ज्याच्यासाठी सिनेमा बनवला ‘तो’ क्लिक झालाच नाही!
सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी १९५८ सालापासून सिनेमाचे दिग्दर्शन करायला सुरुवात केली आणि सुपरहिट सिनेमाची लाईनच लावली. ‘तुमसा नही देखा’, ‘दिल दे के देखो’, ‘जब प्यार किसी से होता है’,’फिर वोही दिल लाया हूं’, ‘मेरे सनम’ ,’बहारों के सपने’ , ‘प्यार का मौसम’, ‘कांरवा’… हे सर्व सिनेमे सुपर डुपर हिट झाले. त्यांच्या सिनेमाचा फॉर्म्युला ठरलेला जरी असला तरी ज्या रंजकतेने ते सिनेमा दिग्दर्शित करायचे तो पॅटर्न प्रेक्षकांना खूप आवडत असे. (Tariq khan)
आर डी बर्मन आणि गीतकार मजरूह सुलतानपूरी त्यांचे आवडीचे कलाकार. ‘कांरवा’ लोकप्रिय झाल्यानंतर हुसेन यांनी आपल्या पुतण्याला लॉन्च करण्यासाठी एक चित्रपट निर्माण करण्याचे ठरवले. तारिक खान. (Tariq khan)९ नोव्हेंबर १९५१ रोजी लखनौ येथे जन्मलेला तारिक हँडसम होता. उंची, फीचर्स हिरो होण्यासाठी परफेक्ट होते. या सिनेमाची कथा लॉस्ट अँड फाउंड या फॉर्म्युला वर होती. सिनेमा होता यादों की बारात. चित्रपटात सगळा फोकस हा तारीक वर असणार होता. या चित्रपटात नासिर हुसैन यांनी कम्प्लीट फॅमिली इंटरटेनमेंट असं पॅकेज ठेवलं.
सिनेमां हिट व्हावा म्हणून एक मसाला इंटरटेनमेंट फिल्म बनवायचे ठरवले. सिनेमा हिट झाला की आपोआपच तारिक देखील क्लिक होईल हा त्यांचा फंडा होता. यासाठी त्यांनी स्तर कास्ट जोरदार निवडली. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे इथून गोल्ड मेडल मिळवलेल्या विजय अरोरा यांना सिनेमात घेतलं होतं. ‘हरे राम हरे कृष्णा’ या चित्रपटामुळे स्टार झालेली झीनत अमान या चित्रपटात होती. चुलबुली नीतू सिंग होती. आणि या सर्वांसोबत सिनेमात होते धरम पाजी. खलनायकाच्या भूमिकेमध्ये अजित होते. सलीम जावेद यांची कथा आणि डायलॉग जबरदस्त होते. सिनेमात ठासून मनोरंजन भरलं होतं.
नासीर हुसैन यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या चित्रपटापेक्षाही त्यांना आपला पुतण्या तारिकला (Tariq khan) या सिनेमातून लॉन्च करायचा होतं. सिनेमाचे संगीत जबरा होते. सिनेमात काय नव्हतं? ॲक्शन, ड्रामा ,म्युझिक ,क्राईम, थ्रील सर्व काही ठासून होतं. लेकर हम दिवाना दिल, चुरा लिया है तुमने जो दिल को, यादो की बारात निकली आज दिलके द्वारे, मेरी सोनी मेरी तमन्ना झूठ नाही ही मेरा प्यार,आपके कमरे में कोई रहता है ही चित्रपटातील गाणी आजदेखील लोकप्रिय आहे. चित्रपटातील नायक विजय अरोरा, झीनत, नीतू , सिनेमाचे डायलॉग, गाणी, विलन सर्वजण गाजले. गाजला नाही तो फक्त तारीक.
म्हणजे ज्यांच्यासाठी हा सिनेमा तयार झाला तोच सिनेमात क्लिक झाला नाही. एकेकाचं नशीब असतं. यानंतर नासीर हुसेन यांनी पुन्हा एकदा तारिकला (Tariq khan)लॉन्च करण्यासाठी १९७७ साली ‘हम किसीसे कम नही’ हा चित्रपट तयार केला. यात तारीकला ऋषी कपूरच्या बरोबरीची भूमिका दिली होती. हा देखील सिनेमा प्रचंड यशस्वी झाला. पण पुन्हा तेच. तारीक यांच्याकडे कोणाचे लक्ष गेलं नाही. यानंतर मात्र तारीकने आपले अभिनयावरील लक्ष कमी केले आणि त्याने सिनेमाच्या प्रोडक्शन मध्ये लक्षात घातले. म्हणजे ज्याच्यासाठी सिनेमा बनवला ते सोडून बाकी सर्वजण यशस्वी झाले.
असाच काहीसा प्रकार सुनील दत्त यांचे भाऊ सोम दत्त यांच्या बाबत झाला होता. १९६९ साली सुनील दत्त ने आपला भाऊ सोम दत्त याला लाँच करण्यासाठी ‘मन का मीत’ या चित्रपटाची निर्मिती केली. नायक सोम दत्त, नायिका लीना चंदावरकर आणि खलनायक विनोद खन्ना. लीना चंदावरकर आणि विनोद खन्ना जबरदस्त हिट झाले. सोम दत्त याचे नाव देखील आता कुणाला आठवत नाही. अभिनेता राजेंद्र कुमारने आपला मुलगा कुमार गौरव साठी ‘लव स्टोरी’ हा चित्रपट निर्माण केला. पहिला चित्रपट चालला पण यानंतर मात्र कुमार गौरव अजिबात चालला नाही. त्याला रिलाँच करण्यासाठी १९८६ साली राजेंद्र कुमारने ‘नाम’ या चित्रपटातील निर्मिती केली. महेश भट यांचे चित्रपटाला दिग्दर्शन होते. (Tariq khan)
===================
हे देखील वाचा : हरीकिशन गिरी गोस्वामीचा मनोजकुमार कसा झाला?
===================
‘नाम’ चित्रपट चालला पण त्याचा फायदा कुमार गौरव पेक्षा जास्त संजय दत्त याला झाला. १९९० साली राजेंद्रकुमार यांनी पुन्हा एकदा संजय दत्तला लाँच करण्यासाठी ‘फुल’ या चित्रपटाची निर्मिती केली. यात त्याची नायिका माधुरी दीक्षित होती. पण पुन्हा तेच झाले कुमार गौरव काही क्लिक झालाच नाही. सोमदत्त, तारीक (Tariq khan), कुमार गौरव, राजीव कपूर, संजय कपूर…हे सर्व कमनशिबी. हे सर्व कलावंत सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. इतरांसारखा संघर्ष वाट्याला आला नाही… पण करिअर मात्र घडवू शकले नाही!