Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले

Nana Patekar : “देव मानत नाही अशातला भाग नाही पण…”;

‘आपल्या डोक्यात हवा गेली म्हणून…’ शरद उपाध्येंनी Nilesh Sable यांना

Dashavatar : दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात; ‘दशावतार’ या थरारक सिनेमातून रंगणार कोकणच्या

निलेश साबळे नाही तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘Chala Hava

Aamir Khan : ‘त्या’ ज्येष्ठ मराठी कलाकराने १० हजारांची मदत

Dev Anand : ‘देस परदेस ‘; नवकेतनचा अखेरचा सुपर हिट

South Film Actress : ख्रिश्चन धर्म बदलून हिंदू धर्माचा केला

Panchayat 4 : सचिवजी आणि रिंकीचा किसींग सीन का हटवला?

Bharat Jadhav : स्वातंत्र्यदिनी नाटक प्रेमींसाठी भरत जाधव घेऊन येणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

लव्हली…प्रेमाची कहाणी – गीता गोविंदम

 लव्हली…प्रेमाची कहाणी – गीता गोविंदम
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

लव्हली…प्रेमाची कहाणी – गीता गोविंदम

by Kalakruti Bureau 11/04/2020

पास जबसे तेरी आई….तुझको जाना है मैने….किंवा येंती…येंती…ही गाणी कोणाला आठवतात का….15 ऑगस्ट 2018 मध्ये रिलीज झालेल्या तेलगु चित्रपटातील लोकप्रिय गाणी….गीता गोविंदम…हो, गीता गोविंदम…एक रोमॅंटीक कॉमेडी चित्रपट….या चित्रपटाच्या गाण्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला होता.  एकतर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचे गुड लूक…आणि त्यात चित्रपटाचे अफलातून शूट….यामुळे ही गाणी जेवढी ऐकायला चांगली….तेवढीच बघायलाही…त्यामुळे गीता गोविंदमची गाणी हिंदीमध्ये यायच्या आधीही लोकप्रिय झाली होती.  त्याचे बोल समजत नव्हते, पण लोकेशन आणि गाण्यांचे चित्रिकरण यावर ही तेलगू गाणीही भारतभर गाजली.  परदेशातही लोकप्रिय झाली.  हिंदी गाणीही तशीच गाजली…चित्रपटाची कथा एकदम मनाला भावणारी….काही मारामारी नाही…की हेवेदावे नाही…एक खरी रोमॅंटीक स्टोरी….प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी प्रेमकहाणी…

आता नुकताच हा चित्रपट झी वाहिनीवर दाखवण्यात आला.  बनी वासु हे निर्माता आणि परशुराम यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.  गोपी सुंदर यांची गाणी आणि एस. मणिकंदन यांचे छायाचित्रण…या चौकडीने किती कमाल केली आहे, हे पुन्हा एकदा बघता आले.  यापू्र्वीही हा चित्रपट बघितला आहे.  पण कितीही वेळा पाहिला तरी पहिल्यांदाच चित्रपट बघतोय अशीच भावना…

नायिकेला पहिल्यांदा बघितल्यावरच प्रेमात पटणारा नायक…लव्ह अॅट फर्स्ट साईट…मग त्या दोघांमध्ये आलेला क्लायमॅक्स…त्यात नायकाच्या बहिणीचं आणि नायिकेच्या भावाचं ठरलेलं लग्न…हे लग्न आपल्या नकळत घडलेल्या चुकीमुळे मोडू नये म्हणून नायकाची धावपळ…अगदी नायिका सांगेल ती काम तो गपचूप करत रहातो…मग तिचे सामान उचलतो…तिची सर्व कामे करतो…गाडी बंद पडली तरी तिला गाडीवर बसवून गाडी ओढत नेतो…मग नायिकेला त्याच्या प्रेमाचा साक्षात्कार होतो….त्यात त्या दोघांचे लग्न घरातील मंडळी ठरवतातही…पण मग नायक अडतो…अर्थात त्याला जेव्हा नायिका आपल्या प्रेमात आहे, हे समजत, तोपर्यंत त्या नायिकेचं लग्न घरचे दुस-याच मुलाबरोबर ठरवून मोकळे झालेले असतात …मग नायिका अगदी लग्नमंडपापर्यंत नवरी म्हणून गेल्यावर नायक ड्रामा करतो…शेवटी काय गोड गोड…पण या सर्वांत सुंदर आहे ती फोटोग्राफी…कॅमे-याची कमाल…आणि विजय, रश्मिका यांचा अप्रितिम पण सहज असा अभिनय…एकतर दोघेही खूप छान दिसतात…त्यांच्या चेह-यावरील गोडवा या रोमॅंटीक चित्रपटाला बरोबर जोडला गेला आहे.  त्यामुळेच हा चित्रपट तुफान चालला.  तब्बल 132 करोडचा गल्ला या चित्रपटानं जमवला असं बोललं जातं.

आता या लॉकडाऊनच्या काळात डोक्याला खूप ताप झालाय…वैताग आलाय…चिडचिड होतेय…अशावेळी असे मस्त चित्रपट नक्की बघा…काही सू-या, तलवारी घेऊन मारामारी नाही.  की प्रेमात कोणाची अडकाठी नाही.  सारा गोडीचा मामला…शिवाय नेत्रसुखद चित्रपट…त्यामुळे सगळा ताण झटक्यात निघून जाईल…टीव्हीवर नाहीतर झी 5 वर गिता गोविंदम फ्री उपलब्ध आहे.  नक्की बघा….

सई बने

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Featured movies music telgu movie Top Films
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.