
Kiara Advani : सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली कियारा!
बॉलिवूडमध्ये सध्या आघाडी अभिनेत्रींच्या यादीत कियारा अडवाणी हिचं नाव सामील झालं आहे. एकीकडे तिच्या चित्रपटांची चर्चा सुरु असताना दुसरीकडे तिने आणि सिद्धार्थ मल्होत्राने आई-वडिल होणार असल्याची गुडन्यूज देत चाहत्यांना खुश केलं. अभिनयाच्या आत्तापर्यंतच्या कियाराच्या कारकिर्दीत तिने एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले. आणि आता इतर अभिनेत्रींना मागे टाकत कियारा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री देखील बनली आहे. (Kiara Advani)
लवकरच कियारा अडवाणी ‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ३०० कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटासाठी कियाराने (Kiara Advani) भल्ली मोठी फी ची रक्कम घेतली आहे. कियारा अडवाणी ‘टॉक्सिक’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता यश याच्यासोबत झळकणार असून तिने १५ कोटी रुपये फी घेतली आहे. तसेच, या बिग बजेट चित्रपटात झळकण्यासोबात कियारा देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली आहे. (Bollywood news)

आत्तापर्यंत प्रियांका चोप्रा, दीपिका पादूकोण (Deepika Padukone) या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री आहेत. चार वर्षांनंतर प्रियांका एस.एस. राजामौली आणि महेश बाबू यांच्या आगामी बिग बजेट चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतणार असून या चित्रपटासाठी ती ३० कोटी रुपये मानधन घेण्याची अपेक्षा आहे. तर, ‘कल्की २८९८ एडी’ साठी दीपिका पादुकोणला २० कोटी रुपये फी मिळाल्याचा माहिती आहे. (Entertainment masala)

दरम्यान, कियारा लवकरच हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर सोबत ‘वॉर २’ (War 2) मध्ये दिसणार आहे. याशिवाय फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन ३’ (Don 3) मध्ये रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) कियारा मुख्य भूमिका साकारणार होती; पण गरोदरपणामुळे तिने या चित्रपटातून माघार घेतली आहे. त्यामुळे कियाराच्या जागी ‘डॉन ३’ मध्ये कोणती अभिनेत्री दिसणार हे अद्याप समजलं नाहीये.
===========
हे देखील वाचा : Shahrukh Khan : संजय लीला भन्साळी, ‘देवदास ‘आणि बरंच काही….
===========