Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sadashiv Amrapurkar यांना ‘सडक’मधील ‘महारानी’ चा रोल कसा मिळाला?

 Sadashiv Amrapurkar यांना ‘सडक’मधील ‘महारानी’ चा रोल कसा मिळाला?
बात पुरानी बडी सुहानी

Sadashiv Amrapurkar यांना ‘सडक’मधील ‘महारानी’ चा रोल कसा मिळाला?

by धनंजय कुलकर्णी 06/03/2025

काही कलाकार आपल्या भूमिकांना साकारताना स्वत: त्याला एक वेगळी हटके अशी ट्रीटमेंट देतात. कधी कधी तर दिग्दर्शकाला देखील ते अभिप्रेत नसतं पण तो अभिनेता ती व्यक्तिरेखा साकारताना त्यात असे काही रंग भरतो की ती भूमिका त्याची आयकॉनिक होऊन जाते. अभिनेते सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar) यांनी महेश भट यांच्या १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘सडक’ या चित्रपटात साकारलेली ‘महारानी’ आज देखील हिंदी सिनेमाच्या इतिहासातील एक कायम चर्चिले जाणारे पात्र आहे.

या भूमिकेबाबत सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar) ठाम होते. त्यांची या व्यक्तीरेखेबाबत स्वतःची एक विचारधारा होती. त्यानुसार त्यांनी दिग्दर्शक महेश भट यांच्यासोबत चर्चा करून ही भूमिका साकारली आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी ही भूमिका झाली. पण तुम्हाला माहिती आहे का दिग्दर्शक महेश भट आणि इंडस्ट्रीतले काही लोक मात्र या भूमिकेबाबत साशंक होते. प्रेक्षक अशा किन्नर खलनायकाला स्वीकारतील का? असा प्रश्न होता. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वच टीका करायची तोंडे आपोआप गप्प झाली.

ही भूमिका सदाशिव अमरापुरकर यांना कशी मिळाली?

जेव्हा महेश भट यांनी आपल्या नवीन चित्रपटात मुख्य व्हिलन एक किन्नर दाखवायचे ठरवले त्यावेळी त्यांचा या भूमिकेसाठी कलाकाराचा शोध सुरू झाला. चित्रपटात संजय दत्त आणि पूजा भट यांच्या प्रमुख भूमिका होत्या. खलनायकच या चित्रपटातील सर्वात मोठी व्यक्तिरेखा होती. जेव्हा सदाशिव अमरापुरकर (Sadashiv Amrapurkar) यांना महेश भट अशा प्रकारचा चित्रपट करत आहे असं कळालं नव्हतं ते त्यांना जाऊन भेटले. महेश भट यांच्या ‘स्वयं’ या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका केली होती.

महेश भट यांना सदाशिव अमरापुरकर (Sadashiv Amrapurkar) यांच्या अभिनयाची ताकद माहिती होती. मराठी रंगभूमीवर त्यांचा बोलबाला होताच पण गोविंद निहलानी यांच्या ‘अर्धसत्य’ पासून हिंदीतदेखील त्यांचे मोठे नाव झाले होते. जेव्हा भट यांनी अमरापूरकर यांना भूमिका समजावून सांगितली तेव्हा अमरापुरकर म्हणाले, “मला थोडसं स्वातंत्र्य द्या मी ही भूमिका अजरामर करून दाखवतो!”. खलनायकाला साडी घालण्याची आयडिया देखील त्यांचीच. महेश भट यांना थोडंसं विचित्र वाटलं. पण जेव्हा अमरापुरकर साडी घालून आणि नाकात मोठी नथ घालून बाहेर आले तेव्हा भूमिकेची ताकद वाढली. ही भूमिका साकारताना त्यातील संवाद बोलताना सदाशिव अमरापुरकर यांनी अशी काही जादू केली की संपूर्ण चित्रपट त्यांनी खाऊन टाकला!

चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी इंडस्ट्रीमध्ये या भूमिकेची खूप चर्चा चालू झाली होती बरेच जण महेश भट यांना सांगत होते हा चित्रपट अजिबात चालणार नाही. हिरो एका किन्नरसोबत फायटिंग करतो हे कुणाला आवडेल? पण सदाशिव अमरापुरकर (Sadashiv Amrapurkar) आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी महेश भट यांना विश्वास दिला, ”तुम्ही काही काळजी करू नका चित्रपट धो धो चालणार आहे!” आणि झालं तसंच. चित्रपट प्रदर्शित झाला आणि ‘महारानी’ने प्रेक्षकांवर प्रचंड जादू केली.

=============

हे देखील वाचा : Amitabh Bachchan आणि विनोद खन्नाचा ‘खून पसीना’ आठवतो का ?

=============

आज देखील सदाशिव अमरापुरकर (Sadashiv Amrapurkar) यांची भूमिका आठवली जाते. या भूमिकेसाठी सदाशिव अमरापुरकर यांना त्यावर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. अमरापूरकर यांनी ही भूमिका साकारताना तयांची देहबोली, त्यांचा अभिनय सारचं अफलातून होते. सदाशिव अमरापुरकर मराठी रंगभूमीवरील अतिशय अभ्यासू आणि प्रत्येक भूमिका गांभीर्याने करणारे कलाकार होते त्यांनी एका एकांकिकेत या टाईपची भूमिका पूर्वी केली होती त्यामुळे ते या भूमिकेबाबत कॉन्फिडंट होते.

या सिनेमातील तुम्हे अपना बनाने की कसम खाई है, हम तेरे बिन कही रह नही पाते तुम चले जाते तो हम मर जाते ही गाणी त्या काळात प्रचंड गाजी होती. महेश भट यांनी या सिनेमासाठी आधी जाकी श्रॉफला सीन केलं होतं. (त्या मुळेच हम तेरे बिन कही रह नही पाते या गाण्यात मनहर उदासचा स्वर होता.) पण नंतर जाकी श्रॉफ या सिनेमापासून दूर झाला आणि तिथे संजय दत्त आला. महेश भट यांनी या सिनेमाचा सिक्वेल २०२० मध्ये आणला होता. पण त्याला तेवढे यश नाही मिळाले. सदाशिव अमरापूरकरला (Sadashiv Amrapurkar) या भूमिकेसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार मिळाला होता.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat Celebrity Celebrity News Entertainment Featured Maharani pooja bhatt sadak sadashiv amrapurkar sanjay dutt
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.