Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Deepika Padukone ठरली मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय

स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

Asambhav Movie Poster: प्रेम की सुड? रहस्यांनी भरलेला ‘असंभव’च्या पोस्टर्सने

एकेकाळी Oscars मध्ये पोहोचला होता, आता चालवतो रिक्षा!

Heer Ranjha या सिनेमाचे सर्व संवाद काव्यात्मक शैलीत (Poetic Form)

दिवाळीत Thama आणि प्रेमाची गोष्ट २ येणार आमने-सामने!

‘महाभारत’ मालिकेतील कर्ण काळाच्या पडद्याआड; अभिनेते Pankaj Dheer यांचा कॅन्सरने

Kantara 1 ओटीटीवर कधी येणार?

ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

देवसाहेब— देवा ने झपाटले हो….

 देवसाहेब—  देवा ने झपाटले हो….
कलाकृती तडका माझी पहिली भेट

देवसाहेब— देवा ने झपाटले हो….

by दिलीप ठाकूर 20/04/2020

स्थळ– आनंद रेकॉर्डिंग स्टुडिओ, पाली हिल, वांद्रे 

पहिल्या मजल्यावरील देव आनंदच्या केबिनवर मी नॉक करतो, आतून आवाज येतो, कम इन…. आवाजातही खास देव आनंद शैली 

मी दरवाजा लोटून आत शिरतो तो समोरच अतिशय कडक इस्रीच्या स्टाईलीश  कपड्यात साक्षात देव आनंद…  बोलिये… उच्चारात काय काम आहे असा सूर 

 त्यावर मी बम्बईया हिंदीत बोलतो, मै मराठी न्यूजपेपर नवशक्ती के लिए आपके इंटरव्हयू लेना चाहता हू… आपकी अपाॅईन्मेंट ली है… और मुझे जो टाईम दिया है, मै उसी वक्त आया हू…(देव आनंद कमालीचा वक्तशीर म्हणून ओळखला जायचा, तर मग त्याची आवड जपायला नको का?) 

यावर देव आनंद त्याच्या वृत्तीनुसार म्हणाला, मै सिर्फ पाच मिनिटं दूंगा… मै बहुत ही बिझी हू…

अर्थात, फक्त पाचच मिनिटे मोकळा असणारा देव आनंद मग कितीही वेळ बोलण्यास तयारच असतो. देव आनंद असा ‘असामी ‘ होता की तो पडद्यावर असो अथवा प्रत्यक्षात असो, आपण देव आनंद आहोत हे कधीच विसरत नसे. आपण अखंड/प्रचंड/मनसोक्त/मनमुराद बोलत राहावे आणि समोरच्याने ते ऐकत रहावे हे देव आनंदला प्रचंड आवडे, त्यामुळे त्याची मुलाखत घेणे म्हणजे अधेमधे त्याला एकादा प्रश्न करुन आणखीन खुलवणे….

देव आनंदची ही पहिली भेट माझे मित्र अनिल चित्रे यांच्यामुळे झाली. ते हिंदी चित्रपटसृष्टीत काही निर्मिती संस्थांशी संबंधित होते. एकदा ते म्हणाले, ‘सच्चे का बोलबाला’ चित्रपटाच्या निमित्ताने   देव आनंदची मुलाखत घेणार का? त्यांचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच मी ‘हो’ कधी म्हणालो हे समजलेच नाही. १९८९ सालची ही गोष्ट. (हिंदी चित्रपटसृष्टीतील असे चांगले संबंध अथवा मित्र खूप उपयोगी पडतात हा माझा सुखद  अनुभव आहे.) आणि त्यानेच मला देवसाहेब त्यांच्या स्टाईलनुसार ‘मै सिर्फ पांच मिनिट दूंगा’ असे म्हणतील. पण ते तेवढे सिरियसली घ्यायचे नाही….

 तसे तर विजय आनंद दिग्दर्शित ‘गाईड’ ( १९६७) मधील देव आनंदचा राजू गाईड वगळता देव आनंदला कधीच कोणी कधी सिरियसली घेतलेच नाही. त्यानेदेखिल आपली इमेज अथवा प्रतिमा ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया…’ अशीच केली. त्याच प्रतिमेचा प्रत्यय या पहिल्या भेटीत आला. 

देव आनंदची ही ‘टुमदार’ केबिन अगदी कलरफुल. एखादा पुरस्कार, एकादा फोटो. पण टेबलावर बरीच मोठी इंग्रजी  पुस्तके. एक डायरी, जोडीला पेन (तरी बरं या काळात तो स्वतःच निर्मिती आणि दिग्दर्शन करीत असलेल्या चित्रपटातून भूमिका रंगवत होता. त्यामुळे ‘मेरे पास एक भी डेटस नही…. मेरी डायरी फुल्ल है’ असे म्हणू शकत नव्हता.) देव आनंद दिलखुलास बोलता बोलता तत्वज्ञान कधी सांगू लागला हे मलाही समजले नाही. त्याने कितीही बोलावे अशी माझी अपेक्षा होतीच (रविवार पुरवणीचे अख्खे पान भरायचे होते ना? आणि याक्षणी आमच्या दोघांत तिसरे कोणी नसल्याने दोघानाही मोकळीक होती.)

