते जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये पार पडला तेव्हा वयात येत असलेला अभिषेक बच्चनही हजर होता. एक म्हणजे, अभिषेकला पहिल्यांदा मी तेथे पाहिले आणि जया बच्चनला मराठी बोलता येते हेही यानिमित्ताने लक्षात आले. अशी एक वेगळी आठवण सांगतच जया बच्चनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood Bollywood Actress bollywood update Celebrity Celebrity Birthday Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.