Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Gautami Patil Wedding: गौतमी पाटीलने ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल उखाणा

Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!

“मुंबईत राहायचं म्हणजे मराठी आलंच पाहिजे!”; Rohit Sharmaने साधला हास्यजत्रेच्या

सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी Bigg Bossने लढवली शक्कल; घराचा कारभार सांभाळण्यासाठी

OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या

Dhurandhar 2 अडकला कायदेशीर कचाट्यात! आदित्य धरच्या प्रोडक्शनला BMC ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्रतिभावंताची युती

 प्रतिभावंताची युती
मिक्स मसाला म्युझिक मस्ती

प्रतिभावंताची युती

by धनंजय कुलकर्णी 14/09/2020

दोन प्रतिभावान कलाकार एकत्र आले की कलाकृती किती अप्रतिम होते, याचा प्रत्यय संगीताच्या दुनियेत वारंवार येत असतो. अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे आणि आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर या दोन मराठी सारस्वतांनी एकत्र केलेल्या गाण्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असली, तरी कौसल्येचा राम बाई कोसल्येचा राम, जा मुली शकुंतले सासरी, कुणी म्हणेल वेडा तुला, इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे… ही गाणी विसरता येतील का? हाच प्रत्यय  १९५३ साली आलेल्या देवबाप्पा या सिनेमातील गाणी ऐकून रसिकांना आला.

राम गबाळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा ना’ हे बालगीत आज साठ वर्षे उलटून गेली, तरी रसिकांच्या मनात ताजं आहे. साठ वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं गाणं मात्र गदिमांनी काही मिनिटात लिहिलं होतं! या गाण्याचा किस्सा खुद्द पुलंनीच एकदा सांगितला होता. या गाण्याच्या सीटींग करीता दोघे व इतर दोस्त कंपनी  बसले. पण गप्पा, नकला, याची खेच त्याची खेच असं करत करत रात्रीचे बारा वाजून गेले. शेवटी पुलं म्हणाले, “माडगूळकर आता आपला पोरकटपणा बास झाला आता काम करुयात,उद्या गाण्याचे रेकॉर्डिंग आहे व अजून तुम्ही गाणं दिलेले नाही!” गाणं बालगीत होतं व आशा भोसले गाणार होत्या. मग सुरू झाली चर्चेची दुसरी फेरी. गाण्याची चाल त्यांना साधारणत: ‘नाच घुमा कशी मी नाचू’ अशी हवी होती. त्यांनी गदिमांना तसे सांगितले. अण्णांनी  लगेच ‘द्या कागद’ असे म्हणत आपल्या सुंदर अक्षरात एकटाकी गाणं लिहून काढलं ‘नाच रे मोरा…!’

या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी देखील धमाल झाली. पुण्याच्या अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजमध्ये या गाण्याचं शूटींग होतं. बालकलाकार मेधा गुप्ते आपल्या इतर मैत्रीणींसोबत नटून थटून आली होती. दिग्दर्शक राम गबाळेंना मोराचा पिसारा हवा होता. पण काही केल्या पुण्यात मोराची पिसेच मिळेनात, आता झाली पंचाईत, करायचं काय, शुटींगची तर सर्व तयारी झाली होती, शेवटी दिग्दर्शक राम गबाले यांनी यावर उपाय शोधला व शेतकी महाविद्यालयातल्या एका माळ्याला सांगून झाडाच्या मोठ्या पानांचा पिसारा करुन घेतला व या सुप्रसिध्द गाण्याचे शुटिंग मोराच्या पिसार्‍याशिवाय पार पडलं! या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक केला. महाराष्ट्रातील एकही मराठी शाळा नसेल जिथे या शाळेच्या स्नेहसंमेलनात या गाण्यावर नाच झाला नसेल. अलिकडॆ या गाण्याचं रिमिक्स आलं होतं व ते देखील प्रचंड लोकप्रिय ठरलं.

या सिनेमातील सर्व गाणी आशानेच गायली होती. ’करू देत शृंगार सख्यांनो करू देत शृंगार…’ हे गाणं देखील जाणकारांच्या अजून लक्षात आहे. १९५३ साल पुलं, माडगूळकर, अत्रे या तिघा शब्दप्रभूंचं होतं; कारण याच वर्षी अत्रेंचा ’श्यामची आई’ प्रदर्शित झाला आणि सबकुछ पुलंचा असलेला ’गुळाचा गणपती’ देखील!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi songs music Music composer
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.