Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बैराग: Dilip Kumar यांचा ट्रिपल रोल पण सिनेमा सुपर फ्लॉप!

 बैराग: Dilip Kumar यांचा ट्रिपल रोल पण सिनेमा सुपर फ्लॉप!
बात पुरानी बडी सुहानी

बैराग: Dilip Kumar यांचा ट्रिपल रोल पण सिनेमा सुपर फ्लॉप!

by धनंजय कुलकर्णी 24/05/2025

दिलीप कुमारच्या (Dilip Kumar) अभिनयात रंगलेल्या भूमिकांनी पन्नास आणि साठच्या दशकातील  प्रेक्षकांच्या मनावरील गारूड आजही कायम आहे. पण सत्तरच्या दशकात दिलीप कुमार यांच्या अभिनयाची जादू ओसरत चालली होती. दिलीप यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ सालचा. म्हणजे १९७० साली ते पन्नाशीच्या उंबरठ्यावर होता. १९६६ साली त्यांनी सायरा बानू (Saira Banu) सोबत निकाह केला. या जोडीला घेऊन पहिला चित्रपट आला १९७० साली ‘गोपी’! (Bollywood news)  

गोपी चित्रपटात यात वाढत्या वयाची स्पष्ट छाया दिलीप यांच्या चेहर्‍यावर दिसत होती. हा सिनेमा १९६४ साली आलेल्या ‘चिन्नडा गोंबे’ या सुपर हीट कन्नड सिनेमावर आधारीत होता. ए भीमसिंग यांच दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात दिलीप सोबतच ओम प्रकाशचा अभिनय अप्रतिम झाला होता. त्यानंतर १९७२ साली बी आर चोप्रांनी त्यांच्याच १९५१ सालच्या ’अफसाना’ या सिनेमाचा री मेक बनविला ’दास्तान’ या नावाने! यात दिलीपचा डबल रोल होता. सारं काही व्यवस्थित असताना ही या सिनेमाला व्यावसायिक यश मिळालं नाही. हा सारा कालखंड राजेश खन्नाच्या (Rajesh Khanna) बहराचा असल्याने कुणाचीच डाळ इथे शिजत नव्हती. (Bollywood nostalagia)

दिलीप यांनी याच काळात तपन सिन्हा या बंगाली दिग्दर्शकाकडे ’सगीना महातो’ या चित्रपटात भूमिका केली. हि एक क्लासिक मूव्ही होती. विजय तेंडूलकारांनी त्यांचा ’रातराणी’ या पुस्तकात या सिनेमा बाबत फार सुंदर लिहिले आहे. पण हा सिनेमा देखील व्यवस्थित प्रदर्शित न झाल्याने  प्रेक्षकांपर्यंत पोचला नाही.  यात किशोरने दिलीपला प्लेबॅक दिला होता. ‘साला मै साब बन गया…’ आता मात्र दिलीप यांच्याकरीता अस्तित्वाची लढाई होती. वाढलेलं वय तो मान्यच करीत नव्हता. मुशीर रियाझ यांच्या ’बैराग’ या सिनेमात त्याने ट्रिपल रोल करण्याचे आव्हान स्विकारले होते. दिग्दर्शक असित सेन होते. चित्रपट निवांत पणे बनत होता. दिलीप यांनी दिग्दर्शनाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. (Dilip Kumar Movies)

=============

हे देखील वाचा : Manoj kumar करीता किशोर कुमारने एकही गीत गायले नाही!

=============

तोवर कोणत्याही मुख्य नायकाने तिहेरी भूमिक केली नव्हती. दिलीप यांच्यासाठी हि मोठी रिस्क होती. यात सायरा बानो आणि लीना चंदावरकर या तरूण नायिका त्याच्या सोबत (त्याच्या पेक्षा वयाने जवळपास निम्या )होत्या. दिलीपच्या सिनेमाचे हुकमी संगीतकार नौशाद यांना संगीताची जवाबदारी न देता ती कल्याणजी आनंदजी यांना देण्यात आली. ’सारे शहर मे आपसा कोई नही , छोटे सी उमर में लग गया रोग,पीते पीते कभी कभी यूं जाम बदल जाते है,मै बैरागन नाचू गाऊं या आनंद बक्षी यांच्या गाण्यांनी चांगलीच लोकप्रियता हासिल केली. हा सिनेमा तयार झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी प्रदर्शित झाला. (Entertainment news)

सुरूवातीला ‘बॉबी’ , नंतर ‘रोटी कपडा और मकान’ व त्या नंतर ‘शोले’ या यशस्वी सिनेमाशी स्पर्धा टाळण्यासाठी ’बैराग’च्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे पुढे ढकलल्या गेल्या. शेवटी १५ ऑक्टोबर १९७६ रोजी  हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाला पब्लिकने साफ नाकारले. दिलीपचा ट्रीपल रोल ,त्यांचे वाढलेले वय, रीलीजला केलेला उशीर हि देखील सिनेमाच्या अपयशाची एक कारणं होती! नायक म्हणून दिलीप यांचा हा शेवटचा सिनेमा ठरला. ‘ज्वार भाटा’ (१९४४) ते ‘बैराग’ (१९७६) अशी त्यांची तब्बल ३२ वर्षाची नायकाची इनिंग होती. गंमत म्हणजे नायकाने केलेले ट्रिपल रोलचे बहुतेक सर्व सिनेमे फ्लॉपच ठरले (अमिताभचा ’महान’,रजनीचा ’जॉन जॉनी जनार्दन; याला अपवाद ठरला एकमेव कमल हसनचा ’अप्पू राजा’) ‘बैराग’ नंतर दिलीप यांनी पाच वर्षाचा ब्रेक घेतला आणि १९८१ साली मनोजकुमारच्या ’क्रांती’ या सिनेमातून चरित्र नायकाच्या भूमिकेतून रसिकांपुढे आले. (Entertainment tadaka)

================

हे देखील वाचा : तेरी दुनिया से दूर चले होके मजबूर – Mahipal

================

मुशीर  रियाज ‘बैराग’ या सिनेमाचे निर्माते होते. त्यांच्या निर्मितीची ही पहिलीच फिल्म होती. १९६८ साली  हा सिनेमा लॉन्च झाला होता. पण काही ना काही कारणाने तो पुढे ढकलत गेला. मुशीर रियाज यांनी त्यांची दुसरी फिल्म सुरू केली ‘सफर’. राजेश खन्ना, शर्मिला टागोर अभिनीत ‘सफर’ १९७१ साली  प्रदर्शित देखील झाला. या सिनेमाचे दिग्दर्शन देखील असित सेन यांनीच केले होते. ‘बैराग’ मात्र बनतच होता.  या चित्रपटातील गाणी १९७१  साली  बाहेर आली होती. चित्रपट मात्र त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी प्रदर्शित  झाला. गमंत म्हणजे लीना चंदावरकर यांनी जेव्हा सिनेमा साइन केला होता (१९६८) तेव्हा त्या  न्यू कमर होत्या आणि हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला (१९७६) त्या वेळेला त्या लग्नाच्या उंबरठ्यावर होत्या आणि सिनेमातून निवृत्त होण्याच्या मार्गावरही! (Bollywood unknown facts)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bachchan bairag movie Bollywood Dilip kumar Entertainment jwar bhata movie Rajesh Khanna retro movies retro news Sholay sira banu
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.