प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

एन्काऊंटरचं गूढ आणि अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’; Jitendra Joshi च्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
बऱ्याच दिवसांपासून अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मॅजिक’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आणि आता एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’ काय आहे? असा प्रश्न निर्माण करणारा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नुकताच सलमान खानच्या हस्ते ट्रेलर लॉंच झाला असून मराठीत या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक सायकोलॉजिकल चित्रपट येणार आहे.

एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने केलेला एन्काउंटर आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथींची गोष्ट ‘मॅजिक’ चित्रपटातून उलगडणार आहे. एन्काऊंटर केल्यानंतर हा पोलिस अधिकारी गावी येतो, तिथे एक मुलगीही पोहोचते आणि मग सुरू होतो एक वेगळा खेळ… हे नेमकं प्रकरण काय आहे? एन्काऊंटर आणि अत्तर यांचा काय संबंध आहे, ती मुलगी नेमकी कोण असेल अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावर मिळणार आहेत.
================================
================================
दरम्यान, राजू सत्यम यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन रवींद्र विजया करमरकर यांनी केलं आहे. तर, योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन आणि योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा लिखाण केलं आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काउंटर स्पेशलिस्टच्या प्रमुख भूमिकेत असून, सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रचंड गुंतागुंत असणारा ‘मॅजिक’ हा सायकोलॉजिकल चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi