
जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना फिल्मफेअर मिळवून दिला!
आज १८ फेब्रुवारी आज पासून संगीतकार खय्याम यांची जन्म शताब्दी सुरू होत आहे त्या निमित्ताने त्यांच्या एका गाण्याचा हा किस्सा. हा किस्सा सत्तर च्या दशकाच्या अखेरचा आहे. त्या काळात भारतात डिस्को संगीताचा आगमन झालं होतं आणि अशाच प्रकारच्या फास्टट्रॅक संगीताला सिने प्रेक्षक पसंतीची दाद देत होते. या काळात संगीतकार खय्याम किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात एक युगलगीत रेकॉर्ड करत होते. पण किशोर कुमार यांना या गाण्याची चाल खूपच स्लो वाटली त्यामुळे त्यांनी हे गाणे गायला चक्क नकार दिला. पण संगीतकार खय्याम आणि गीतकार गुलजार यांनी किशोर कुमार यांना समजावून सांगितले आणि किशोर गायला तयार झाले. जे गाणे किशोर कुमार गायला तयार नव्हते ते गाणे पुढे एक कल्ट क्लासिक म्हणून लोकप्रिय झाले. एवढेच नाही तर किशोर कुमारला या गाण्यासाठी फिल्मफेअर चा पुरस्कार देखील मिळाला! कोणते होते ते गाणे आणि काय होता तो नेमका किस्सा?
दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ राजेश खन्ना आणि शबाना आजमी यांना घेऊन ‘थोडी सी बेवफाई’ हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटातील गाणी गुलजार यांनी लिहिली होती तर संगीत खय्याम यांचे होते. (संगीतकार खय्याम आणि गीतकार गुलजार यांचा हा एकमेव चित्रपट आहे!) या चित्रपटातील ‘हजार राहे मुड के देखील कही से कोई सदा न आई..’ या गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते. रिहर्सल च्या वेळेलाच किशोर कुमार यांना हे गाणे खूपच स्लो वाटले. गझल टाईप गाणे आपण गाऊ शकतो का याची देखील त्यांना शंका आली. रिहर्सल झाल्यानंतर फायनल टेक सुरू झाला. पहिले कडवे झाल्यानंतर किशोर कुमार यांनी खय्याम यांना थांबायला सांगितले. किशोर कुमार म्हणाला खय्याम साहब आपने इस जमाने मे ये कौनसी स्लो ट्यून बनाई है आज कल ऐसे गाणे कहा बनते है? और ये गजल टाइप गाना तो मै बिलकुल ही नही गा सकता. आप किसी गझल गायक से ये गाना गवा के लो “ त्यावर खय्याम हसले आणि म्हणाले,”किशोरदा हे गाणे मी तुमचा स्वर नजरेसमोर ठेवूनच बनवले आहे. आणि तुम्ही हे गाणे व्यवस्थित जाऊ शकाल याची मला पूर्ण खात्री आहे.”

लता मंगेशकर यांचे देखील तसेच म्हणणे होते. पण किशोर कुमार मात्र गायला तयार नव्हते. स्टुडिओ मध्ये गीतकार गुलजार देखील उपस्थित होते ते किशोर कुमार यांना म्हणाले,” तुम्हाला काय हवे आहे?” तेव्हा किशोर म्हणाले ,” या गाण्याचा टेम्पो आपण थोडा वाढू शकतो का?” त्यावर खय्याम यांनी विचार केला जर किशोरला आपण हीच ट्यून गायला लावली तो ते गाणं नाही गाणार. तेंव्हा आपण याचा टेम्पो वाढवूया. म्हणून त्यांनी सर्व म्युझियन्सला बोलावले आणि गाण्याचा टेम्पो वाढवण्याचे ठरवले. पुन्हा नव्याने रिहर्सल आणि फायनल टेक सुरू झाला पण पुन्हा किशोर कुमार यांनी थांबायला सांगितले आणि तो खय्याम यांच्याकडे आला आणि म्हणाला खय्याम साब आपला आधीचा टेम्पो योग्य होता. तीच ट्यून चांगली होती. मी कंफ्यूज झालो होतो. मला माफ करा. आपण पहिलीच ट्यून वापरूया!”
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
खय्याम यांनी पुन्हा जुन्या पद्धतीने गाणे रेकॉर्ड केले. या गाण्याचे वैशिष्ट्य असे होते की प्रत्येक ओळीनंतर म्युझिक होते हा एक नवीन प्रकार होता. संपूर्ण गाणे गझल टाईप होते. 29 एप्रिल 1980 ला ‘थोडी सी बेवफाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुपरहिट झाला आणि या गाण्याला रसिकांनी चांगली दाद दिली. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या गाण्याला चक्क दोन पारितोषिक मिळाली. सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून गुलजार यांना तर सर्वोत्कृष्ट गायक म्हणून किशोर कुमार यांना या गाण्यासाठी फिल्मफेअर चा पुरस्कार मिळाला! फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला तब्बल सात नामांकन मिळाली होती .म्हणजे जे गाणे किशोर कुमार गायला तयार नव्हता त्याच गाण्याने किशोर कुमार यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला!