Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Amitabh Bachchan सिनेमातून बाहेर आणि सिनेमा सुपर फ्लॉप !
हिंदी सिनेमाच्या दुनियेत कधीकधी मुहूर्ताचा शॉट हा एखाद्या कलावंतावर चित्रित होतो पण तोच कलावंत चित्रपटात कायम राहत नाही आणि वेगळेच कलावंत घेऊन तो चित्रपट पूर्ण होतो! असे प्रकार बऱ्याचदा होतात पण लक्षात राहतात ते पॉप्युलर स्टारमुळे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना घेऊन मनमोहन देसाई यांनी एका चित्रपटातील लॉन्चिंग केले होते. पण नंतर या चित्रपटात अमिताभ बच्चन काही काम करू शकले नाहीत. आणि तिथे दुसऱ्या कलावंताला घेण्यात आले. पण मग मात्र हा चित्रपट सुपर फ्लॉप झाला. कोणता होता तो चित्रपट आणि काय होता तो नेमका किस्सा?

२ डिसेंबर १९८३ रोजी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा बहुचर्चित कुली (Coolie) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला अमिताभ बच्चनच्या त्या बंगलोर एक्सीडेंटची पार्श्वभूमी होती. त्यामुळे चित्रपट सुपर डुपर हिट होणारच होता. या चित्रपटाच्या शूट दरम्यानच त्यांनी दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी ‘मर्द’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अमृता सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘कुली’ चित्रपटाची सिल्वर ज्युबली जेव्हा झाली त्या वेळेला जून १९८४ मध्ये मुंबईच्या ‘हॉलिडे इन’ या हॉटेलमध्ये मनमोहन देसाई देसाई यांनी एक जंगी पार्टी दिली. या पार्टीला बॉलीवूडमधील सर्व सितारे, पॉलिटिशनस, इंडस्ट्रियलीस्ट उपस्थित होते. जसजशी पार्टीची रंगत वाढत गेली पार्टीला रंग भरत गेला. रात्री दोन वाजता मनमोहन देसाई यांनी संजीव कुमार आणि अमिताभ बच्चन यांना स्टेजवर बोलावले आणि आपल्या ‘अल्लारखा’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली. ‘कुली’ या चित्रपटाला मुस्लिम सोशल अँगल होता.

त्यामुळे ‘अल्लारखा’ या चित्रपटातील मुख्य नायक देखील मुस्लिमच दाखवला होता. अमिताभ बच्चन, संजीव कुमार, पूनम धिल्लन यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनमोहन देसाई यांचे पुत्र केतन देसाई करणार होते. केतन देसाई चा हा दिग्दर्शनातील पहिलाच सिनेमा असणार होता. या चित्रपटापासून ते दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार होते. त्या मुळेच अमिताभ बच्चनला प्रमुख भूमिकेत घेण्यात आले होते. कारण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्या काळातील चलनी नाणे होते. आपल्या मुलाचे लॉन्चिंग जबरदस्त हिट ने व्हावे यामुळे त्यांनी अमिताभ बच्चन यांना या चित्रपटाचा नायक म्हणून घेतले.
पण या चित्रपटाला सुरुवातीपासूनच काहीतरी ग्रहण लागले कारण या चित्रपटाच्या घोषणेनंतर दोन महिन्यातच अभिनेता संजीव कुमार यांचा आजार बळावला आणि ते त्याच्या उपचारासाठी अमेरिकेला निघून गेले. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. नंतर राजीव गांधी यांनी अमिताभ बच्चन यांना राजकारणात येण्याची विनंती केली. त्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमिताभ बच्चन यांनी अलाहाबाद मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव करून ते विजयी झाले.
या सर्व गदारोळात मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांच्या ‘अल्लारखा’ या चित्रपटाच्या शूटिंग मात्र पार कोलमडले. १९८५ साली अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी स्वतः मनमोहन देसाई यांना तुम्ही दुसरा स्टार बघा मी आता सध्या राजकारणात व्यस्त असल्यामुळे चित्रपटात काम करू शकत नाही. पण मी केतनच्या सिनेमात नक्की काम करेन.” असे सांगितले. मनमोहन देसाई यांना थोडेसे वाईट वाटले पण त्यांनी त्यांची बाज समजून घेतली आणि अमिताभ बच्चन यांची रिप्लेसमेंट म्हणून जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) साईन केले.
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
आता चित्रपटातील स्टार कास्ट कम्प्लीट बदलून गेली. जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, शम्मी कपूर, मीनाक्षी प्रमुख भूमिकेमध्ये आले. चित्रपट प्रयागराज यांनी अमिताभ बच्चन यांना समोर लिहून समोर ठेवून लिहिला होता त्यामुळे जॅक श्रॉफ इथे खूप कमी पडला. कसाबसा चित्रपट बनला आणि १५ ऑगस्ट १९८६ रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्या आठवड्याचा सुपर फ्लॉप झाला. केतन देसाई पहिल्याच सिनेमात अपयशी ठरला. यानंतर मनमोहन देसाई यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना घेऊन ‘गंगा जमुना सरस्वती’ (१९८८) हा चित्रपट बनवायला घेतला. या चित्रपटाला देखील फारसे यश मिळाले नाही.
या चित्रपटात अमिताभ, जयाप्रदा आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यानंतर केतन देसाई यांना शब्द दिल्याप्रमाणे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘तुफान’ (१९८९) या चित्रपटात काम केले या चित्रपटाने देखील यश मिळवले नाही हा देखील सुपरफ्लॉप झाला. मनमोहन देसाई यांच्या यशाची गुरुकिल्ली आता कम्प्लीट हरवली होती. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या ‘मर्द’ या चित्रपटानंतर त्यांचा कुठलाही चित्रपट यशस्वी ठरला नाही. १९९४ साली मनमोहन देसाई यांचे निधन झाले. त्यानंतर केतन देसाई यांनी काही चित्रपट दिग्दर्शित केले. पण त्यांच्या कुठल्याही चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
वडिलांच्या यशाचा वारसा केतन देसाई यांना पुढे चालवता आलं नाही हेच खरे!