Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला

Pushkar Jog : ‘हार्दिक शुभेच्छा…’; लग्नानंतरची गोष्ट सांगणारा धमाल चित्रपट
मराठी फिल्म मेकर्स प्रेक्षकांना विविधांगी विषयांची मेजवानी चित्रपटांमधून कायमच देत असतात. कॉमेडी, हॉरर, रोमॅंटिक, रहस्यपट अशा अनेक विषयांवर आधारित चित्रप सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशात आता एक वेगळाच विषय मांडणारा ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपटट लवकरच भेटीला येणार आहे. पुष्कर जोग याचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट लैंगिक सुसंगतेवर भाष्य करतो. नाव ऐकूनच उत्कंठा वाढली असेल ना? तर अशी आपली उत्सुकता अधिक वाढवणारा ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला आहे. (Pushkar Jog)
खरं तर चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट लग्नसंस्था आणि त्यानंतरच्या प्रवासावर आधारित असल्याचे दिसतंय. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पुष्कर (Pushkar Jog) लग्नासाठी मुली बघत असून त्याच्या आयुष्यात दोन मुली हेमल इंगळे आणि पूर्वी मुंदडा आल्याचं दिसंत. सोबतच त्यांच्या नात्यात काही गुंतागुंतीचे प्रसंगही दिसतात. त्यामुळे पुष्करच्या आयुष्यात नेमकं कोण येणार? त्यांचं वैवाहिक जीवन कसं असणार? आणि चित्रपटाच्या नावाचा नेमका अर्थ काय अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं २१ मार्च २०२५ रोजी मिळणार आहेत. (Marathi upcoming film)

पुष्कर जोगच्या (Hardik shubheccha pn tyancha Kay) चित्रपटांच्या कथा निराळ्या असतातच पण त्याहूनही महत्वाचं म्हमजे मरकाठी चित्रपटाचं शुटींग तो आवर्जून परदेशात करतो; जिथे यापूर्वी कधीच कोणते मराठी चित्रपट चित्रित केले नाही आहेत. या देखील चित्रपटात प्रेक्षकांना ॲमस्टरडॅम, पॅरिस आणि दुबईची सैर तो घडवणार आहे. ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या चित्रपटात पुष्कर जोग (Pushkar jog), hemal ingale, पूर्वी मुंदडा यांच्यासह या चित्रपटात विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, Prithvi pratap, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. (Entertainment gossip)
======
हे देखील वाचा : O Bawari Song: ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’‘चित्रपटातील ‘ओ बावरी’ हे रोमँटिक गाणे प्रदर्शित !
======
दरम्यान, चित्रपटाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करताना दिग्दर्शक पुष्कर जोग (Pushkar jog) म्हणाला,” ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपट फक्त लग्नानंतरच्या लैंगिक सुसंगतेबद्दल बोलत नाही, तर तो दोन व्यक्तींमधील भावनिक संवाद किती महत्त्वाचा असतो, हेही अधोरेखित करतो. लग्नानंतरचे जीवन ही नवी परीक्षा असते. या परीक्षेत प्रेम, समंजसपणा, आणि एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असते. आजच्या धकाधकीच्या जगात दाम्पत्यांनी सुसंवाद साधणे किती महत्त्वाचे असते, हे आम्ही या कथेतून दाखवण्याचा प्रयत्न केला असून आम्हाला खात्री आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात नक्कीच खास स्थान निर्माण करेल.” (Marathi films)
आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने (panorama studio) या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.(entertainment tadaka)