लहानपणापासून देव आनंदचे चित्रपट पाहत आल्याने ‘आपल्याच धुंदीत रमणारा ‘ अशी त्याची प्रतिमा मनात तयार झाली होती. कॉलेजमध्ये असताना मॅटीनी शोला देव आनंदचे नौ दो ग्यारह, हम दोनो, तेरे घर के सामने, ज्वेल थीफ, बाझी, काला पानी, काला बाजार  असे अनेक चित्रपट पाहताना त्याच्या व्यक्तीमत्वात इतरांना आकर्षण वाटेल अशा लकबी आहेत हे पटत गेलं. अनेकदा तरी त्या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा नव्हे तर ‘देव आनंद’ दिसत होता. विशेषतः नायिकेवर प्रेम करणारा आणि प्रेम गीतातील ‘देव आनंद ‘ पाहण्यासाठी थिएटरमध्ये वारंवार जाऊ लागलो. जॉनी मेरा नाम, जोशीला, प्रेम पुजारी, हरे राम हरे कृष्ण…. लिस्ट वाढली तरी ‘देव आनंद तोच’!  ‘देव आनंद’ चे दुसरे काही नाव असते तर ते पटलेच नसते. 

 मिडियात आल्यावर मेहबूब स्टुडिओत ‘हम नौजवान ‘ ( १९८६) च्या सेटवर आम्हा काही सिनेपत्रकाराना ‘शूटिंगचा आंखो देखा हाल ‘ पहायला बोलावले तेव्हा ‘मी प्रत्यक्षात या देवाला काही फूटांवरुन’ पाहिले. (मेहबूब स्टुडिओ देव आनंदचा अतिशय आवडता स्टुडिओ…. त्याच्या निधनानंतर याच स्टुडिओत शोकसभा झाली. त्यासाठी हजर राहताना देव आनंदशी झालेली पहिली भेट प्रकर्षाने आठवत होती. तर आपल्या दिग्दर्शनातील प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर देव आनंद मिडियाला हमखास बोलवणार हे काही वर्षातच सरावाचे झाले.) …. आपले प्रश्न संपतील पण देवसाहेब बोलण्यात कंटाळणार नाहीत हे लक्षात आल्यावर ‘शेवटचा प्रश्न’ केला, आपकी पिछली फिल्म कुछ खास नहीं लगी …. तेवढ्यात देवसाहेब म्हणाले, मे हमेशा मेरी आनेवाली फिल्म के बारे मै सोचता हूँ…. जैसे ही वो फिल्म रेडी होगी तब ऐसा हा एक इंटरव्हयू करेंगे… थोडा वक्त निकाल के आ जाना 

 खुद्द देव आनंद म्हणतोय ‘फिर मिलेंगे’ हा बोनस होता. ऐंशीच्या दशकातील अनेक सिनेपत्रकाराना देव आनंदचा हा असाच अनुभव आला आहे. (गोष्ट छोटी वाटते, पण यालाच माणसं जोडण्याची कुशलता म्हणतात) मिडियातील अनेकांची नावे (निदान चेहरे तरी) ओळखीचे ठेवणे ही देव आनंदची विशेष खासियत होती. माणसे उगीच मोठी होत नसतात, त्यांच्या दीर्घकालीन यशात असे अनेक छोटे छोटे घटक असतातच. 

  मुलाखत संपल्यावर देव आनंदसोबत फोटो काढायला हवाच. त्यानेच बेल मारुन ऑफिस बॉयला बोलावले आणि फोटो काढला. त्या काळात मी एक छोटासा कॅमेरा जवळ ठेवायचो आणि मध्यमवर्गीय संकोच बाजूला ठेवून कधी कधी असा फोटो काढून घ्यायचो. देव आनंदशी गप्पा संपल्या तेव्हा आपण त्याच्या एकूणच तजेलदार/चैतन्यमय व्यक्तिमत्वाने मंत्रमुग्ध झालोय हे लक्षात आले.(अन्यथा एवढ्या मोठ्या स्टारला भेटायचे कशाला?)  …. वळलो आणि दरवाजाच्या आतल्या बाजूला (म्हणजे ज्या दरवाजाकडे पाठमोरा बसलो होतो) पाहिलं तर  देव आनंदच्याच दिग्दर्शनातील ‘हीरा पन्ना’तील बिकीनीमधील झीनत अमानची आठवण यावी अशी एका विदेशी ललनेची छबी दिसली. (मुलाखत पूर्ण घ्यायची तर असे  आजूबाजूला/सगळीकडे पाहील्यानेच माझे ज्ञानाचे कोठार वाढले बरं का?) देव आनंदच्या दिग्दर्शनातील नायिका बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल का असत याचे उत्तर मला असे मिळाले….

दिलीप ठाकूर

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor DevAnand Entertainment Featured Indian Cinema movies Top Films
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.