‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष !
Shubhvivah : स्टार प्रवाह या वाहीनीवरील लोकप्रिय मालिका ‘शुभविवाह’ सध्या एका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आकाशच्या झालेल्या भीषण अपघातानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी भूमी कसोशीने प्रयत्न करताना दिसणार आहे. त्याच्या उपचारांसाठी भारतातील एक नामवंत न्युरो सर्जन, डॉ. संकर्षण अधिकारी स्वतः उपस्थित राहणार आहेत. डॉ. संकर्षण अधिकारी हे केवळ एक यशस्वी डॉक्टर नाहीत, तर आपल्या प्रोफेशनकडे सेवा म्हणून पाहणारा संवेदनशील माणूस आहेत. त्यांच्या आयुष्यात रुग्णांची सेवा हीच पहिली जबाबदारी आहे. (Shubhvivah Marathi Serial)

या खास भूमिकेत आपल्याला अभिनेता चिन्मय उद्गीरकर (Actor Chinmay Udgirkar) दिसणार आहे. ‘स्वप्नांच्या पलीकडले’ (Swapnanachya Palikadale) या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला चिन्मय जवळपास अकरा वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भूमिकेविषयी बोलताना चिन्मय म्हणतो, “स्टार प्रवाहनेच मला खरी ओळख दिली आणि आता पुन्हा नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाली आहे. या पात्राची गंमत म्हणजे, अशा प्रकारची भूमिका मी याआधी कधीच साकारली नव्हती.

संकर्षण हा खूपच शिस्तबद्ध, शांत स्वभावाचा, गंभीर आणि भावनिक माणूस आहे. तो आपल्या कुटुंबावर, विशेषतः बायको-मुलांवर प्रचंड प्रेम करणारा असा आहे. पण जेव्हा त्याच्या बायकोचा अपघातात मृत्यू होतो, तेव्हा त्याचं जगच कोसळून जातं. आयुष्याचा केंद्रबिंदू असलेली पत्नी गेल्यानंतर त्याने जगण्यावरच विराम दिला आहे. दिवस ढकलत जगणं हेच त्याचं वास्तव बनलं आहे.”
================================
================================
आता आकाश वर उपचार करण्यासाठी तो भूमी समोर एक अट ठेवतो. ही अट नेमकी काय असणार आहे? आणि भूमी आकाशचा जीव वाचवण्यासाठी ती अट स्वीकारणार का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक आणि महत्वाच ठरणार आहे. त्यामुळे ‘शुभविवाह’ ची पुढची भाग प्रेक्षकांनी नक्कीच चुकवू नये असाच असेल यात शंका नाही.